Get it on Google Play
Download on the App Store

सुगाली माता


सुगाली मातेचे मंदिर राजस्थानंमधील पली जिल्ह्याच्या मर्वर जंक्शनमध्ये आहे. एकाच देवीच्या एकसारख्या दोन मुर्त्या इथे स्थापित आहेत. दोनही मुर्त्यांची मान एका दिशेने झुकलेली आहे. सर्वात आश्चर्याची गोष्ट अशी की  या मूर्त्यांना अशा पद्धतीने बनवल गेल नव्हत. या मुर्त्यांबद्दल  अस सांगितल जात कि कुणीही या मुर्त्याना बदलायला गेलं असता या मुर्त्या आजारी पडतात आणि तोपर्यंत बऱ्या होत नाहीत जो पर्यंत त्यांना होत्या तशा ठेवल्या जात नाहीत, आणि जर नवीन मुर्ती ठेवली असेल तर तिचीही मान आपोआप एका बाजूला झुकली जाते. या मंदिरात स्वातंत्र सेनान्यांचे येणे जाणे सतत चालू असायचे. असं म्हटल जात की ही देवी त्यांची प्रेरणा आहे. ती स्वातंत्र सेनान्यांची रहस्यमयी पद्धतीने मदत करायची. एकदा एका इंग्रज अधिकाऱ्याने तिच्या मानेत गोळी मारली तेव्हापासुन त्या देवीची मान एका बाजूला झुकलेली आहे असे म्हणतात.