Get it on Google Play
Download on the App Store

श्री अक्रूरेश्वर महादेव

 

एकदा सर्व देवता, किन्नर, इंद्र, मुनी सर्वजण पार्वतीची स्तुती करत होते. तेव्हा शंकराचा एक गण भृंगिरिट याने पार्वतीची स्तुती करण्यास साकार दिला. पार्वतीने अनेक वेळा समजावले की तो तीचा पुत्र आहे, केवळ शंकराच्या स्तुतीने त्याचे कल्याण होणारे नाही. तरीही त्याने ऐकले नाही. त्याने योग विद्येच्या बळावर संपूर्ण मांस पार्वतीला अर्पण केले आणि शंकराकडे गेला. माता पार्वतीने त्याला शाप दिला की क्रूर बुद्धीमुळे तू माझा अपमान केला आहेस, त्यामुळे तू मनुष्य लोकाला प्राप्त होशील. शापाच्या प्रभावामुळे भृंगिरिट लगेच पृथ्वीवर येऊन पडला. तिथे त्याने शापातून मुक्त होण्यासाठी तपश्चर्या सुरु केली. तेव्हा शंकराने भृंगिरिटला सांगितले की पार्वती तुला शापातून मुक्त करेल. तू तिची आराधना कर. पार्वतीने त्याच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन त्याला सांगितले की तू महाकाल वनात जाऊन शिवलीन्गाचे पूजन कर. त्यच्या केवळ दर्शनानेच तुझी बुद्धी सुबुद्धीत बदलेल. भृंगिरिटने महाकाल वनात जाऊन शिवलिंगाची आराधना केली. शिवलीन्गातून अर्धनारीनटेश्वर (अर्धा शंकर अर्धी पार्वती असे शरीर) रूप प्रकट झाले आणि त्याला शापमुक्त केले. भृंगिरिटने वरदान मागितले की ज्या शिवलिंगाच्या पूजनाने तो शापमुक्त झाला, त्या शिवलिंगाचे नाव अक्रुरेश्वर महादेव म्हणून प्रसिद्ध होईल. असे मानले जाते की जो कोणी मनुष्य या शिवलिंगाचे दर्शन पूजन करतो त्याची सर्व पापे नष्ट होतात आणि अंती तो स्वर्गात जातो.