Get it on Google Play
Download on the App Store

श्री स्थावरेश्वर महादेव

 

विश्वाकर्माची संज्ञा नावाची मुलगी सूर्याची पत्नी होती. सूर्याचे तेज सहन होत नसल्यामुळे तिने आपल्यासारखी हुबेहूब स्त्री तयार केली आणि तिला सांगितले की तू सूर्याची सेवा कर, आणि माझा पत्ता त्यांना कधीही सांगू नकोस. सूर्य त्या स्त्रीला आपली पत्नी संज्ञा समजला. त्या दोघांना एक पुत्र झाला, ज्याचे नाव शनैश्चर ठेवण्यात आले. शनैश्चराच्या प्रभावाने सारे भयभीत झाले. इंद्र ब्रम्हदेवाकडे गेला आणि शनैश्चराच्या प्रभावातून सर्वांचे रक्षण करण्याची विनंती केली. ब्रम्हदेवाने ही समस्या सूर्याला सांगितली. सूर्य म्हणाला की शनिदेवाला तुम्हीच समजावा, तो माझे ऐकत नाही. मग ब्रम्हदेवाने भगवान कृष्णाला ही समस्या सांगितली. कृष्णाने सर्व देवता आणि ब्रम्हदेवाला महादेवाकडे जायला सांगितले. महादेवाने शनिदेवाला बोलावून घेतले आणि सांगितले की तू पृथ्वीवरील लोकांना त्रास देतो आहेस, परंतु त्यांचे कल्याण देखील कर. बारा राशींत वेगवेगळ्या स्थानावर राहिल्याने तुझा वेगवेगळा प्रभाव राहील. आता तू महाकाल वनात जा आणि पृथुकेश्वर च्या पश्चिमेला असलेल्या शिवलिंगाचे दर्शन पूजन कर. ते लिंग तुझ्या स्थावर या नावावरून स्थावरेश्वर महादेव म्हणून प्रसिद्ध होईल. शनिदेव महाकाल वनात आले आणि इथे येऊन शिवलिंगाचे दर्शन पूजन केले. असे मानले जाते की जो कोणी मनुष्य स्थावरेश्वर महादेवाचे दर्शन पूजन करतो तो सदा सर्वकाळ स्वर्गात निवास करतो, त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, त्याला कधीही ग्राहदोष बाधत नाही.