Get it on Google Play
Download on the App Store

एड्स पासून कसे वाचाल



    आपल्या जोडीदाराशी प्रामाणिक आणि एकनिष्ठ राहा. एकापेक्षा अधिक व्यक्तींशी शरीरसंबंध ठेवू नका.
    संभोगाच्या (मैथुन) वेळी निरोध (कंडोम) नेहमी वापरा.
    जर तुम्ही एच. आय. व्ही. ने बाधित असाल तर आपल्या जोडीदाराला ही गोष्ट नक्की सांगा. ही गोष्ट लपवून ठेवल्यास आणि या परिस्थितीत जोडीदाराशी शारीरिक संबंध चालू ठेवल्यास आपला  जोडीदार देखील    एच. आय. व्ही. बाधित होऊ शकतो, आणि आपल्या होणाऱ्या अपत्यावरही या गोष्टीचा विपरीत परिणाम होऊ शकतो.
    जर तुम्ही एच. आय. व्ही. बाधित असाल किंवा एड्स ग्रस्त असाल तर रक्तदान कधीच करू नका.
    शरीरात रक्त घेण्याआधी रक्ताची एच. आय. व्ही. चाचणी नक्की करून घ्यावी.
    जर तुम्हाला एच. आय. व्ही. संसर्गाचा संशय येत असेल तर त्वरित आपली एच. आय. व्ही. चाचणी करून घ्या. लक्षात घ्या, संसर्ग झाल्यानंतरही, ३ ते ६ महिने, एच. आय. व्ही. चे विषाणू, एच. आय. व्ही. चाचणी केल्यानंतर देखील आढळून येत नाहीत. तेव्हा तिसऱ्या आणि सहाव्या महिन्यानंतर एच. आय. व्ही. चाचणी नक्की करून घ्या.