Get it on Google Play
Download on the App Store

भारतामध्ये एड्स


 ब्रिटिश मेडिकल जर्नल ने नुकत्याच केलेल्या परीक्षणानुसार, भारतात जवळ जवळ १४ ते १६ लाख लोक एच. आय. व्ही. / एड्स ने ग्रस्त आहेत. खरे तर २००५ मध्ये असे अनुमान काढण्यात आले होते की भारतामध्ये जवळपास ५५ लाख लोक एच. आय. व्ही. / एड्स ने ग्रस्त असू शकतील. २००७ मध्ये झालेल्या आणखी अचूक परीक्षणाद्वारे भारतात एच. आय. व्ही. / एड्स ने ग्रस्त लोकांची संख्या २५ लाखाच्या आसपास दाखवली आहे. या नवीन आकड्यांचे जागतिक आरोग्य संघटना ( डब्ल्यू. एच. ओ.) आणि संयुक्त राष्ट्रसंघ एड्स (यू.एन.एड्स) यांनी समर्थन केले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या २०११ च्या एड्स अहवालानुसार, गेल्या १० वर्षांत भरतात नवीन एच. आय. व्ही. लागण होण्याची संख्या ५०% नी कमी झाली आहे.