Get it on Google Play
Download on the App Store

संध्या 59

कल्याण घरीं आला. त्या दिवशीं रात्रीं त्याला कांहीं सुचेना. संध्येची निराशा त्याला समोर दिसे. परंतु त्याचा निरुपाय होता. इतरहि विचार त्याच्या मनांत येत होते. मॅट्रिकच्या मुलांची परीक्षा लौकरच होणार होती. पुण्या-मुंबईला शेंकडों हजारों विद्यार्थी परीक्षेसाठीं येतील. त्यांना उद्देशून एक पत्रक काढावें असे त्याच्या मनांत आलें. तें पत्रक तो मनांत लिहूं लागला. त्याला तो विचार आवडला. त्याला आनंद झाला व त्या आनंदांत तो झोंपला.

त्यानें विश्वासला पत्र लिहिलें. पत्रक तयार कर म्हणून लिहिले. विश्वास लिही चांगलें. विश्वासचें उत्तर आलें नाहीं. कल्याणला पुण्याला जावें असे वाटूं लागलें. तो अधीर झाला. शेवटी एके दिवशीं तो पुण्यास जावयास निघाला. पुण्याला जाऊन कोठें उतरणार, कोठें राहणार ? त्यानें कांहीं ठरविले नव्हतें.

“कल्याण, तूं आत आहेस. जा. परंतु आगींत उगीच उडी घेऊं नकोस.” आई म्हणाली.

“आई, तूं काळजी नको करूं माझी. आणि बाबाहि आतां चांगले वागतील असं वाटतं. ते वेडवाकडं कांहीं करणार नाहींत. अलीकडे तर ते मौनी देव झाले आहेत.”

“कल्याण, पण तुझं कसं होईल तिकडे ?”

“आई, मित्र आहेत. ते कमी पडूं देणार नाहींत.”

“दादा, मी येतें पुण्याला ? मी शिवणकाम शिकेन.”

“माझं पुण्याला राहायचं नक्की झालं म्हणजे ये.”

“दादा, तुझ्याजवळ मला ठेव.”

“आधीं माझा पाय कुठं तरी टेंकू दे.”

कल्याण निघाला. वडिलांच्या पायां पडून निघाला. रंगा रडूं लागला व आईला तर अश्रु आवरतना.

पुण्याला जाणा-या गाडींत कल्याण बसला. एक प्रकारें तुरुंग बरा असें त्याला वाटलें. तुरुंगांत चिंता नाहीं. उद्यां काय करायचें हा प्रश्न नाहीं. ध्येयासाठीं तुरुंगांत आहोंत हें खरें कीं खोटें समाधानहि थोडेंफार असतें. परंतु तो दुबळा विचार त्याला आवडला नाहीं. त्यानें तो विचार मनांतून काढून टाकला. झडझडून फेंकून दिला. झगडणें हेंच माझें भाग्य. झगडा असला म्हणजे प्रत्येक दिवस आपण जगत आहोंत असें वाटतें. प्रत्येक दिवसाची जणूं आठवण राहते. मी पुण्याला जाईन. खोली घेईन. कल्हईचें वगैरे काम करीन. मित्र मिळतील. विद्यार्थ्यांतहि आम्ही हालचाल करूं. कांहीं तरी काम करूं. हातपाय हलवूं. जिवाला जीव देणारा भ्रातृसंघ निर्मू. वर्तमानपत्र काढूं. किती तरी विचार कल्याणच्या मनांत भराभर येत होते. एका स्टेशनवर बरीचशी गर्दी कमी झाली. जागा झाली. ध्येयाच्या विचारांत कल्याण झोंपला. इकडे घरीं कल्याणच्या विचारांत संध्या झोंपली. ती स्वप्नांत कल्याणला बघत होती. आणि कल्याणला स्वप्नांत लाल झेंडा दिसत होता.

संध्या

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
संध्या 1 संध्या 2 संध्या 3 संध्या 4 संध्या 5 संध्या 6 संध्या 7 संध्या 8 संध्या 9 संध्या 10 संध्या 11 संध्या 12 संध्या 13 संध्या 14 संध्या 15 संध्या 16 संध्या 17 संध्या 18 संध्या 19 संध्या 20 संध्या 21 संध्या 22 संध्या 23 संध्या 24 संध्या 25 संध्या 26 संध्या 27 संध्या 28 संध्या 29 संध्या 30 संध्या 31 संध्या 32 संध्या 33 संध्या 34 संध्या 35 संध्या 36 संध्या 37 संध्या 38 संध्या 39 संध्या 40 संध्या 41 संध्या 42 संध्या 43 संध्या 44 संध्या 45 संध्या 46 संध्या 47 संध्या 48 संध्या 49 संध्या 50 संध्या 51 संध्या 52 संध्या 53 संध्या 54 संध्या 55 संध्या 56 संध्या 57 संध्या 58 संध्या 59 संध्या 60 संध्या 61 संध्या 62 संध्या 63 संध्या 64 संध्या 65 संध्या 66 संध्या 67 संध्या 68 संध्या 69 संध्या 70 संध्या 71 संध्या 72 संध्या 73 संध्या 74 संध्या 75 संध्या 76 संध्या 77 संध्या 78 संध्या 79 संध्या 80 संध्या 81 संध्या 82 संध्या 83 संध्या 84 संध्या 85 संध्या 86 संध्या 87 संध्या 88 संध्या 89 संध्या 90 संध्या 91 संध्या 92 संध्या 93 संध्या 94 संध्या 95 संध्या 96 संध्या 97 संध्या 98 संध्या 99 संध्या 100 संध्या 101 संध्या 102 संध्या 103 संध्या 104 संध्या 105 संध्या 106 संध्या 107 संध्या 108 संध्या 109 संध्या 110 संध्या 111 संध्या 112 संध्या 113 संध्या 114 संध्या 115 संध्या 116 संध्या 117 संध्या 118 संध्या 119 संध्या 120 संध्या 121 संध्या 122 संध्या 123 संध्या 124 संध्या 125 संध्या 126 संध्या 127 संध्या 128 संध्या 129 संध्या 130 संध्या 131 संध्या 132 संध्या 133 संध्या 134 संध्या 135 संध्या 136 संध्या 137 संध्या 138 संध्या 139 संध्या 140 संध्या 141 संध्या 142 संध्या 143 संध्या 144 संध्या 145 संध्या 146 संध्या 147 संध्या 148 संध्या 149 संध्या 150 संध्या 151 संध्या 152 संध्या 153 संध्या 154 संध्या 155 संध्या 156 संध्या 157 संध्या 158 संध्या 159 संध्या 160 संध्या 161 संध्या 162 संध्या 163 संध्या 164 संध्या 165 संध्या 166 संध्या 167 संध्या 168 संध्या 169 संध्या 170 संध्या 171 संध्या 172 संध्या 173 संध्या 174 संध्या 175 संध्या 176 संध्या 177 संध्या 178 संध्या 179 संध्या 180