Get it on Google Play
Download on the App Store

संध्या 49

कल्याण आगगाडींत बसून निघाला. तो प्रथम आपल्या घरीं जाणार होता. अनेक विचार त्याच्या मनांत येत होते. काय करावें, काय नाहीं तें तो ठरवीत होता. संध्येकडे तो जाणार होता. तिच्याकडे गेल्यावर काय बोलायचें ? तेथें जेवायला राहायचें का ? कीं उभ्या उभ्या निघून यायचें ? संध्या जेवल्याशिवाय येऊं देणार नाहीं. ती रागवेल. ती काय विचारील, काय काय बोलेल ? ती उंच झाली आहे. पूर्वीपेक्षां निराळी दिसेल. आणि मी कृश झालों आहें. संध्याहि अशक्त झाली असेल का ? तीहि माझ्या आठवणी येऊन पोटभर जेवली नसेल. कदाचित् माझें जेलमधील ते पत्र वाचून तिची निराशा झाली असेल. परंतु आतां पैसे मागितल्यामुळें हंसली असेल, आनंदली असेल. मागें तिने फुलांची माळ दिली. आतां काय देईल ? त्या वेळीं मी विजयी बालवीर होतों. आज कोठली तलवार मारून जात आहे ? तुरुंगांत चक्की पिसून जात आहें. देहावर, स्वार्थावर विजय मिळवून जात आहें. मी घरीं खात पीत नाहीं बसलों. तुरुंगांत गेलों. हाहि विजयच नाहीं का ? कमावलेलें शरीर सेवेंत झिजवून आलों. कोणतें बक्षिस संध्या देईल ? तिची आई काय म्हणले ? माझें तिच्याकडे जाणें तिच्या आईला आवडेल का ? बाकी संध्येच्या आईला आतां सारें माहीत असेल. संध्येनें तिला सांगितलें असेल. तिची आई मला काय म्हणेल ? लग्न करण्याची गळ घालील का ? जर मला विचारण्यांत आलें, तर मी काय उत्तर देऊं ? संध्येची काय इच्छा असेल ? ती मनांत काय योजित असेल ? मीं नकार दिला तर तिला वाईट वाटेल का ? ती अशीच राहील का ? तिनें सारें जीवन का मला दिलें आहे ? परंतु मीं माझें जीवन क्रान्तीला दिलें आहे. मी संध्येला काय देऊं ? परंतु मी तिला विसरूं शकेन का ? माझें मन मला तरी कळतें का ? मी मला तरी ओळखतों का ? समुद्राच्या तळाशीं काय काय असते, याची समुद्राला जाणीव, कीं समुद्रांत डोकावणा-याला जाणीव ? संध्येलाच माझे स्वरूप अधिक यथार्थपणें कळेल. ती माझ्या मानससरोवरांत डोकावील. मी नाहीं मला जाणूं शकणार.

परंतु आम्हीं लग्न केलें तर राहायचें कुठें, पोट कसें भरायचे ? मुंबईला कामगारांत मी राहूं इच्छितों. साधी एक तरी खोली हवी. आम्ही दोघें राहणार. पंचवीस तीस रुपये तरी हवेत. कशाची एजन्सी घेतां येईल का ? मिलमध्येंच काम केलें तर ? जमेल का सारें मला ?

किती तरी विचार कल्याणच्या मनांत येत होते. शेवटीं त्याचें स्टेशन आलें. तो उतरला. आपल्या गांवाला निघाला. जसजसें त्याचें घर जवळ येत होतें, तसतसें त्याचे हृदय खालींवर होत होतें. घरीं काय असेल परिस्थिति ? गांवांतील लोक कल्याणकडे पाहात होते. बाळपणचे त्याचे मित्र धांवत आले. चारपांच वर्षांत भेट नव्हती.

“कल्याण तुरुंगांतून आलास ?”

“बरा आहेस ना ?”

“आतां इथंच राहा हो.”

“कल्याण, तुझ्या घरीं भानगडी आहेत रे ! “

“रंगा रडत बसतो.”

“तुझी आईहि रडते.”

“आतां नको रे त्याला सांगूं. आधीं त्याला घरीं जाऊं दे. मग आपण बोलूं. भीमेच्या तीरावर बसूं.”

घर जवळ आलें. मित्र गेले. कल्याण घरांत शिरला. रंगा दारांतच होता.

“आई, दादा आला, दादा आला !” रंगानें आनंदानें घरांत धूम ठोकली.

आई बाहेर आली. कल्याण आईच्या पायां पडला. तिनें त्याला जवळ घेतलें. तिच्या डोळयांतून पाणी आलें. कल्याण सद्गदित झाला. आईनें त्याच्याकडे व त्याने तिच्याकडे पाहिलें. अश्रुच अनंत बोलले. वडील वरती होते. आणखीहि कोणी वर होतें. कल्याण जायला निघाला.

“वर नको जाऊं, दादा !” रंगा म्हणाला.

“जाऊं दे; बाबांच्या पायां पडून येऊं दे.”

कल्याण वर गेला. मुलगा तुरुंगांतून आल्याचें कळलें तरी पिता खालीं गेला नाहीं. तो वर हंसत होता, बोलत होता. कल्याण एकदम वर जाऊन उभा राहिला; तो पित्याच्या पायां पडला. पितां कांही बोलला नाहीं. पित्याच्या कपाळाला आंठया पडल्या. आणि पित्याजवळ एक आशुकमाशुक होतें. तें मिस्किलपणे हंसलें. कल्याणनें रागानें पाहिलें. तो नागाप्रमाणें फणफणत खालीं गेला. आईजवळ जाऊन बसला.

“किती रे वाळलास, बाळ ! “

“आणि आई, तुझी काय दशा ?”

“आम्हां बायकांचं असंच हो. पण तूं कशाला तुरुंगांत गेलास ? चांगलं शिकायचं सोडून कशाला रे गेलास ?”

संध्या

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
संध्या 1 संध्या 2 संध्या 3 संध्या 4 संध्या 5 संध्या 6 संध्या 7 संध्या 8 संध्या 9 संध्या 10 संध्या 11 संध्या 12 संध्या 13 संध्या 14 संध्या 15 संध्या 16 संध्या 17 संध्या 18 संध्या 19 संध्या 20 संध्या 21 संध्या 22 संध्या 23 संध्या 24 संध्या 25 संध्या 26 संध्या 27 संध्या 28 संध्या 29 संध्या 30 संध्या 31 संध्या 32 संध्या 33 संध्या 34 संध्या 35 संध्या 36 संध्या 37 संध्या 38 संध्या 39 संध्या 40 संध्या 41 संध्या 42 संध्या 43 संध्या 44 संध्या 45 संध्या 46 संध्या 47 संध्या 48 संध्या 49 संध्या 50 संध्या 51 संध्या 52 संध्या 53 संध्या 54 संध्या 55 संध्या 56 संध्या 57 संध्या 58 संध्या 59 संध्या 60 संध्या 61 संध्या 62 संध्या 63 संध्या 64 संध्या 65 संध्या 66 संध्या 67 संध्या 68 संध्या 69 संध्या 70 संध्या 71 संध्या 72 संध्या 73 संध्या 74 संध्या 75 संध्या 76 संध्या 77 संध्या 78 संध्या 79 संध्या 80 संध्या 81 संध्या 82 संध्या 83 संध्या 84 संध्या 85 संध्या 86 संध्या 87 संध्या 88 संध्या 89 संध्या 90 संध्या 91 संध्या 92 संध्या 93 संध्या 94 संध्या 95 संध्या 96 संध्या 97 संध्या 98 संध्या 99 संध्या 100 संध्या 101 संध्या 102 संध्या 103 संध्या 104 संध्या 105 संध्या 106 संध्या 107 संध्या 108 संध्या 109 संध्या 110 संध्या 111 संध्या 112 संध्या 113 संध्या 114 संध्या 115 संध्या 116 संध्या 117 संध्या 118 संध्या 119 संध्या 120 संध्या 121 संध्या 122 संध्या 123 संध्या 124 संध्या 125 संध्या 126 संध्या 127 संध्या 128 संध्या 129 संध्या 130 संध्या 131 संध्या 132 संध्या 133 संध्या 134 संध्या 135 संध्या 136 संध्या 137 संध्या 138 संध्या 139 संध्या 140 संध्या 141 संध्या 142 संध्या 143 संध्या 144 संध्या 145 संध्या 146 संध्या 147 संध्या 148 संध्या 149 संध्या 150 संध्या 151 संध्या 152 संध्या 153 संध्या 154 संध्या 155 संध्या 156 संध्या 157 संध्या 158 संध्या 159 संध्या 160 संध्या 161 संध्या 162 संध्या 163 संध्या 164 संध्या 165 संध्या 166 संध्या 167 संध्या 168 संध्या 169 संध्या 170 संध्या 171 संध्या 172 संध्या 173 संध्या 174 संध्या 175 संध्या 176 संध्या 177 संध्या 178 संध्या 179 संध्या 180