Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

नारायणास्त्राचा प्रयोग
वडिलांच्या कपटाने झालेल्या मृत्यूमुळे दुःखी होऊन अश्वत्थामाने नारायणास्त्राचा प्रयोग केला, ज्यामुळे पांडवांची संपूर्ण सेना त्यांच्या सकट नष्ट झाली असती.
सर्वजण नारायणास्त्रामुळे नष्ट झाले असते, परंतु पांडवांना या अस्त्रापासून वाचण्यासाठी कृष्णाने ताबडतोब त्यांना आपापली शस्त्रे टाकून रथातून खाली उतरण्याचा आदेश दिला, आणि सांगितले की सर्वांनी नारायणास्त्रासमोर आत्मसमर्पण करा नाहीतर सर्व मारले जाल.
सर्व पांडव सेनेने तसेच केले आणि समर्पण केल्यामुळे ते सर्व बचावले. जेव्हा अश्वत्थामाने हे पहिले की सर्व पांडव वाचले आहेत तेव्हा त्याला त्या अस्त्रावर शंका आली. तेव्हा मग त्याने अर्जुनावर अग्नेयास्त्राचा प्रयोग केला, परंतु श्रीकृष्णामुळे अर्जुन पुन्हा बचावला. तेव्हा अश्वत्थामा अतिशय चिडला, त्याने आपले धनुष्य फेकून दिले आणि त्याला आपल्या विद्येबद्दलच शंका वाटू लागली.