Get it on Google Play
Download on the App Store

अश्वत्थामाचे भय


जेव्हा घटोत्कचाच्या नेतृत्वाखाली राक्षसांच्या सेनेने भयानक आक्रमण केले तेव्हा सर्व कौरव वीर पळत सुटले, तेव्हा एकटा अश्वत्थामा तिथे पाय रोवून उभा राहिला. त्याने घटोत्कचाचा पुत्र अंजनपर्वाला ठार केले. त्याचबरोबर त्याने पांडवांची एक अक्षौहिणी सेना देखील मारली आणि घटोत्कचाला जखमी केले.
अश्वत्थामा कौरव सेनेतील मुख्य महारथी होता. कुरुराजाने आपल्या पक्षाच्या ११ अक्षौहिणी सेना ११ महारथींच्या सेनापतित्वात संघटीत केल्या होत्या. हे महारथी म्हणजे - द्रोण, कृप, शाल्य, जयद्रथ, सुदक्षिण, कृतवर्मा, अश्‍वत्थामा, कर्ण, भूरिश्रवा, शकुनि आणि बाह्‍लीक. तेव्हा अश्वत्थामाचे या ११ सेनापतींमध्ये प्रमुख स्थान होते.
इकडे युद्धात अर्जुन, कृष्ण, युधिष्ठिर, भीम, नकुल, सहदेव, द्रुपद, धृष्टद्युम्न तसेच घटोत्कच हे वीर लढत होते. यांच्या उपस्थितीतच बघता बघता अश्वत्थामाने द्रुपद, सुत सुरथ आणि शत्रुंजय, कुंतीभोज चे 90 पुत्र तसेच बलानीक, शतानीक, जयाश्‍व, श्रुताह्‍य, हेममाली, पृषध्र आणि चन्द्रसेन यांसारख्या वीरांना रणांगणावर ठार केले आणि युधिष्ठिराच्या सेनेला पळवून लावले.
अश्वत्थामाने चालवलेला हा रणसंहार पाहून पांडव पक्षात भीती आणि दहशत पसरली होती. आता अश्वत्थामाला रोखणे अतिशय निकडीचे होते, अन्यथा दुसऱ्या दिवशी पराभव निश्चित झाला होता.