Get it on Google Play
Download on the App Store

सर्व विद्यांमध्ये पारंगत होता अश्वत्थामा


जीवनाच्या संघर्षाच्या आगीत होरपळून अश्वत्थामा सोने बनला होता. आपले महान पिता द्रोणाचार्य यांच्याकडून त्याने धनुर्विद्येचे संपूर्ण शिक्षण घेतले होते. द्रोणांनी अश्वत्थामाला धनुर्विद्येची सर्व रहस्ये सांगितली होती. सर्व दिव्य अस्त्र, अग्नी अस्त्र, वरून अस्त्र, पर्जन्यास्त्र, वायव्यास्त्र, ब्रम्हास्त्र, नारायणास्त्र, ब्राम्ह्शीर इत्यादी सर्व त्याने सिद्ध केली होती. तो देखील द्रोणाचार्य, भीष्म, परशुराम यांच्या तोडीचा धनुर्धर बनला होता. कृप, अर्जुन आणि कर्ण हे देखील त्याच्याहून श्रेष्ठ नव्हते. नारायणास्त्र एक असे अस्त्र होते, ज्याचे ज्ञान द्रोणाचार्य सोडल्यास संपूर्ण महाभारतात अन्य कोण्याही योद्ध्याकडे नव्हते. ते अतिशय भयंकर असे अस्त्र होते.
अश्वत्थामाच्या ब्रह्मतेज, वीरता, धैर्य, तितिक्षा, शस्त्रज्ञान, नीतिज्ञान, बुद्धिमत्ता यांच्याबद्दल कोणाचेच कोणतेही दुमत नव्हते. दोन्ही पक्षातील महारथी त्याच्या शक्ती ओळखून होते. महाभारत काळातील सर्व प्रमुख व्यक्ती अश्वत्थामाचे बळ, बुद्धी आणि शील यांचे प्रशंसक होते.
रथी, अतिरथी, महारथी यांची गणना करताना भीष्म दुर्योधनाजवळ अश्वत्थामाची प्रशंसा करतात पण तसेच ते अश्वत्थामाचे दुर्गुण देखील सांगतात. त्याच्या सारखा निर्भीड योद्धा संपूर्ण कौरव पक्षात दुसरा कोणीही नाही.