Get it on Google Play
Download on the App Store

द्रोणाचार्यांचे जीवन बदलून गेले


अश्वत्थामाच्या जन्मानंतर द्रोणाचार्यांची आर्थिक परिस्थिती बिघडत गेली. अगदी घरात काहीही खाण्यासाठी देखील शिल्लक राहिले नाही. दारिद्र्य आले. या अवस्थेतून बाहेर पडता यावे यासाठी द्रोण परशुरामांकडून विद्या प्राप्त करण्यासाठी त्यांच्या आश्रमात गेले. जेव्हा ते परत आले तेव्हा घरात गाय देखील उरली नव्हती. अन्य ऋषींच्या मुलांना दूध पिताना बघून अश्वत्थामा देखील दुधासाठी रडत असे, आणि त्यातच एक दिवस द्रोणांनी पहिले की ऋषींच्या मुलांनी तांदळाच्या पीठाचे पाणी करून अश्वत्थामाला पाजले आणि ते अजाण बालक (अश्वत्थामा) "मी दूध प्यायले" असे म्हणून अतिशय आनंदित झाले. हे पाहून द्रोणांनी स्वतःचा धिक्कार केला.
यावरून एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे अश्वत्थामाने आपले बालपण कसे बसे, जे मिळेल ते खाऊन पिऊन व्यतीत केले. त्याच्या घरात पिण्यासाठी दूध देखील नसायचे. परंतु तो जेव्हा आपल्या मित्रांसोबत असे तेव्हा खोटेच सांगत असे की मी दूध प्यायलो.