Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

नक्की कोण होता हा अश्वत्थामा


 महाभारतात द्रोणाचार्यांचा पुत्र अश्वत्थामा हा एक असा योद्धा होता, की त्याच्याकडे स्वतःच्या जीवावर संपूर्ण युद्ध एकट्याने लढण्याची क्षमता होती. कौरवांच्या सेनेमध्ये एकापेक्षा एक योद्धे होते. पांडवांची सेना प्रत्येक दृष्टीकोनातून कौरव सेनेपेक्षा दुबळी होती, तरीही कौरवच पराभूत झाले. महाभारत युद्धानंतर जिवंत राहिलेल्या १८ योद्ध्यांमध्ये एक होता अश्वत्थामा. त्याला संपूर्ण महाभारताच्या युद्धात कोणीही पराभूत करू शकले नाही. तो आजही अजिंक्य आणि अमर आहे. आता अपण पाहणार आहोत अश्वत्थामाच्या जीवनाशी निगडीत अशी १० रहस्य, जी प्रत्येकाला जाणून घेण्याची इच्छा असते, परंतु अजूनही कोणी असे रहस्य जाणून घेऊ शकलेले नाही.