Get it on Google Play
Download on the App Store

७ कामे जी रावण करू इच्छित होता परंतु त्यात यशस्वी झाला नाही


मद्यातून दुर्गंध नाहीसा करणे -
रावण हा मद्यातील दुर्गंध नाहीसा करण्याच्या प्रयत्नात होता, जेणेकरून संसारात मद्याचे सेवन करून लोक अधर्म वाढवू शकतील.

स्वर्गापर्यंत जिना बंधने -
देवांच्या सत्तेला आव्हान देण्यासाठी रावणाला स्वर्गापर्यंत पोचणारा जिना बांधायचा होता. जेणेकरून जे लोक मोक्ष किंवा स्वर्गाच्या प्राप्तीसाठी देवांची पूजा करतात, ते पूजा बंद करून रावणाला देव मानायला लागतील.

आपल्या शक्तीवर अतिरेकी विश्वास
रावणाला आपल्या शक्तीवर एवढा विश्वास होता की तो काहीही विचार न करता कोणालाही युद्धासाठी आव्हान देत असे. या गोष्टीमुळे अनेकदा त्याला पराभव देखील पत्करावा लागला. रावण युद्धामध्ये भगवान शंकर, सहस्त्रबाहू अर्जुन, राजा बळी आणि वाली यांच्याकडून पराभूत झाला होता. या चारही ठिकाणी रावण काहीही विचार न करता युद्ध करायला गेला होता.

रक्ताचा रंग पांढरा व्हावा -
रावणाची इच्छा होती की मानवाच्या रक्ताचा रंग लालवरून पांढरा व्हावा. जेव्हा रावण विश्वविजयी यात्रेवर निघाला होता तेव्हा त्याने शेकडो युद्ध केली. करोडो लोकांना कंठस्नान घातले. प्रचंड रक्तपात झाला. सगळ्या नद्या आणि सरोवरे रक्ताने लाल झाली. निसर्गाचे संतुलन बिघडू लागले होते आणि सर्व देव रावणालाच याचा दोषी मानत होते. तेव्हा त्याने विचार केला की जर रक्ताचा रंग पांढरा झाला तर कोणालाही कळणार नाही की त्याने किती रक्तपात घडवला, आणि पाण्यात मिसळल्यानंतर रक्त पाण्यासारखे होऊन जाईल आणि कोणालाही कळणार नाही.

काळा रंग गोरा करणे -
रावण स्वतः काळा होता आणि म्हणून त्याची इच्छा होती की मानवजातीत जितक्या लोकांचा रंग काळा आहे ते सर्व गोरे व्हावेत. म्हणजे कोणतीही महिला त्यांचा अपमान करणार नाही.

सोन्याला सुगंध देणे -
रावणाची इच्छा होती की सोन्यामध्ये सुगंध असला पाहिजे. विश्वातील सर्व सुवर्णावर रावणाला स्वतःचा ताबा हवा होता. सोने शोधण्यात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून तो सोन्याला सुगंध देऊ इच्छित होता.

संसारातून हरी पूजेचे निर्मुलन करणे -
रावणाचा इरादा होता की संसारातून भगवंतांच्या पूजेची परंपराच संपवून टाकावी आणि नंतर जगात केवळ आपलीच पूजा व्हावी.