Get it on Google Play
Download on the App Store

भीष्म पितामहांनी सांगितले होते हे रहस्य


जेव्हा कौरव आणि पांडव यांच्यात युद्ध होणार हे नक्की झाले आणि दोन्ही पक्षांच्या सेना कुरुक्षेत्रात एकत्र आल्या, तेव्हा दुर्योधनाने भीष्म पितामहांना पांडवांच्या प्रमुख योद्ध्यांची माहिती विचारली. तेव्हा भीष्म पितामहांनी पांडवांच्या प्रमुख योद्ध्यांची माहिती सविस्तर स्वरुपात दुर्योधनाला सांगितली. त्याच बरोबर हे देखील सांगितले की मी शिखंडी बरोबर युद्ध करणार नाही. दुर्योधनाने याचे कारण विचारले.
तेव्हा भीष्म पितामहांनी सांगितले की शिखंडी पूर्वजन्मी एक स्त्री होता. तसेच या जन्मातही तो एका कन्येच्या रुपात जन्माला आला होता. परंतु नंतर तो पुरुष बनला. भीष्मांनी सांगितले की कन्या रुपात त्याने जन्म घेतलेला असल्या कारणाने मी त्याच्याशी युद्ध करू शकत नाही. शिखंडी स्त्री पासून पुरुष कसा बनला, याची विचित्र कहाणी देखील भीष्म पितामहांनी दुर्योधनाला सांगितली.