Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

श्रीराम अवतार


त्रेता युगात रावणाने प्रचंड दहशत पसरवली होती. देवताही त्याला घाबरत असत. त्याचा वध करण्यासाठी भगवान विष्णूंनी राजा दशरथाच्या घरात माता कौसल्येच्या गर्भातून पुत्राच्या रूपाने जन्म घेतला. या अवतारात भगवान विष्णूंनी अनेक राक्षसांचा खात्मा केला आणि मर्यादांचे पालन करत आपले जीवन व्यतीत केले.
वडिलांच्या सांगण्यावरून वनवासाला गेले. वनवास भोगत असताना दैत्यराज रावण त्यांची पत्नी सीता हिला पळवून घेऊन गेला. सीतेच्या शोधात प्रभू श्रीराम लंकेला पोचले, तिथे त्यांचे रावणाशी घनघोर युद्ध झाले ज्यामध्ये रावण मारला गेला. अशा प्रकारे भगवान विष्णूंनी राम अवतार घेऊन देवताना भयमुक्त केले.