Get it on Google Play
Download on the App Store

भगवान नृसिंह

 

भगवान विष्णूनी नरसिंह अवतार घेऊन दैत्यांचा राजा हिरण्यकश्यपूचा वध केला होता. या अवताराची कथा अशा प्रकारे आहे - धर्म ग्रंथांनुसार दैत्यांचा राजा हिरण्यकश्यपू स्वतःला भगवंतांपेक्षा अधिक बलवान आणि श्रेष्ठ समजत असे. त्याला ना मनुष्य, ना देवता, ना पक्षी, ना पशु, तसेच ना दिवसा, ना रात्री, ना धरतीवर, ना आकाशात, ना अस्त्राने आणि ना शस्त्राने मरणाचे वरदान प्राप्त होते. त्याच्या राज्यात जो कोणी भगवान विष्णुंची पूजा करेल त्याला शिक्षा केली जात होती. त्याचा पुत्र प्रल्हाद बालपणापासूनच भगवान विष्णूंचा परम भक्त होता. ही गोष्ट जेव्हा हिरण्यकश्यपूला समजली तेव्हा तो प्रचंड चिडला. त्याने प्रल्हादला समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु तरीही जेव्हा प्रल्हादने ऐकले नाही तेव्हा मग हिरण्यकश्यपूने त्याला मृत्युदंड दिला. पण प्रत्येक वेळी भगवान विष्णूंच्या चमत्कारामुळे तो वाचला. हिरण्यकश्यपूची बहिण होलिका, जिला अग्नीमुळे न जळण्याचे वरदान प्राप्त होते, ती प्रल्हादाला घेऊन धगधगत्या अग्नीमध्ये बसली. तेव्हा देखील भगवान विष्णूंच्या चमत्काराने प्रल्हाद बचावला आणि होलिका जळून गेली. जेव्हा हिरण्यकश्यपू स्वतः प्रल्हादला मारणार होता तेव्हा भगवान विष्णू नरसिंह अवतार घेऊन खांबातून प्रकट झाले आणि त्यांनी हिरण्यकश्यपूला आपल्या मांडीवर घेऊन आपल्या नखांनी त्याचे पोट फाडून त्याचा वध केला.