Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

मत्स्य अवतार


पुराणांनुसार भगवान विष्णूंनी पृथ्वीला प्रलायापासून वाचवण्यासाठी मत्स्यावतार घेतला होता. याची कथा अशा प्रकारे आहे – कृतयुगाच्या पूर्वार्धात राजा सत्यव्रत होऊन गेला. राजा सत्यव्रत एक दिवस नदीत स्नान करत जालांजली देत होता. अचानक त्याच्या ओंजळीत एक छोटासा मासा आला. त्याने पाहिले आणि विचार केला की हा मासा पुन्हा पाण्यात सोडवा, परंतु तो मासा म्हणाला की मला पाण्यात सोडू नका नाहीतर मोठे मासे मला खाऊन टाकतील. तेव्हा मग राजाने त्याला आपल्या कमंडलूत ठेवले. मासा थोडा मोठा झाला तेव्हा राजाने त्याला आपल्या सरोवरात सोडले. तेव्हा पाहता पाहता मासा आणखीनच मोठा झाला.
राजाच्या लक्षात आले की हा काही साधारण मासा नाहीये. राजाने माशाला खऱ्या स्वरुपात येण्याची विनंती केली. राजाची विनंती ऐकून स्वतः साक्षात चतुर्भुज भगवान विष्णू प्रकट झाले आणि त्यांनी सांगितले की हा माझा मत्स्यावतार आहे. भगवंतानी सत्यव्रताला सांगितले, की आजपासून ७ दिवसांनी प्रलय होईल. तेव्हा माझ्या प्रेरणेने एक विशाल नाव तुझ्यापाशी येईल. तू सप्तर्षी, औषधी, बीज आणि प्राणी यांची सूक्ष्म शरीरे घेऊन त्य नावेत बस. जेव्हा तुझी नाव डगमगू लागेल, तेव्हा मी मत्स्य रुपात तुझ्याजवळ येईन.
त्यावेळी तू वासुकी नागाच्या मदतीने नावेला माझ्या शिंगाशी बांध. त्यावेळी प्रश्न विचारल्यावर मी तुला उत्तर देईन, ज्यामुळे परब्रम्ह नावाने विख्यात असलेली माझी महिमा तुझ्या हृदयात प्रकट होईल. तेव्हा वेळ आल्यावर मत्स्यरुपी भगवान विष्णूनी राजा सत्यव्रताला तत्वज्ञानाचा उपदेश दिला, जो मत्स्यपुराण नावाने प्रसिद्ध आहे.