Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

कपिल मुनि


भगवान विष्णूंनी पाचवा अवतार कपिल मुनींच्या रूपाने घेतला. त्यांच्या पित्याचे नाव महर्षी कर्दम आणि मातेचे नाव देवाहुती होते. शरपंजरी पडलेल्या भीष्म पितामह यांच्या शरीर त्यागाच्या वेळी वेदज्ञ व्यास आदि ऋषींसोबत भगवान कपिल देखील तिथे उपस्थित होते. भगवान कपिल यांच्या क्रोधामुळेच राजा सगर चे साठ हजार पुत्र भस्म झाले होते. भगवान कपिल सांख्य दर्शनाचे प्रवर्तक आहेत. कपिल मुनी भागवत धर्मातील प्रमुख १२ अचार्यांपैकी एक आहेत