Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

डेमोनोफोबिया - दानवांची किंवा राक्षसांची भीती


डेमोनोफोबिया म्हणजे दानव किंवा राक्षसांची भीती असते, या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना असं वाटत राहतं कि आपल्या सामान्य जीवनातही दानवांचा वास आहे. ज्या लोकांना हा फोबिया असतो त्यांना माहिती असतं कि त्यांच्या या भीतीला आधार नाही, ती विनाकारण आहे. तरीही ते दानवांबद्द्ल बोलताना, एकट्याने अंधारात जाताना किंवा भीतीदायक चित्रपट पाहताना खूपच बेचैन आणि अस्वस्थ होतात.