Get it on Google Play
Download on the App Store

अहमदनगरचे निजामशाही साम्राज्य

मालिक अहमद निजाम उल मुल्क मालिक हसन बहरीचा मुलगा होता. आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्याने सत्तेची सूत्रं हातात घेतली आणि निजामशाही साम्राज्याची सुरूवात केली. त्याने सीना नदीच्या किनाऱ्यावर अहमदनगराचा शोध लावला. आणि १४९९ मध्ये बऱ्याच प्रयत्नांनंतर दौलताबादच्या किल्ल्यावर ताबा मिळवला. त्याच्या मृत्यूनंतर १५१० मध्ये त्यांचा मुलगा बुरहान ( वय वर्ष ७ ) याने सत्ता सांभाळली पण सुरूवातीचा कार्यभार मुक्कमल खानच्या हातात होताबुरहानच्या १५५३ मध्ये मृत्यूनंतर त्याच्या ६ मुलांपैकी हुसैनने सिंहासन सांभाळलं. त्याच्या मृत्यीनंतर त्याचा मोठा मुलगा मुर्तजाला सत्ता मिळाली पण त्याच्या आईने, चाँद बिबी ने, कार्यभार सांभाळला आणि बरीच वर्ष राज्य केलं

मुर्तजा शाह ने १५७२ ला बरार ताब्यात घेतलं. त्याचा १५८८ मध्ये मृ्त्यू झाला व त्यांनतर सिंसाहनासाठी त्याची मुलं मिरां हुसैन व इस्माईल शाह यांच्यामध्ये संघर्ष सुरू झाला. जुलै १६०० मध्ये चाँदबिबीच्या मृत्यूनंतर अहमदगरावर मुघलांनी ताबा मिळवला व बहादूर शाहला कैदी करण्यात आलं. अहमदनगर आणि त्याच्या आजुबाजूचा परिसर मुघलांच्या सत्तेखाली होते तरी असे बरेच परिसर अजून होते जे निजामशाहीखालीच होते.  मलिक अंबर आणि बाकीच्या अहमदनगराने मुघलांचा विरोध करून १६०० मध्ये नवी राजधानी परांदामध्ये मुर्तजा शाह द्वितीय याला सुल्तान घोषित केलं. मालिक अंबरचा १६२६ मध्ये मृत्यू झाला आणि या घटनेच्या काहीच काळानंतर शहाजहाँने दख्खनचा सुभेदार महबत खान याला निजामशाही संपवण्याचे आदेश दिले.

महबत खानाने अहमदनगरावर हल्ला करून राजकुमार व इतर लोकांची हत्या केली. पण लवकरच शाहजीने विजापूरच्या मदतीने निजामशाही साम्राज्याच्या शेवटच्या वारसाला, मुर्तजाला, सिंहासनावर बसवलं. पण मुघल साम्राज्याच्या पुन्हा पुन्हा होणाऱ्या हल्ल्यांमुळे मुर्तजाची आई त्याला घेऊन तिथून पळून गेली. शाहजहाँने लवकरच दोघांनाही अटक केली आणि मुलाला मारायचा निर्णय घेतला. पण शहाजीच्या म्हणण्यावर शहाजहाँने त्याला दक्षिणेच कार्यरत राहून मुघल राजवटीला हानी न पोहोचवण्याच्या अटीवर सोडलं. निजामला शहाजहाँ दिल्लीला घेऊन गेले जिथे त्यांना सरदारच्या पदावर नियुक्त करण्यात आलं.