Get it on Google Play
Download on the App Store

विजय नगर साम्राज्य

 दक्षिणेत इस्लामच्या भरभराटीला नियंत्रित करण्यासाठी हरिहर व बुक्का यांनी कृष्णी व तुंगभद्रा नदीजवळ एक स्वतंत्र राज्य स्थापन केलं. या राज्याची राजधानी विजयनगर होती जी तुंगभद्रेच्या किनारीच वसली होती. हरिहर या साम्राज्याचे पहिले प्रशासक होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे भाऊ बुक्काने सत्ता सांभाळली. त्याचा मृत्यू १३७९ मध्ये झाला. व त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा हरिहर द्वितीय याने सत्ता सांभाळली. त्यांच्या साम्राज्यात दक्षिण दख्खनचा त्यांच्या राज्यात समावेश झाला. यात आजचे कर्नाटक, केरळ व तमिळनाडू ह्या राज्यांचा समावेश होता. हरिहर द्वितीय १४०४ मध्ये मरण पावले. या साम्राज्याला संगमा साम्राज्य असेही म्हणत असत. हे शासन जवळपास १५० वर्षांपर्यंत चाललं. पण १४८६ ला त्यांचा एक सरदार नरसिंह सलुव याने संगमा साम्राज्याच्या शेवटच्या राजाला हरवून सिंहासन काबीज केलं. सलुव साम्राज्याची सत्ता जास्त काळ टिकली नाही. त्यांच्या नंतर त्यांच्या देन मुलांनी सत्ता सांभाळली. १५०५ मध्ये दुसरा मुलगा इम्मादी नरसिंहच्या राजवटीदरम्यान तलुव सरदार वीर नरसिंहाने सिंहासनावर ताबा मिळवला आणि तलुव साम्राज्याची स्थापना केली.

कृष्णदेव राया ( १५०९१५२९

वीर नरसिंहाने चार वर्ष राज्य केलं. १५०९ मध्ये त्यांचा छोटा भाऊ कृष्णदेव रायाने सत्ता सांभाळली. विजयनगर राज्य कृष्णदेव राया च्या राजवटीदरम्यान यशाच्या शिखरावर पोहोचलं. ते त्यांच्या प्रत्येक युद्धात विजय मिळवायचे. त्यांनी उडिसाच्या राजाला हरवून विजयवाडा व राजमाहेंदरी वर ताबा मिळवला. विजयनगर राज्य पूर्व कट्टक पासून पश्चिम गोव्यापर्यंत  आणि उत्तरेच रायचून दोअब ते दक्षिण भारतीय महासागरापर्यंत पसरलं होतं.

कृष्णदेव राया पश्चिमी देशांच्या व्यापाराला प्रोत्साहन देत. ते फक्त एक महान योद्धाच नव्हते तर एक महान नाटककार आणि शिक्षणीचे प्रचारकही होते. त्यांना चित्रकला, कला, नृत्य आणि संगीताला बराच वाव दिला.  त्यांनी आपल्या वैयक्तिक आवडी-निवडी, दया आणि आदर्श प्रशासनाच्या माध्यमातून लोकांची मनं जिंकली. विजयनगर राज्याला १५२९ मध्ये कृष्णदेव रायाच्या मृत्यूनंतर उतरती कळा लागली. हे राज्य १५६५ मध्ये पूर्णपणे नष्ट झालं जेव्हा आदिलशाही, निजामशाही, कुतूबशाही व बारिदशाहींनी मिळून तालिकोटाच्या राम राईला पराभूत केलं. यानंतर हे साम्राज्य छोट्या छोट्या राज्यांत विभागलं गेलं