Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

गुणा - नटरंग (अतुल कुलकर्णी)

दिलीप प्रभावळकर प्रमाणे मेहनत घेवून अभिनय करणारा दुसरा अभिनेता म्हणजे अतुल कुलकर्णी. भूमिकेत शिरवे म्हणजे नक्की काय हे त्याच्या कडून शिकावे. नटरंग हा कदाचित त्याचा मास्तरपीस असावा. ह्या भुमिके साठी अतुलने आधी आपले वजन एखाद्या पहिलवाना प्रमाणे वाढवले आणि नंतर अत्यंत कमी केले. एक शरीर कमवलेला पहिलवान शेवटी नाच्या ची भूमिका करतो असा हा चित्रपट होता. एका पुरुषावर होणारा बलात्कार हे कदाचित मराठी किंवा भारतीय चित्रपट सृष्टीतील पहिलाच सीन होता.

अतुल च्या ह्या अजरामर भूमिकेला खूप पारितोषिके प्राप्त झालीच पण सर्व देशाचे आणि जगाचे लक्ष लावणी ह्या मराठी लोककले  कडे वळले.