Get it on Google Play
Download on the App Store

श्यामची आई (वनमाला देवी)

श्यामची आई कदाचित मराठी साहित्यातील सर्वांत जास्त लोकप्रिय पुस्तक आहे. साने गुरुजींच्या हृदयस्पर्शी आत्मकथेवर आधारित असे हे पुस्तक असले तरी त्यातील प्रमुख भूमिका मात्र त्याच्या आईची आहे. वात्सल्यसिंधू अश्या ह्या आईची भूमिका वनमाला बाई ह्यांनी वठवली होती. "भरजरी ग पितांबर" हे सुंदर गाणे त्याच्यावर चित्रित केले गेले होते आणि आज सुद्धा ते लोकप्रिय आहे.

वनमाला जी ह्यांचे खरे नाव सुशीलादेवी पवार असे होते. १९३० मध्ये व्ही शांताराम ह्यांच्या आग्रहाने त्या चित्रपट दुनियेत उतरल्या. त्या काळी चांगल्या घरातील स्त्रिया चित्रपट काम करण्यास दचकत असत. दुर्गा खोटे, देविका राणी ह्यांनी चित्रपटांत आपले नाव कमवायला सुरुवात केली होती. वनमाला देवींच्या ह्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आणि स्त्रियाना चित्रपट सृष्टीत मान मिळू लागला.