Get it on Google Play
Download on the App Store

दान !!

रक्तदान -
रक्त हे पाण्यापेक्षा घट्ट असतं. म्हणूनच रक्ताची नाती अधिक घट्ट असतात असं म्हटलं जातं. पण अगदी अनोळखी अशा एखाद्याशीसुद्धा आपण रक्ताचं नातं जोडू शकतो, ते रक्त दानामुळे. इतर कुठल्या दानधर्मानं "पुण्य' लाभतं की नाही माहिती नाही; पण रक्तदानामुळे एखादा जीव वाचवण्याचं पुण्य लाभू शकतं, यात शंकाच नाही.

नेत्रदान -
मृत्यूनंतरही मागे उरू शकेल अशी एक वस्तू प्रत्येकाकडे असते ती म्हणजे डोळे. डोळे कायमचे मिटले तरी त्यानंतर आपले डोळे कायमचे या जगात राहू शकतात- नेत्रदानामुळे. मरावे परि नेत्ररूपी उरावे! जाता जाता तुम्ही एखाद्या अंध व्यक्तीच्या नेत्रात प्रकाशाची ज्योत चेतवू शकता, त्याला हे सुंदर जग पाहण्यासाठी दृष्टी देऊ शकता, ही क ल्पना किती सुंदर आहे! नेत्रदानासाठी नातेवाइकांनी तत्परता मात्र दाखवावी लागते.

त्वचादान -
मरणोत्तर, पाठ, पोट आणि मांडीची, अशी सुमारे 40 टक्के त्वचा " रिकव्हर' केली जाते, ती निर्जंतुक जतनही करता येते. या त्वचेचा उपयोग गंभीररीत्या भाजलेल्या रुग्णांसाठी करता येतो.

किडनीदान -
स्वेच्छा "किडनीदाना'प्रमाणेच अपघातात मेंदू निकामी झालेल्या व्यक्तीच्या किडनींचेही दान करता येते. मात्र जोवर तिचे हृदय सुरू असते तोपर्यंतच.

देहदान -
प्रयोगशाळेतल्या संशोधनापासून ते एखाद्या अवयवाच्या वापरापर्यंत खूप उपयोग होतो. मरणाऱ्याच्या लक्षातही येत नसंल, की आपल्या देहदानामुळं विज्ञानात आणि जमलंच, तर एखाद्याच्या जीवनात, क्रांती होणार आहे. एखाद्याचे श्वास वाढणार आहेत;देहदानामुळं माणसाचे 22 अवयव कुणाला तरी उपयोगी पडतात; अर्थात, वेळेचं व बाकीचं गणित योग्य जमलं तर. खरं तर मृताला अग्नी देताना अनेक झाडांची कत्तल होते आणि शेवटी हातात पडते ती रक्षाच.

वरील सर्व मनाला पटते...पण स्वता: वेळ आली कि ???

लेख -  विनोद सावंत