Get it on Google Play
Download on the App Store

बुवाबाजीचा पर्दाफाश !!

या लेखांत वैज्ञानिक सत्य घेऊन आपल्यासमोर आलो आहोत. मला खात्री आहे गाव-खेड्याकडे कधी न कधी हा चमत्कार पाहून तुम्ही अचंबित झाला असाल आणि आता त्या मागचं गूढ जाणून ही अचंबिता चुटकी सरशी पळून जाईल याची खात्री आम्हास आहे. तर चला करूया पर्दाफाश बुवाबाजीचाचमत्काराचा.

चमत्काराचे नाव १ - रसाने भरलेल्या लिंबूतून अग्नीच्या ज्वाळा निघणे.
साधारण दोन-तीन महिन्यांपूर्वीची गोष्ट..!! मी काही कामानिमित्त कुर्ल्याला गेलो होतो. तिथे स्टेशनच्या बाहेर एक जादूगर जादूचे खेळ दाखवत होता. तितक्यात मध्येच एक मध्यमवयीन माणूस आला आणि त्या जादूगाराला चॅलेंज केले व म्हणाला-'' बच्चा,चल देखते है मेरी देवी पॉवरफुल है या तेरी..?? मै तेरी सारी शक्तीयां जलाकर राख कर देता हूँ..'' असं म्हणत त्याने खिशातून एक लिंबू काढला आम्हा प्रेक्षकांना दाखवला आणि कालिकामातेचा मंत्र जोरात म्हणत चाकूने तो आमच्यासमोर कापला नि खाली ठेवला, मंत्र म्हणत वेडेवाकडे हातवारे करू लागला आणि काय जादू लिंबातून अक्षरश: ज्वाळा निघू लागल्या. आश्चर्यचकित झालेल्या आणि भेदरलेल्या प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. पण रसाने पूर्ण भरलेल्या लिंबातून आग आलीच कशी..?? चला पाहूया.

मित्रांनो एक चाकू घ्या. चाकूच्या टोकास सोडीयम धातू घासून ठेवा. आता लिंबू डाव्या हातात घेऊन मुठीजवळील चाकूच्या पात्याने तो अर्ध्यापेक्षा जास्त कापा व चाकू अलगद बाहेर काढत फट बंद करा. लिंबावर दाब देत फट मोठी करताच अग्नीच्या ज्वाळा बाहेर पडतील.

मित्रांनो यात लिंबाच्या रसाचा सोडीयमशी संयोग होऊन हायड्रोजन मुक्त होतो. हायड्रोजन चटकन पेट घेतो व सोडीयम पिवळ्या रंगाने जळतो. म्हणून हि ज्योत आपल्याला चमकदार पिवळ्या रंगाची दिसते. फक्त लिंबू कापताना शरीरापासून दूर ठेवा.

चमत्काराचे नाव २ - पाण्याने दिवा कसा पेटू शकतो.
पाणी हे एक वैश्विक द्राव्य आहे. विश्वातल्या प्रत्येक प्राणीमात्राला जगण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. कोणत्याही रंगात व रूपात सहज मिसळून जाणारं हे पाणी...आगीचा शत्रू असणारं हे पाणी...पण मग पाण्याने दिवा पेटू शकतो काय..?? आपल्यादेशात अजूनही पाण्याने दिवा पेटवणारे बाबा आहेत. मग त्यांच्याकडे खरेच अद्भूत शक्ती असते काय..?? कि असतो परत एक वैज्ञानिक खेळ..?? चला पाहूया बरं पाण्याने दिवा कसा पेटू शकतो.

एका दिव्यात पाणी घ्या. त्यात एक ज्योत टाका, जरावेळ भिजू द्या. आता त्याला पेटवण्याचा प्रयत्न करा. पेटला का..?? अहो कसा पेटेल?? पाण्याने कधी आग पेटते का..?? पण आपल्याला तर दिवा पेटवायचाच आहे ते पण पाण्यानेच!! मग आता एक काम करा. या दिव्यात कॅल्शिअम कार्बाईडचे छोटे खडे टाका आणि पेटवा. दिवा आपोआप पेटेल. हे कसे झाले??

जेव्हा आपण पाण्यात कॅल्शिअम कार्बाईडचे खडे टाकतो तेव्हा त्यांची पाण्यावर अभिक्रिया होऊन 'अॅसिटिलीन' वायू तयार होतो जो ऑक्सीजनच्या सानिध्यात जळतो व पांढरी शुभ्र ज्योत तयार होते. आणि लोकांना वाटतं दिवा पाण्याने पेटला. तुम्हीसुद्धा करून पहा हे खडे तुम्हाला एखाद्या वेल्डरकडे सहज उपलब्ध होतील. मग कधी पेटवणार 'पाण्याने' दिवा..??

चमत्काराचे नाव ३- आपोआप त्या मेणबत्त्या पेटणे.
एकदा गावी गेलो तेव्हा मित्र सांगत होता, म्हणे-'' अरे गौरव, आपण आज त्या हनुमान मंदिरात जाऊ, तिथे ना एक बाबा आलेत ते संध्याकाळ झाली कि आपल्या दिव्य सामर्थ्याने मंदिरातले सारे दिवे हात ही न लावता पेटवतात..आम्ही स्वत: पाहिलंय ते..खरंच त्यांच्याकडे शक्ती आहे..'' आम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटलं. घरात चौकशी केल्यावर कळालं कि ते बाबा पूजा करून मंदिरात मेणबत्ती लावतात व मंत्राचा जाप सुरू करतात व आपोआप त्या मेणबत्त्या पेटतात, हा चमत्कार ते केवळ शनिवारी करतात. हे ऐकताना सगळा प्रकार हळूहळू लक्षात येत होता आणि त्या चमत्काराचं सत्यही, चला पाहूया बाबा ते कसं करत होते.

मित्रांनो चमत्कार सोपा आहे पण खूप काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला पिवळा फॉस्फरस व कार्बनडाय सल्फाईडचं द्रावण वापरायचं आहे. पिवळ्या फॉस्फरसचा ज्वलनांक केवळ ३४॰ से. असल्याने तो सामान्य तापमानातही लगेच पेट घेतो हे आपण दहावीत शिकलोय. तर या फॉस्फरसला कार्बनडाय सल्फाईडमध्ये विरघळवा. आणि तयार झालेल्या द्रावणात मेणबत्तीची वात भिजवा. कार्बनडाय सल्फाईड बाष्पनशील असल्याने तो हवेत उडून जातो व वातीवर फक्त पिवळा फॉस्फरस रहातो.. त्याच्या कणांना हवा लागली कि तो लगेच पेट घेतो पर्यायाने वातसुद्धा सहज पेट घेते आणि तुम्ही चमत्कारी बाबा ठरता.

चमत्काराचे नाव ४ -  लिंबातून अक्षरश: ज्वाळा निघू  लागणे.
परवाचीच गोष्ट मी काही कामानिमित्त कुर्ल्याला गेलो होतो. तिथे स्टेशनच्या बाहेर एक जादूगर जादूचे खेळ दाखवत होता. तितक्यात मध्येच एक मध्यमवयीन माणूस आला आणि त्या जादूगाराला चॅलेंज केले व म्हणाला-'' बच्चा,चल देखते है मेरी देवी पॉवरफुल है या तेरी..मै तेरी सारी शक्तीयां जलाकर राख कर देता हूँ..'' असं म्हणत त्याने खिशातून एक लिंबू काढला आम्हा प्रेक्षकांना दाखवला आणि कालिकामातेचा मंत्र जोरात म्हणत चाकूने आमच्यासमोर कापला नि खाली ठेवला आणि काय जादू लिंबातून अक्षरश: ज्वाळा निघू लागल्या आणि आश्चर्यचकित झालेल्या आणि भेदरलेल्या प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. पण रसाने पूर्ण भरलेल्या लिंबातून आग आलीच कशी..?? चला पाहूया.

मित्रांनो एक चाकू घ्या. चाकूच्या टोकास सोडीयम धातू घासून ठेवा. आता लिंबू डाव्या हातात घेऊन मुठीजवळील चाकूच्या पात्याने तो अर्ध्यापेक्षा जास्त कापा व चाकू अलगद बाहेर काढत फट बंद करा. लिंबावर दाब देत फट मोठी करताच अग्नीच्या ज्वाळा बाहेर पडतील.

मित्रांनो यात लिंबाच्या रसाचा सोडीयमशी संयोग होऊन हायड्रोजन मुक्त होतो. हायड्रोजन चटकन पेट घेतो व सोडीयम पिवळ्या रंगाने जळतो. म्हणून हि ज्योत आपल्याला चमकदार पिवळ्या रंगाची दिसते. फक्त लिंबू कापताना शरीरापासून दूर ठेवा.

चमत्काराचे नाव ५ -  अग्नीशिवाय यज्ञ पेटवणे.
योगी साधू आणि संधीसाधू यांच्यातला फरक आपण समजू शकत नाही म्हणूनच आपली फसगत होते, आणि हातात पश्चातापाशिवाय काहीच उरत नाही. आपल्या आजूबाजूला असे अनेक संधीसाधू आहेत जे चमत्काराच्या नावावर वैज्ञानिक खेळ करून आपले खिसे रिकामे करण्याच्या तयारीत आहेत. काल आपण एक चमत्कार आणि त्याचं वैज्ञानिक सत्य पाहिलं, आता आज एक पाहू.

अग्नीशिवाय यज्ञ पेटवणे-
या चमत्कारात मांत्रिक बाबा यज्ञाची सर्व सामग्री यज्ञकुंडात टाकतो पण आपल्या नकळत त्यासोबत नारळाची बुरी आणि कागदाचे तुकडेही टाकतो. मंत्राचा जाप करत तो त्यावर यज्ञात टाकावयाची विभूती व गायीचे तुप सोडतो आणि काय चमत्कार यज्ञ आगपेटीशिवाय आपोआप पेटतो आणि आपण धन्य होऊन बाबाला शरण जातो.

पण मित्रांनो खरी गंमत इथेच आहे मंत्र म्हणताना बाबा जी विभूती त्या न पेटलेल्या यज्ञावर टाकतो ती Potassium Permanganate (KMno4)ची बारीक पावडर असते व ती दिसायला काळी असल्याने कुणाला संशयही येत नाही. आणि गायीचे शुद्ध तुप हे ग्लिसरीनचे काम करते. ज्यावेळेस बाबा हे तुप त्या बुक्कीवर सोडतो तेव्हा Potassium permanganate वर ग्लिसरीनची प्रक्रिया होऊन निळसर धूर निघतो आणि यज्ञ पेट घेतो. आहे कि नाही जादू!!

काय मग मित्र-मैत्रिणीनो आवडले का वैज्ञानिक चमत्कार !!

लेखं- गौरव गायकवाड (मुंबई )