Get it on Google Play
Download on the App Store

स्वतःला कट्टर बौद्ध धम्मीय म्हणून मिरवणार्यानो जरा या प्रश्नांची उत्तरे द्या..??

• डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आपल्याला पितासमान असतात..नव्हे पित्याहूनही ते महान असतात. मग त्याच पित्याने दिलेल्या शिकवणूकीप्रमाणे आज तुमच्या पैकी किती जण वागता...??
• बाबासाहेबांनी दीक्षा सोहळ्यात २२ प्रतिज्ञा बौद्धांसाठी घालून दिल्यात; त्यांपैकी आपल्यातले कितीजण वागतात...??
• कितीजणांना त्या प्रतिज्ञा तोंडपाठ आहेत..?? किती जणांना त्याचे अर्थ उमगले आहेत..??
• 'मी हिंदू धर्माचा त्याग का केला..??' याविषयी डॉ. बाबासाहेबांचे असलेले विचार तुमच्या पैकी किती जणांनी वाचलेत..?? किंवा आपण हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध का झालो..?? याचे समर्पक उत्तर तुमच्या जवळ आहे काय..??
• आणि जर तुमच्याकडे याचे 'होय' असे उत्तर असेल तर मग या निरीश्वरवादी (म्हणजे ज्या धर्मात ईश्वराला स्थान नाही) अशा धर्माचे लोक मंदिरांत, पंड्या-पुजाऱ्यांच्या, बापू-बुवा-महाराजांच्या पायावर लोळण घेताना, उपास-तापास करताना का दिसतात..?? हा तुमच्या बापाचा व पर्यायाने त्यांच्या प्रचंड कष्टाचा, त्यांच्या शिकवणुकीचा अपमान नाही का..??
• ज्या चिखलातून वर काढून तुम्हाला बाबासाहेबांनी तुम्हाला पुरोगामी धर्माचं बोट दिलं ते पकडून तुमच्या पैकी किती जण चालत आहात..?? मला तर अजूनही तुम्ही त्याच मानसिक गुलामगिरीत अडकून पडलेले दिसता हा सुद्धा त्या उद्धारकर्त्या बापाचा अपमान नाही का..??
• "मला माझ्या शिकल्या सावरल्या लोकांनीच जास्त धोका दिला" असे बाबासाहेब म्हणाले होते याचे कारण तुमच्या सारखे गद्दारच आहेत असे तुम्हाला कधीच वाटत नाही काय..??
• एकेकाळी जगात नावलौकिक असणारा बौध भिक्खु संघ आज केवळ विहारांपुरताच मर्यादित राहिला आहे..दयनीय अवस्थेत जीवन जगतो आहे याला कारण त्यांच्या बद्दल आपल्यात असणारी उदासीनताच कारणीभूत आहे असे आपल्याला वाटत नाही काय..?? मग तुमच्या "संघं सरणं गच्छामि" म्हणण्याला अर्थ तो काय..??
• आत्मा, भूत यांच्या बाधेला भिउन टुकार तांत्रिक, मांत्रिक यांच्याकडे जाऊन धागे-दोरे, लिंब-टिंब, कोंबडे-बकरे अर्पण करणारे तुमच्यातले बौद्ध आत्मा आणि भूत यांचे अस्तित्व झुगारून देणारा भगवान बुद्ध आणि त्याच वाटेने जाणारे डॉ. आंबेडकर यांचा उघडपणे अपमान करीत नाहीत काय..??
• तुमच्या पैकी किती जण पंचशिलाचे पालन करतात..?? किती जणांनी दहा पारमिता अवलंबल्या आहेत..??
• केवळ 'कडक निळा जय भीम' किंवा 'जय बुद्ध' बोलले कि आपल्याला सारा धम्म कळाला आणि आपण कट्टर झालो असे तुम्ही समजता काय..?? आणि असे असेल तर ते किती बालीशपणाचे आहे याची तुम्हाला जाणीव आहे काय..??
• खरा बुद्ध किंवा खरे बाबासाहेब जाणून घेण्याचा प्रयत्न तुमच्या पैकी किती जणांनी केलाय..?? त्यांचे किती साहित्य तुम्ही वाचले आहे..?? आत्मसात केले आहे..??
• तेव्हा आधी स्वतः स्वतःला या प्रश्नाची उत्तरे विचार..कारण जर तुम्हीच अजून स्वतःच्या धम्माचे काटेकोरपणे पालन करत नसाल तर इतर कुणालाही नावे ठेवण्याचा तुम्हाला काहीही नैतिक अधिकार राहत नाही हे लक्षात ठेवा. कारण एखाद्या महापुरुषाचा त्याचे अनुयायी जितका विपर्यास करतात तितका तो दुसरे कुणीही करत नाहीत हे लक्षात ठेवा.
• आधी स्वतः घडा नि मग इतरांना घडवा..

- विशेष टीप:- बौद्ध धर्मातील काही खटकणाऱ्या गोष्टींवर आम्ही हि टीका केली आहे, ज्याची प्रामाणिक उत्तरं आम्हाला किथे असणार्या बौद्ध तरुणांकडून हवी आहेत. तेव्हा केवळ स्वतःला कट्टर बौद्ध म्हणून मिरवणाऱ्याणी याची उत्तरे द्यावीत. व्यर्थ वाद घालू नये व विषय भरकटू देऊ नये.

- गौरव गायकवाड , मुंबई