Get it on Google Play
Download on the App Store

कल्याणच्या सुभेदाराची सुन !!

शिवाजी महाराजांचा सरदार आबाजी सोनदेव हा कल्याणच्या सुभेदाराची सूंदर सुन शिवरायांसाठी नजराना म्हणुन घेऊन येतो, तेंव्हा शिवाजीमहाराज तिच्या सौंदर्याचे तोंडभरून कौतुक करतात, आपली माता जिजाऊंच्या सौंदर्याशी तिच्या सौंदर्याची तुलना करतात व तिला सन्मानपुर्वक परत पाठवतात, अशी कथा शिवचरित्रात सांगितली जाते. पण ही कथा खरी की खोटी याचा तपास कथा सांगणारे घेत नाहीत. ही कथा सांगण्यामागील कथाकाराचा काय उद्देश आहे हे देखील कथा सांगणारे विचार करीत नाहीत.

छत्रपती शिवाजी महाराज चरित्रसंपन्न राजे होते, हे खाफ़ीखानाने देखील लिहिलेले आहे.याचा अर्थ शिवाजी महाराज चरित्रसंपन्न राजे आहेत हे शिवरायांच्या शत्रुला देखील माहीत होते. म्हणजे शिवरायांच्या मावळ्यांना,सरदारांना माहीत असणार हे निश्चित.

तरी शिवरायांचा सरदार आबाजी सोनदेव शिवरायांसाठी नजराणा म्हणुन कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला घेऊन येतो असे सांगण्यामागे कथाकाराचा उद्देश काय ? कथेद्वारे शिवरायांना व्यभिचारी ठरविण्याचा हा कट आहे. तिच्या सौंदर्याचे शिवराय वर्णन करतात "अशीच आमुची माता असती सुंदर रुपवती । आम्हीही सुंदर झालो असतो वदले शिवछत्रपती" म्हणजे अशीच आमुची माता असती तर आम्ही सुंदर झालो असतो असे शिवाजी महाराज म्हणतात असे सांगितले जाते. सर्वात महत्वाचे असे आहे की, जगात कोणताही विवेक पुत्र स्वत:च्या आईच्या सौरंर्याची तुलना इतर स्त्रियांशी करणार नाही. स्वत:ची आई कुरुप असो अथवा सुंदर असो प्रत्येकाला स्वत:च्या आईबद्दल नितांत आदर असतो. जिजाऊ माता सुंदर होत्या ही वस्तुस्थिती आहे. जयराम पिडे "राधामाधवविलासचंपू" या ग्रंथात जिजाऊचे वर्णन करताना लिहितात.

जशी चंपकेशी खुले फ़ुल्लजाई ।
भली शोभली ज्यास जाया जिजाई ।
जिचे किर्तीचा चंबू जंबूद्विपाला ।
करी साऊली माऊलीसी मुलाला

शिवभारतकार परमानंद जिजाऊमाता यांच्या सौंदर्याबद्दल लिहितात, जिजाऊ लावण्यवती असुन भुवया धनुष्याप्रमाणे, डोळे पाणीदार, कान सोन शिंपल्यासारखे, नाक सरळ, मुख प्रफ़ुल्लीत कमळासारखे सौंदर्य , परमानंद शिवरायांच्या बद्दल लिहितात, त्यांचे लावण्य अपार, वर्ण सुवर्णासारखा, शरीर निरोगी, नेत्र कमळासारखे, नासिक पळसाच्या पुष्पासारखी, मुख स्वभावातच हसू, बाहु मोठे, मोहक शरीर यष्टी.

जिजामाता सुंदर होत्या, त्या कुरुप असत्या तरी त्यांच्या योग्यतेला, कर्त्रुत्वाला कमीपणा येत नाही.पण त्या संदर होत्या ही वस्तुस्थिति आहे.शिवाजी महाराज देखील सुंदर होते.हे समलाकालीन परमानंदाने लिहिलेले आहे. त्यामुळे माझी आई सुंदर असती तर मिहि सुंदर झालो असतो असे शिवाजी महाराज म्हंटले नाहीत.

रयतेच्या कल्याणाचा विचार सोडुन व्यक्तिगत सौंदर्याकडे लक्ष देणारे शिवाजी महाराज म्हणजे कोणत्या चित्रपटातील अभिनेता नव्हते. मित्र-मैत्रिणीनो मनुवादी लेखक , कवी , यांचा डाव ओळखा कोणत्याही कथेवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका....

आपण एक समान्य नागरिक असून आपण आपल्या आईची तुलना कुणासोबत करत नाही मग युगपुरुष शिवाजी महाराज कशी तुलना करतील ?

जय जिजाऊ... जय शिवराय... जय शंभूराय.... जय भारत !!

लेखं - मराठी कट्टा.
मूळ लेख इथे वाचा - http://marathikattaa.blogspot.in/2012/06/blog-post_5910.html