Get it on Google Play
Download on the App Store

माझ्या आजीशी झालेला माझा संवाद... (खास खान्देशी बोली भाषेत)

आजी:- आजकाल हा भलता येडाचाया निन्घाला भो.
मी:- काय झाल वो माय
आजी:- अरे भाऊ हे पोरगी पाहन डीएड झाली म्हणे आन पारायण करून राहली कशाची ? कशी होत चालली,तब्येत ठिकाणावर नही अन पारायण करयाल्ये चालली !
मी:- आजी ह्या आजकालच्या मुली लयच व्रत आणि पारायणे करतात तुह्या टायमाले तुम्ही अश्याच पारायणे करेत का ?
आजी :- अरे भाऊ खायाले भाकर भेटेना ,आताच निघाले हे येडेचाये..
मी:- नाही तर काय !
आजी :- अभ्यास करयाची बोंबाबोंब
मी:- मा, तू आयुष्यात एकबी पारायणे करली नाही का ग ..
आजी :- नही
मी :- तरीबी तुहे सर्व पोर नातू नोकरी-उद्योग व्यवस्थित करताहे आणि तुले कुठेच कमी पडू देता नाहीये
आजी :- बरोबर हाये भाऊ !
मी :- मा , ते वैभव्लक्ष्मि चे व्रत कधीच केले नही का ?
आजी :- अरे ! आतच निघाले हे ,आम्ही ज्याच्या पोटात भाकरी नसते त्याला पहिले भाकरीच पाहण् पडते ...सकायले उठून स्वयंपाक,धुणे पोर्यांची तयरी करून शेतात बल्दिंगा खण्याले जान पडे...ते झाल्यावर ज्वारी भेटे ते रात्री दळून सकाळी पाणी भर्याले जान पडे तव्हा पुन्हा स्वयंपाक सुरु व्हये एव्हढ्या गर्बळ मधी कश्याच व्रतवैकल्य भाऊ कष्ट केल्याशिवाय काही भेटते का रे ?
मी :- मा ,मग तरी बी तुह्ये सर्व लेक नोकरीवर कशे लागले काही पारायण न करता..
आजी :- भाऊ ! भाकर भेटत नही व्हती ,पण पोरान्ले शिकविले ...घरी राहू दिले नाही ... शिकल्याशिवाय उद्धार नाही रे भो ! शिकले नसते ते कसले पुढे गेले असते..
 (मित्रांनो-मैत्रिणीनो ! तुमच्यासाठी ).....
माझ्या आजीने कष्ट करून माझ्या काकांना शिकविले आणि आमचे घर पुढे नेले... माझ्या आजीला जे समजले ते आजच्या तरुण -तरुणींना लक्षात येईल काय ?
आणि पारायणे करणे म्हणजे काय तर एखादा दंतकथांवर आधारित ग्रथ ९ किंवा ११ दिवस वाचणे...

मग आता पारायणे करायचीच असली तर.....
डॉ.आ.ह.साळुंखे सरांच्या "बळीवंश" & "सर्वोत्तम भूमिपुत्र गोतम बुद्ध" चे करा ...तुकाराम गाथेचे करा ...
महात्मा फुले समग्र वांग्मय चे करा , बहुजन महामानवांच्या चरित्राचे पारायणे करा,
बाबासाहेबांच्या राज्यघटनेचे पारायणे करा ..तुमच्या आमच्या घराघरात घटनातज्ञ झाल्याशिवाय राहणार नाही ...
शिवचरित्र वाचा... संभाजी राजेंनी लिहलेले बुद्धभूषण वाचा मदन पाटलांनी लिहलेला "जिजाऊसाहेब", डॉ.जयसिंगरावपवारांनी लिहलेले "राजर्षी शाहूस्मारक ग्रंथ" चे पारायणे करा...
शिवराय-शंभूराजे-फुले-शाहू-आंबेडकर-प्रबोधनकार-कर्मवीर-गाडगेबाबा-अण्णाभाऊ साठे-उम्माजी नाईक-जिजाऊ-अहिल्यामाई होळकर-सावित्रीमाई-फातिमा बी शेख(१ल्या मुस्लीम स्त्री शिक्षका ) झलकारीबाई कोळी,वीर भगतसिंग आणि तमाम महामानवांच्या चरित्रात इतकी प्रचंड ताकद आहे की जगातील कुठल्याच संकटापुढे ती झुकणार नाही .....
जगातील शास्त्रज्ञानाचे कार्य समजून घ्या कदाचित तुमच्याही घरात एखादा 'शास्त्रज्ञ' जन्माला येईल आणि जगाचा चेहरा मोहरा बदलून टाकेन..सृष्टीला पुनः हिरवेगार करायचा असेल तर ते काम विज्ञानच करू शकते हे मी माझ्या "निसर्गप्रेमी व्हा ! खरे विज्ञानवादी ह्या लेखात मांडलेले आहे"
ज्याला जग बदलायचे आहे ,त्याने प्रथम स्वत: बदलले पाहिजे ! चला तर मग बदल स्वत:पासून घडवूया !
लेखं - सुनील चौधरी (जळगाव.)