Get it on Google Play
Download on the App Store

पामेला जैक्सन आणि चेरिल मिलर

 सत्य नेहमी दिसतं तेवढं भयावह नसतं. जेव्हा पामेला जैक्सन आणि चेरिल मिलर १९७१ ला एका पार्टीत जाताना गायब झाल्या तेव्हा सगळ्यांना वाटलं की त्यांच्या बरोबर काहीतरी अशुभ घटना घडली असावी. पण २०१४ मध्ये जवळच्याच ब्रुले क्रीकच्या पाण्याची पातळी कमी झाली आणि त्यांची गाडी तिथे पाण्यात सापडली. त्यांच्या मृत्यूशी दारूचा किंवा इतर कुठल्या गैरव्यवहाराचा संबंध नव्हता. ती फक्त एक कार दुर्घटना होती. या केसमधली सर्वात वाईट गोष्ट ही होती की ज्या माणसाने हा गुन्हा कधी केलाच नव्हता त्याला जवळपास दहा वर्ष तुरूंगात काढावी लागली कारण जेलच्या एका खबऱ्याने त्याची खोटी साक्ष सांगितली होती. त्या खबऱ्याने एक टेप ऐकवली होती ज्यात डेविड ल्युकेन दोन्ही मुलींना मारायच्या गोष्टी करत होता. पण तो आवाज ल्युकेन चा वाटत नव्हता. ल्युकेनला आता सोडण्यात आलं आहे आणि तो आता राज्याविरूद्ध ४००००० डॉलरचा खटला लढतो आहे.