Get it on Google Play
Download on the App Store

मिन्नी आणि एडवर्ड मौरीन

 अनेक लोकांसाठी ख्रिस्मस सद्भावना, प्रेम, आणि आनंदाचा सण असतो. पण १९८५ मध्ये वॉशिंग्टनच्या एका छोट्या शहरात, चहलीसमध्ये, असं नाही झालं. सहाच दिवस आधी ए़डवर्ड मौरीन आणि त्याची बायको मिन्नी गायब झाले. ते दोघे क्रमशः ८३ आणि ८१ सालचे होते. साक्षीदारांनी जोडप्याची गाडी पाहिली जिच्यात चाव्या लावलेल्याच होत्या आणि रक्ताचे डागही होते. डिटेक्टीवांकडे खुनी असण्यासारखे दोन संशयी होते- रिफ्फे भाऊ रिक आणि जॉन. पण त्यांना अटक करण्यासाठी तसं काहीच कारण नव्हतं. साक्षीदार त्यांच्या विरूद्ध साक्ष द्यायला तयार नव्हते कारण ते दोघेही कुप्रसिद्ध गुंड होते. जवळ-जवळ ३० वर्षांनतर वॉशिंग्टन राज्याच्या वकिलांकडे पुरेसे पुरावे जमले ज्यामुळे त्यांना अटक करणं शक्य झालं असतं. त्यांना अटक करण्यासाठी अलास्काला येण्याच्या एकंच आठवडा आधी जॉन रिफ्फेचा मृत्यू झाला. रिकचं नशिब एवढं चांगलं नव्हतं. ६ आठवडे ही केस चालली आणि रिक रिफ्फेला या दोघांच्या खुनाशिवाय आणखी ७ खुनांचा आरोपी मानलं गेलं. त्याला १०३ वर्षांची शिक्षा झाली. मौरीन परिवाराचे जवळपास ५० मित्र आणि नातेवाईक निर्णय ऐकण्यासाठी त्या दिवशी न्यायालयात पोहोचले. रिफ्फेच्या बाजुने त्याच्या वकिलांशिवाय इतर कोणीच हजर नव्हतं.