Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

जगातील सर्वात विश्वसनीय भूतांचे अनुभव : क्रेइस्चेर मेन्शन –स्टेटन आइलैंड न्यू यॉर्क

न्यू यॉर्क येथील क्रेइस्चेर परिवार १८०० मध्ये एका मोठ्या वीट भट्टीचा मालक होता जो पूर्ण स्टेटन आयलंड क्षेत्रात विटा पुरवत असे. या धंद्यातून झालेल्या फायद्यात त्यांनी दोन मोठी घरे बांधून घेतली. एक कुटुंबातील मूळ सद्स्यासाठी व दुसरे त्यांचा मुलगा आणि नवीन पत्नी साठी.

 

त्या बाप-बेट्यात त्यावेळीस चाललेली भांडणे शिगेला पोहचली आणि नाते पुन्हा पूर्ववत होण्याची चिन्हे दिसत नव्हती. एका संध्याकाळी दुसऱ्या घरात ज्यात मुलगा आणि नवीन पत्नी राहत असे त्यात अचानकपणे आग लागली आणि पूर्ण घर जळून खाक झाले त्यात मुलगा आणि पत्नी मृत्युमुखी पडले. घराची पुन्हा निर्मिती केली आणि त्या ठिकाणी एक रेस्टोरंट सुरु केले गेले. असे म्हणतात कि आजही या घरात मुलगा त्याची आई आणि एक आचारी ज्याने १९ व्या शतकाच्या सुरवातीला आत्महत्या केली होती यांची भुते आढळतात. या इमारतीत नेहमीच भुते दिसतात आणि त्यांचे आवाज ऐकू येत असतात.

 

रेस्टोरंट आणि इमारतीतील अनेक पाहुणे आणि कर्मचारी यांना चित्रविचित्र भुते दिसल्याचा ते दावा करतात. त्याचप्रमाणे दरवाजे आपोआप बंद होणे, वस्तू हवेत उडणे अशा खबरा ऐकू येत असतात. या इमारतीच्या नव्या मालकांनी रोज नवे भुताटकीचे अनुभव ऐकल्याचे मान्य केले आहे.

 

भूत : सत्य की असत्य

भयकथा संपादक
Chapters
भूमिका
भूत म्हणजे काय?
परस्पर संवादात्मक व्यक्तिमत्व प्रकार
स्पष्ट झलक
जीवंत व्यक्तीचे भूत
निर्जीव वस्तु भूत
प्राण्यांची भुते
अमानवी भुते
अनेकपतिका
भूतांचे फोटो, आकृती, प्रकाशग्रह, चक्र आणि पूर्ण शरीर
जगातील सर्वात विश्वसनीय भूतांचे अनुभव : द गुर्डोन लाइट
जगातील सर्वात विश्वसनीय भूतांचे अनुभव : बोरले रेक्टोरी
जगातील सर्वात विश्वसनीय भूतांचे अनुभव : ब्राउन लेडी ऑफ़ रायन्हम हॉल
जगातील सर्वात विश्वसनीय भूतांचे अनुभव : मोस बीच डिस्टिलरी – मोस बीच कैलिफ़ोर्निया
जगातील सर्वात विश्वसनीय भूतांचे अनुभव : विंचेस्टर मिस्ट्री हाउस – सन होसे कैलिफ़ोर्निया
जगातील सर्वात विश्वसनीय भूतांचे अनुभव : क्रेइस्चेर मेन्शन –स्टेटन आइलैंड न्यू यॉर्क
जगातील सर्वात विश्वसनीय भूतांचे अनुभव : लेम्प मेन्शन एंड ब्रेवरी – सेंट लुइस मिस्सौरी
जगातील सर्वात विश्वसनीय भूतांचे अनुभव :बुलक होटेल – डेड वुड साउथ डकोटा