Get it on Google Play
Download on the App Store

निझाम - उल - मुल्क सोबत संघर्ष

निझाम-उल-मुल्क-उददिन-खान , असिफ झा I, दख्खन चे मुघल व्ह्वाइसरॉय ( निझाम - उल - मुल्क ) (ज्यांचे वास्तव्य हैदराबाद इथे असे ). ज्यांना मुघल साम्राज्याच्या दुबळ्या नियंत्रणाची जाणीव झालेली होती, त्यांनी दख्खन मध्ये स्वतःचे स्वतंत्र राज्याची स्थापना करण्याचे ठरविले होते.

निझामाने दख्खन प्रदेशमधील चौथाई देण्याकडे मराठ्यांच्या हक्का कडे दुर्लक्ष केले. शांततेमध्ये समझोता करण्याचे सुरुवातीचे प्रयत्नहि  (चिखलठाणा तहाची बोलणी करण्यासाठी बोलावलेली सभा 1721) दिल्ली कोर्टाच्या मुघल-मराठा तहाच्या पुन्ह्पुष्टी केल्या नंतर सुद्धा फिसकटले. पण १७२२ मध्ये , निझामाच्या मनातील सुप्त इच्छा मुघल साम्राज्यासमोर उघडकीस आल्या आणि त्या नंतर मुहम्मद शाह ने निझामाला बाजूला करण्यास सुरुवात केली. निझामाने उघडउघडपणे मुघल साम्राज्य विरुद्ध बंड पुकारले आणि हैदराबाद राजधानी घोषित करून त्याने स्वतःचा असा स्वतंत्र मुलुख जाहीर केला. मुबारीझ खान च्या नेतृत्वाखाली जेंव्हा साम्राज्याच्या सैन्याने दिशाभूल झालेल्या निजामाला पकडण्याचा प्रयत्न केला, तेंव्हा आपल्या जुन्या शत्रूंकडून , मराठ्यांकडून मुहम्मद शाह ने मदतीची मागणी केली आणि मराठ्यांच्या  आधीच्या केलेल्या सगळ्या मागणींची पूर्तता करण्यासाठी सहमती दर्शविली. शाहू नि निजामाला बाजीरावांची आकस्मिक मदत पाठविली. १७२४ मध्ये साखरखेडा येथे त्यांच्या सामाईक लष्कर सैन्याने शाही सैन्याला जिंकून घेतले.

निझामाने संभाव्य धोका पाहून पळ काढला, आणि मराठ्यांच्या सन्मानाच्या शब्दांना नाकारून पुन्हा एकदा मराठ्यांना डिवचून दिले. त्याने याशिवाय कोल्हापूर चे संभाजी दुसरे , चंद्रसेन जाधव, उदाजी चव्हाण आणि राव रंभा निंबाळकर यांच्याशी संधान साधून शाहू विरुद्ध टेकू लावून घेतला. जेंव्हा पेशवा आणि त्यांचे सैन्य दक्षिणेमध्ये चौथाई वसूल करण्यास गेले, (१७२७ मध्ये ), त्या वेळेस निझामाच्या सैन्याने आश्चर्य कारक पणे पुण्यावर हल्ला केला आणि  दुसरे संभाजी यांना छत्रपती म्हणून स्वीकारलेले जाहीर केले.(सातारा मध्ये हि धोक्याचे वातावरण पसरले आणि सासवड जवळील पुरंदर किल्यामध्ये स्वतः शाहुना प्रवेश नाकारला गेला.)