Get it on Google Play
Download on the App Store

२००६ नोएडा खून मालिका

२००५ आणि २००६ मध्ये भारतातल्या नोएडा शहरामध्ये, मोनिंदर सिंग पंधेर यांच्या निठारी येथे  राहत्या घरात नोएडा खून मालिका चे सत्र झाले. (निठारी खून मालिका किंवा निठारी कांड या नावाने हि ओळखले जाते). सध्याच्या परिस्तिथिमधे त्यांचा नोकर सुरिंदर कोली यावर पाच हत्यांचे दोषारोप ठेवण्य आले आहेत आणि त्याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे जी अपील केल्यानंतर जन्मठेपेची शिक्षा केली गेली आहे. ११ हत्या पुढील अधिकृत कारवाई च्या कारणास्तव उलगडलेल्या नाही आहेत. सुरिंदर कोली ची फाशीची शिक्षा सुप्रीम कोर्टाकडून ७ सप्टेंबर २०१४ रोजी जन्मठेपेच्या शिक्षेमध्ये रतबदल करण्यात आली आहे.

डिसेंबर २००६ मध्ये दोघा निथारींनी असा दावा केला कि त्यांना मागील दोन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या दोन मुलांचा ठावठीकाणा ठाऊक आहे. महापालिकेची पाण्याची टाकी घर क्रमांक ५ च्या मागे. दोन्ही बेपत्ता मुली होत्या आणि त्यांचा संशयित सुरिंदर कोली जो कि  D५ घरामध्ये घरगुती कामासाठी होता, आणि नक्कीच या मुलींच्या बेपत्ता होण्यामागे त्याचा काही तरी हात होता . राहिवाशिंच अस म्हणन होत कि त्यांना स्थानिक अधिकाऱ्यांकडून वारंवार दुर्लक्षिले गेले होते आणि म्हणून च त्यांनी माजी निवासी वेल्फेअर असोसिएशन  चे अध्यक्ष एस सी मिश्रा यांची मदत घेतली. त्या दिवशी सकाळी , मिश्रा  यांनी दोन राहिवाशिंबरोबर पाण्याची टाकी निचरा करून शोध घेतला त्या वेळेस एका रहिवाशाने त्या ठिकाणी एक विघटीत हात सापडला असल्याचा दावा केला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना बोलावणे केले.

बेपत्ता असलेल्या मुलींच्या चिंताक्रांत पालकांनी मुलींची छायाचित्रे घेऊन निठारी कडे धाव घेतली. कोली उर्फ सतीश ने नंतर सहा मुलांची आणि एका २० वर्षीय पायाल नामक तरुणीची लैंगिक मारहाण करून हत्या केल्याचे कबूल केले.

२००५ च्या सप्टेंबर मध्ये NDTV चा वार्ताहर ओमकार सिंघ जनोती याने या विषयावर अहवाल करण्यास सुरुवात केली. त्याने बेपत्ता झालेल्या मुलान्वारती एक मालिका बनवली होती. त्याने अनेक कुटुंबा च्या मुलाखती हि घेतल्या.  त्याने बेपत्ता मुलांच्या कुटुंबियांना पोलिसांकडून दुर्लक्षिले गेल्याचे आरोप केले. सुरुवातीला, नोएडा शहराच्या पोलीस अधीक्षक सह काही पोलीस अधिकारी नि अशा कोणत्याही प्रकारची  गुन्हेगारी  नाकारलि. आपल्या मुलांची चुकीची वये सांगितल्या बद्दल त्यांनी पालकांनाच दोषी ठरवले.  पोलिसांनी गहाळ केसेस चा आणि बेपत्ता मुलांचा काही एक संबध नसल्याचे सांगितले.पोलिसांच्या सांगण्या नुसार ती सगळी मुले जाणती होती आणि पालकांशी भांडण झाल्यानंतर घर सोडून निघून गेली होती. रहिवाश्यांनी पोलिसांवर भ्रष्ट असल्याचा आरोप केला आणि त्यांची बड्या लोकांशी हामिलावानी असल्याचे सांगितले. या संदर्भात स्वंतत्र पणे चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली. एका राहिवाश्याने तर असा हि दावा केला होता कि , स्थानिकांनी जे मृतदेह खणून काढले होते त्याचे श्रेय हि पोलिसांनीच लाटले. पोलिसांनी पंधरा मृतदेह सापडल्याचे वृत्त फेटाळले. या उलट त्यांनी असे सांगितले कि त्यांना कवटी , हाडे, आणि इतर अवयव चे भाग सापडले आहेत, आणि मृतदेहाचा निश्चित आकडा त्यांना देणे शक्य नाही. बळी गेलेल्यांची ओळख आणि आकडा DNA चाचणी च्या विश्लेषणं नंतरच सांगता येईल. पोलिसांनी नंतर त्या घराला कुलुपबंद केले आणि माध्यमांना कोणत्याही प्रकारे त्या जागेच्या आसपास जाण्यास मज्जाव केला.

केंद्र  सरकारने शेष कंकाला च्यासंबधी शहानिशा करण्याचा प्रयत्न केला आणि हा “राज्य अंतर्गत प्रश्न आहे का हे पहिले." कायदा आणि सुव्यवस्था हे राज्यांतर्गत येतात पण गृह मंत्रालयाने गुन्ह्याच्या आवाक्या बद्दल माहिती विचारली.

हे नंतर उघडकीस आले कि पायलच्या बेपत्ता होण्यावरून २६ डिसेंबरला कोली चा मालक मोनिंदर सिंग पंधेरला आणि २७ डिसेंबरला कोलीला पोलिसांनी पकडले होते. कोलीच्या कबुली जबाब नंतर पोलिसांनी आसपास च्या भागात खोदकाम केले आणि मुलांचे मृतदेह सापडले असा दावा केला.

जेव्हा रागावलेल्या स्थानिक लोकांनी अपराधी च्या घराचा ताबा मागितला तेव्हा ३१ डिसेंबर रोजी खून मालिके संदर्भात दोघा पोलिस अधिकार्यांना निलंबित करण्यात आले. जेंव्हा मुले बेपत्ता झाली आहे असे सांगण्यात आले तेंव्हा कर्तव्यामध्ये हयगय केल्या प्रकरणी स्थानिकांकडून झालेल्या आरोपांवर कोणतीही कारवाई न करणे या कारणाने त्यांना निलंबित केले.

निठारी मधील परिस्तिथी खराब झाली होती जेंव्हा संतप्त जमावाने आणि पोलिसांनी आरोपीच्या घरासमोर एकमेकांवर दगड फेक केली पोलिसांनी माया नामक एका नोकरानीला मोठा उद्योगपतींना महिला पुरवण्याच्या कामामध्ये हात असल्याच्या संशयावरून ताब्यात घेतले. जसजसे आजुबाजू च्या परिसरामध्ये खोदकाम चालू झाले तसतसे अजून मृतदेह आणि अवयव सापडले, शेकडो स्थानिकांनी इथे मानवी देहाचा अजागळ व्यापार होत असल्याचा आरोप केला. पंधेरी च्या घराजवळ राहणारा एक डॉक्टर नवीन चौधरी याला स्वतःच्या हॉस्पिटल मध्ये काही वर्षांपूर्वी किडनी विकण्याच्या आरोपावरून सशयित केले होते. त्याची मालमत्ता आलेल्या सगळ्या जागांवर खोदकाम करण्यात आले पण या प्रकरणाला संपुष्टी देणारे काहीही हाताशी आले नाही.

बळी गेलेल्या चे अवशेष संबधात चौकशी साठी आणि तपास पुढे चालू ठेवण्य साठी तपासाकानी केलेल्या मागणी नुसार १ जानेवारी २००७ रोजी रिमांड मेजीस्त्रेत ने या दोघांच्या पोलिस कोठडी मध्ये १० जानेवारी २००७ पर्यंत वाढ केली. कोर्टाने नार्को चाचणी साठी हि परवानगी दिली. त्याच दिवशी संध्याकाळी पोलिसांनी पंधेरी च्य चंदिगढ निवास स्थानावर रेड मारली.त्याच्या मुलाकडे आणि बायको कडे चौकशी करण्यात आली आणि पान्धेरीच्या सवयींबद्दल विचारणा केली.पोलिस सूत्रांनी त्यांचे त्याच्या सोबत चे संबध अनैसर्गिक असल्याचा खुलासा केला जे कि नंतर खोटे असल्याचे उघडकीस आले.त्याचे वर्तन सामान्य होते. एका वरिष्ठ पोलिस अधिकार्याने असे सांगितले कि, त्याच्या लुधियाना येथील मालामत्तेच्या  आणि आसपास च्या जागेवर शोध सत्र चालू होईल. नजीकच्या मुलांच्या अपहरण संदर्भात पंधेरी च्या चंदिगढ येथील घराची पुन्हा एकदा छाननी करण्यात आली पण काही हाताशी आले नाही.

दुसर्या दिवशी गावामध्ये सापडलेल्या सतरा पैकी पंधरा सांगाड्यांची  ओळख पटली. त्यापैकी दहा ची ओळख छायाचित्रे दाखवल्या नंतर कोली ने सांगितली आणि उर्वरित पाच जणांना त्यांच्या वस्तूंवरून सम्बधीतानी ओळखले. धडांची मुंडकी गायब होती आणि तपासनीस या गोष्टीचा शोध घेत होते कि या हत्यान्मागाचा हेतू डोक्याच्या अवयावासाठी करण्यात आलेला खून असू शकतो का. पोलिस नि दिलेल्या वृत्त नुसार तिथे किमान ३१ मुलांचे बळी गेले.

दोन दिवसांच्या अहिंसे च्या अनुभवा नंतर पोलिसांनी पंधेरीच्या घराचा आसपास आणखी गोंधळ होण्याच्या वर्तवलेल्या शक्यतेनुसार पोलिस बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आली. पत्रकार परिषदेमध्ये भारताच्या मुख्य न्यायमूर्तीनी वाय. के. सबरवाल यांनी, तपास अजून प्राथमिक स्तरावर च आहे आणि सध्या तरी कोर्ट किंवा सीबीआय यांचा सहभाग नाही आहे असे वृत्त दिले.

तथापि, केंद्र  सरकारने अहवाल आणि तपास काळात एका उच्च स्तरीय चौकशी समितीची पोलिस चौकशी दरम्यान निसटलेल्या गोष्टींसाठी नेमणूक केली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मुलायम सिंघ यादव यांनी , सीबीआय ला यामध्ये गुंतावान्या आधी या समितीच्या चौकशी अहवालाच्या निकालाची आपण वाट पाहणार असल्याचे वृत्त दिले. संदर्भ अटींनुसार हि समिती संयुक्त सचिव, महिला व बाल विकास मंत्रालय, मंजुळा कृष्णन यांच्या नेतृत्वाखाली होते,
• हि समिती बेपत्ता झालेल्या मुलांच्या शोधासाठी नोएडा पोलिसांनी केलेल्या शोध कार्याचा आढावा घेईल.
• बेपत्ता झालेल्या मुलांचा आणि कुटुंबियाचा समेट घडवून आणण्या च्या कार्यामध्ये स्थानिक प्रशासनाकडून प्रदान केल्या गेलेल्या पातळीच्या मदतीचा आढावा घेईल.
• हि समिती आरोपीच्या या मागील हेतू जाणून घेण्या साठी विशेष पद्धतीचा अवलंब करेल.

पॅनल ने स्वतः भेटी देऊन कुटुंबियाचे जबाब घेतले जरी पोलिसांनी या गोष्टीला पुष्टी दिली होती कि सतरा पैकी ठार झालेल्या दहा बळी मुली होत्या. लैंगिक अत्याचार झालेल्या आठ पालकांना प्रत्येकी १२ लाखांची नुकसान भरपाई मिळाली. बळींची ओळख पटविण्या साठी अवशेषांचे नमुने DNA चाचणीसाठी हैदराबाद येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले, त्यांचे वय, हत्ये मागील करणे आणि इतर तपशिलांसाठी आग्राच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. पायल हि एकमेव अशी बळी होती जी कि या अकरा बळींपैकी प्रौढ होती बाकी सगळे बळी हे दहा वर्षाखालील होते. ३ जानेवारी २००७ रोजी आठ पैकी सात कुटुंबीयांनी ज्यांना 200,000  रुपयांचे धनादेश नुकसान भरपाई म्हणून मिळाले होते त्यांनी ते निषेध दाखविण्य करिता परत केले. असे असले तरी ते धनादेश त्यांना लवकरच परत करण्यात आले, नुकसान भरापाई साठी घर आणि नौकरी यांची हि मागणी करण्यात आली.

लोकांच्या तीव्र असंतोष आणि खेद आणि कठोर दबावापुढे उत्तर प्रदेश  सरकारने दोन पोलिस अधीक्षक आणि सहा पोलिस लोकांना कर्तव्य कामामध्ये हयगय केल्याच्या आरोपा वरून निलंबित केले. हे पाउल समितीच्या चारजणांनी केलेल्या अहवालानुसार घेण्यात आले. १७ जानेवारी २००७ रोजी , उत्तर प्रदेश पोलिसांच्या बेपत्ता झालेल्या मुलांच्या शोध कारवाई च्या गलथान काराभारांचा अहवाल समितीने सादर केला. समितीने असे म्हणणे मांडले कि पोलिस प्रशासनाने बेपत्ता झालेल्या मुलांच्या बाबतीत दुर्लक्ष केले आणि बेजबाबदार आणि निष्काळजीपणे वर्तन केले आणि य हत्यान्मागाच्या संभाव्य  मानवी अवयवांच्या व्यापार हेतू  कडे हि दुर्लक्ष केले.

पंधेरीच्या घरामागील आणि पुढील जमिनी मध्ये पुरलेले मानवी अवशेष जमिनी मध्ये मिसळण्याच्या दरम्यान दोघा आरोपींना पोलिसांनी कोठडीमध्ये घेतले होते. ७ ऑक्टोबर २००६ ला एफआयआर नोंदवली गेली होती, तपासादरम्यान असे दिसून आले कि पायल चा सेल फोन वापरला गेला होता जरी तिच्या  नावावर असलेले सीम कार्ड सक्रीय नव्हते. तंत्र ज्ञानाच्या मदतीने अने लोकांचे नंबर आणि तो सेल फोन कोणी विकला होता त्याचा मागोवा घेणे शक्य झाले. एका रिक्षा ओढणाऱ्या ने तो फोन पंधेरीमधील एकाचा असल्याचे कबूल केले. साक्षीदरांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोनिंदर सिंग ला चौकशी साठी बोलावण्यात आले ज्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. सुरेंदर कोली ला दुसर्या दिवशी पकडण्यात आले , त्याने एका मुलीचा खून करून तिला घरामागे पुरल्याचे कबूल केले. पण जेंव्हा तिथे खोदण्यात आले तेंव्हा पायल च्या ऐवजी इतर मुलांच्या मृतदेहाचे अवशेष सापडले.

नंद लाल जे कि त्या मुलीचे वडील होते - पायल उर्फ दीपिका- यांनी पोलिसांनी त्यांना घाबरविण्याचा आणि धमकावण्याचा प्रयत्न केला असा आरोप केला. त्यांनी असे हि नमूद केले कि न्यायालयीन हस्तक्षेपामुळे त्यांची FIR - तक्रार नोंदवली गेली..

अवयव व्यापार आणि नरमांसभक्षणचा संशय

सुरुवातीला पोलिसांना या हत्येमागे मानवी अवयव व्यापाराचा हेतू वाटला होता ज्याच्या आधारावर त्यांनी पूर्व संशयिताच्या  घराजवळ राहणाऱ्या डॉक्टरच्या घरावर धाड घातली होती. अधिकृत अधिकाऱ्यांसह काही न्यायवैद्यक तज्ज्ञ गटाने शक्य ते पुरावे गोळा करण्यासाठी त्या जागेची पाहणी केली. पोलिसांनी हि माहिती उघड केली कि त्या डॉक्टर ला १९९८ मध्ये याच कारणासाठी अटक केली होती पण कोर्टाने त्याला सोडून दिले होते. काही दिवसानंतर दुसरी धाड टाकण्यात आली. असे असले तरी पोलिसांनी मात्र पोलीग्राफ चाचणी ची सुरुवात झालीच होती त्या पूर्वीच आरोपी वर नर भक्षणाचा आरोप करून सावधगिरीचा पवित्र घेऊन होते. ते चकित झाले जेंव्हा एका वृत्तपत्राने एका आरोपीच्या आतडी आणि शरीराच्या इतर भागाच्या भक्षणाचा कबुली जबाब दिल्याचे वृत्त प्रसारित केले. शक्यता अशी होती कि, जरी तपास समितीने असे काही सांगितले नसले तरी ज्या क्रोर्याने घटना घडली होती आणि बळी गेलेल्या लोकांसोबत जो व्यवहार झाला होता त्याच्या आधारावर असा तर्क करणे शक्य होते.

ब्रेन मॅपिंग आणि नार्को विश्लेषण

काही वैद्यकीय चाचण्यांसाठी दोघा आरोपींना गांधीनगर च्या फॉरेन्सिक सायन्स च्या संचालन मंडळामध्ये आणले होते. ब्रेन मॅपिंग आणि पोलीग्राफ चाचणी ४ जानेवारी २००७ ला करण्यात आली. आणि नार्को चाचणी त्या नंतर पाच दिवसांनी करण्यात आली. पोलिसा अधीक्षकांना सांगितल्या गेलेल्या माहितीनुसार दोघा हि आरोपींनी चाचणी आणि परीक्षा काळात सहकार्य केले.संस्थेच्या एका वरिष्ठ संचालक अधिकार्याने चाचणी निष्कर्ष काढण्यात आलेले आहेत आणि ते घोषित केले जाणार आहेत असे सांगितले. सुरेंदर कोली ने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आणि आपल्या मालकाला याबद्दल काहीही महिती नव्हते असे सांगून त्यांची पूर्णपणे निर्दोष सुटका केली. सुरेंदर कोली ने या हि गोष्टीची कबुली दिली कि सगळे खून हे गळा दाबून करण्यात आले होते. त्या नंतर तो त्यांना स्वतःच्या बाथरूम मध्ये नेउन त्यांच्या वर बलात्कार करत असे आणि नंतर त्यांचे तुकडे करत असे. पंधेर हा नेहमीच बाईलवेडा आणि उदासीन वृत्तीचा होता.