Get it on Google Play
Download on the App Store

HTML भाग १: ओळख

बरं कामापुरती HTML कित्येकांना येते, जे लोक नेटवर सतत सर्फिंग करत असतील, विविध ब्लॉग्जवर कमेंट्स देत असतील, त्यांना HTML च्या काही थोड्याफार फॉर्मॅटिंग टॅग्ज माहित असतील. पण कित्येक जण असेही आहेत, ज्यांना HTML चे किंचीतही ज्ञान नसेल… अश्यांसाठी, ह्म्म, नक्कीच HTML ला नवख्या असणार्‍यांसाठी ही लेखमालिका आम्ही सुरू करीत आहोत, त्याचा हा पहिला भाग, म्हणजेच HTML ची ओळख…!

या लेखात HTML काय आहे, HTML चा उपयोग काय, वेब पृष्ठे काय असतात, वेब डॉक्युमेण्ट्स काय असतात, HTML कशी शिकता येईल, त्यासाठी कोण-कोणती साधने/टूल्स लागतील, हे आपण पाहणार आहोत… नंतर या लेखमालिकेच्या पुढील भागांमध्ये HTML मधील विविध टॅग्जचा योग्य उदाहरणांसहित वापर, व इतर बरीच माहिती आपण समजावून घेणार आहोत… लेखाबाबत काही शंका असतील, तर त्या प्रतिक्रियांच्या रुपात अवश्य कळवा…

HTML काय आहे?

HTML ही एक संगणकीय भाषा आहे, ज्याद्वारे वेब पृष्ठे बनवले किंवा सजवले जातात.

• HTML हे Hyper Text Markup Language चे संक्षिप्त रूप आहे.

• HTML ही एखादी प्रोग्रॅमिंग लॅन्ग्वेज नसून मार्क-अप लॅन्ग्वेज आहे, हे प्रथम ध्यानात घ्या.

• मार्क-अप लॅन्ग्वेज ही अनेक मार्क-अप टॅग्जचा संच असते.

• HTML अशाच काही मार्क-अप टॅग्जचा वापर वेब पृष्ठे बनवण्यासाठी किंवा सजवण्यासाठी करते.

HTML टॅग्ज

HTML मार्क-अप टॅग्जना सामान्यतः HTML टॅग्ज म्हणून संबोधले जाते.

• HTML टॅग्ज हे सांकेतिक शब्द असतात व ते कोनिय कंसांनी आच्छादलेले असतात. उदा. <html>

• HTML टॅग्ज सामान्यतः जोड्यांमध्येच येतात. उदा. <b> आणि </b>

• या टॅग्जच्या जोडीतील पहिली टॅग ही स्टार्ट/ओपनिंग टॅग असते, तर दुसरी टॅग ही एण्ड/क्लोजिंग टॅग असते.

• जर या लेखामधील एखाद्या उदाहरणामध्ये तुम्हाला अजुनही अपरिचित असलेल्या टॅग्ज दिसल्या तर मुळीच घाबरून जाऊ नका. लेखाच्या उत्तरार्धापर्यंत तुम्हाला त्या टॅग्जविषयी योग्य माहिती निश्चितच मिळेल!

HTML डॉक्युमेण्ट्स आणि वेब पृष्ठे

• HTML डॉक्युमेण्ट्स हे वेब पृष्ठांचे वर्णन करतात.

• HTML डॉक्युमेण्ट्स मध्ये HTML टॅग्ज आणि साधा मजकूर असतो/असू शकतो.

• HTML डॉक्युमेण्ट्सना वेब पृष्ठे देखील म्हटले जाते.

तुमच्याकडे असणारे एखादे वेब ब्राउजर (उदा. इंटरनेट एक्स्प्लोरर, मोझिला फायरफॉक्स, ओपेरा इत्यादी) वापरण्यामागचा मूळ उद्देश एवढाच की HTML डॉक्युमेण्ट्स वाचणे आणि तुम्हाला समजण्यासाठी त्यांना वेब पृष्ठे म्हणून दर्शवणे. वेब ब्राउजर HTML टॅग्ज जशाच्या-तशा न दर्शवता त्यांचा वापर करून व्यवस्थित सजवलेले वेब पॄष्ठ दर्शवते.

खालील एक सोपे HTML उदाहरण बघा:

<html>
<body>
<h1>पहिली हेडिंग (शिर्षक)</h1>
<p>परिच्छेद</p>
</body>
</html>

वरील उदाहरणाची कारणमीमांसा:

• <html> आणि </html> मधील सर्व मजकूर वेब पृष्ठाचे वर्णन करतो.

• <body> आणि </body> मधील मजकूर हा पृष्ठाचा दर्शनिय भाग आहे, म्हणजे तो वेब पृष्ठावर तुम्हाला दिसू शकतो.

• <h1> आणि </h1> मधील मजकूर हा शिर्षकासारखा जरा मोठा दिसेल.

• <p> आणि </p> मधील मजकूर परिच्छेद दर्शवेल.

या लेखाचा उपयोग घेण्यासाठी तुम्हाला काय लागेल:

• कोणतेही HTML एडिटर, उदा. नोटपॅड

• कोणतेही वेब ब्राउजर उदा. इंटरनेट एक्प्लोरर/मोझिला फायरफॉक्स/गुगल क्रोमिअम इत्यादी

आणि कशाची मुळीच गरज पडणार नाही:

• कार्यशील इंटरनेट जोडणी

• वेब सर्व्हर

• वेब साइट

टेकमराठी दिवाळी अंक

संकलित
Chapters
संपादकीय टेक मराठी विषयी... अ अ अॅन्ड्रॉईड चा! दीपिन लिनक्सची ओळख GIT: म्हणजे नेमके काय? लिनक्स (Linux) विषयी थोडेसे मराठी विकिपीडिया संपादन – अवघड की सोपे? तुम्ही विकिपीडियाबद्दल खरंच जाणता! डॉट नेट फ्रेमवर्क तुमच्या घरचे वायरलेस नेटवर्क(Wi-Fi) कसे सुरक्षित ठेवाल? एपिक browser ची ओळख मराठीत टाईप / ब्लॉग / इमेल कसं करायचं? हे SEO काय आहे? १२ वी नंतर कोणते इंजिनियरिंग कॉलेज व कोणती शाखा निवडायची? गूगल फ़्रेंडली संकेतस्थळं कशी करायची? HTML भाग १: ओळख Technical Writing: Engineering च्या विद्यार्थ्यांसाठी alternate career Java पेक्षा Python का चांगली? फिबोनाकी सिरीज- Fibonacci Series Software Specifications घेताय? तुमच्यासाठी काही Tips ५ गोष्टी ज्यावर Computer Science च्या विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रित करायला हवं?