Get it on Google Play
Download on the App Store

मराठीत टाईप / ब्लॉग / इमेल कसं करायचं?

हा मूळ लेख http://www.harshadoak.com वर हर्षद ओक यांनी लिहिला असून http://bit.ly/bBLidn येथे प्रकाशित झाला आहे; येथे तो पुन:प्रकाशित केला आहे.

नमस्कार. हा माझा मराठीतला पहिला ब्लॉग आहे. मी मराठी शेवटचं शाळेत लिहिलं आणि आता १५ वर्षांनंतर परत प्रयत्न करतो आहे. अवघड जातयं पण मजा पण येतेय. पहिला मराठी ब्लॉग कशावर लिहू असा विचार करत होतो. मग म्हटलं मराठीत टाईप / ब्लॉग / इमेल कसं करायचं तेच लिहुया.

मराठी टायपिंग

बघितलं तर मराठी टायपिंग करता येणंच महत्वाचं आहे. एकदा ते जमलं की मग इमेल / ब्लॉग / लेख काहीही लिहिणं सोपं आहे. मराठी टायपिंग करण्यामधला मुख्य अडथळा म्हणजे अपल्या सगळ्यांकडचे इंग्रजी भाषेतले कीबोर्ड. कीबोर्डला मराठीत टंकलेखनयंत्र म्हणतात असं दिसतंय, पण आपण मराठी फार ताणायला नको आणि त्याला कीबोर्डच म्हणूया.

मराठी टाइप करायचा एक मार्ग म्हणजे कीबोर्डवरच्या प्रत्येक इंग्रजी अक्षराच्या सुसंगत मराठी अक्षर पाठ करणे. DTP व्यवसायातील काही व्यक्ती अगदी सहज आणि कीबोर्ड कडे न बघता धडाधड मराठी टाईप करतात. पण हे तुमच्या-आमच्यासारख्या क्वचित मराठी टाइप करणाऱ्या सामान्यांना जमण्यातलं नाही.

Transliterate

दुसरा सोप्पा मार्ग आहे तो इंग्रजी मधे टाईप करायचं आणि असं सॉफ्टवेअर वापरायचं की जे त्या इंग्रजीला transliterate करून मराठी करेल. मी transliterate म्हणतोयं आणि translate नाही याची नोंद घ्या. Transliterate म्हणजे एका भाषेतून दुसऱ्या भाषेत अक्षरांच्या उच्चारानुसार भाषांतर. तुम्हाला जर मराठीत ‘खुर्ची’ लिहायच असेल तर तुम्ही इंग्रजीत ‘khurchi’ लिहायच आणि सॉफ्टवेअर आपोआप स्क्रीन वर ‘खुर्ची’ लिहील. Translate करत असतो तर आपण ‘chair’ लिहिलं असतं, पण transliterate मध्ये तसं नाही करत आणि ‘khurchi’ लिहितो.

इंग्राजी – मराठी transliterate साठी Google IME , Shree Lipi, Baraha आणि Lipikaar हे पर्याय आहेत. श्रीलिपी मध्ये सगळ्यात जास्ती features आहेत असं त्यांच्या संकेतस्थळावरनं वाटतायं तरी, पण श्रीलिपी फुकट मिळणारं सॉफ्टवेअर नाहीये. लिपिकारमध्ये पण १७ भाषांमध्ये लिहायची क्षमता आहे पण लिपिकारवरचं काम थंडावलाय असं त्यांच्या संकेतस्थळावरनं वाटत आहे. लिपिकारचा फुकट आणि विकत अशी दोन्ही versions आहेत. CDAC Leap नावाच सॉफ्टवेअरपण पूर्वी मिळत असे. त्याच्यावरचं काम पण बंद दिसतंय. मी काही वर्षांपूर्वी CDAC Leap वापरलं होतं, पण सध्या तरी लिपिकार आणि Google IME वापरतो आहे.

चित्र १: गुगल IME Auto Complete

मी हा ब्लॉग लिहायला Google IME वापरत आहे आणि ते उत्तम काम करत आहे. IME download आणि install करणं अगदी सोपं आहे. http://www.google.com/ime/transliteration/ वरन फाईल घ्या आणि ती run करा. IME नीट install झालं की तुम्हाला बहुतेक करून स्क्रीनवर उजव्या हाताला खाली IME चा नवीन टूलबार दिसेल, किंवा English – Marathi switch करायचं बटन तरी दिसेल. चित्र २ पहा.

चित्र २: IME Toolbar

IME मध्ये भाषा बदलून मराठी करा आणि तुम्ही कुठल्याही application मध्ये मराठी टाईप करू शकाल. IME मधली “auto complete” सुविधा खूप वेळ वाचवते. उदाहरण म्हणजे तुम्ही amit लिहिलत कि तो अमिताभ पर्येंत सल्ला देतो, चित्र १ पहा. असंच सगळ्या शब्दांच्या बाबतीत होतं.

जर तुम्ही संगणक क्षेत्रातल्या विषयावर किंवा कुठल्याही ‘technical’ विषयावर लिहीत असाल तर सारखेच इंग्रजी शब्द वापरायला लागतात. IME मध्ये तुम्ही भाषा सहज switch करू शकता ‘Alt+Space’ दाबून.

चित्र ३: 1गुगल इंग्रजी – मराठी ट्रांसलिटरेट

चित्र ४: गुगल इंग्रजी – मराठी शब्दकोश

Google IME अजूनतरी फक्त Windows वरच चालतं. त्यामुळे तुम्ही Linux किंवा Apple Macintosh वापरत असाल तर Google IME वापरता येणार नाही. अशावेळी तुम्ही http://www.google.com/transliterate/Marathi वापरू शकता. Google Transliterate मध्ये २२ भाषा लिहायची क्षमता आहे.

टिप्स

1. स्पेलिंग/ शुद्धलेखनाबद्दल खात्री नसेल तर Google वर शोधून बघायचं. बरोबर असेल तर बहुतेक वेळा search results येतात. नसेल तर येंत नाहीत.
2. कुठला इंग्रजी शब्द अडत असेल तर Google इंग्रजी – मराठी शब्दकोशाचा वापर करा. उदहारण म्हणजे corresponding साठी सुसंगत हा मराठी शब्द आहे हेय मला सुचलं नव्हतं.
3. कीबोर्ड कडे न बघता टाईप करायला शिका / प्रयत्न करा, खूप वेळ वाचेल.
4. Help आणि User Guide नक्की वाचा. बरेच features आहेत जे लगेच नाही दिसत
5. IME Auto Complete मध्ये Google चा लोगो क्लीक केलात तर त्या शब्दावर Google search आपोआप होतं.
6. असले features आणि Keyboard shortcuts शिकणं आणि वापरणं फारच महत्वाचं आहे. कारण नाहीतर IME वापरायला अवघड जाईल आणि IME चा अधिकतम फायदा नाही येणार. सारखं स्क्रीनवर क्लीक करणं खूप वेळ खातं. http://www.google.com/ime/transliteration/help.html#features वर shortcuts आणि features आहेत, ते वापरायच्या आधी नक्की वाचा.
7. काही वेळा काही मराठी शब्द नाहीच जमत इंग्रजी मध्ये लिहायला. अशा वेळी तुम्ही ‘char picker’ उघडून अक्षर निवडू शकता. ‘char picker’ च बटन Google IME toolbar मध्ये असत.चित्र २ आणि ४ पहा.
8. तरी नाही जमला शब्द तर दुसरी कडून कॉपी पेस्ट करा. मला software सॉफ्टवेअर लिहायला अजून नाही जमलायं. ते मी कॉपी पेस्ट करतो आहे. Google var ‘फ्टवेअर’ search केलं आणि मला बरोबर सॉफ्टवेअर सापडलं.

चित्र ५: Character Picker

तसं तुम्ही IME वापरून कुठल्याही application मध्ये मराठी लिहू शकता. पण IME नसेल वापरायचं तर Gmail मध्ये सरळ मराठी ईमेल लिहिता येतो, “Compose Mail” मधे, वरच्या menu मधे मराठी निवडलं की झालं. पण ब्लॉग करायला मला Google IME हे सॉफ्टवेअर अधिक चांगलं वाटतं.

या लेखाबद्दल अभिप्राय नक्की कळवा. धन्यवाद.

हा मूळ लेख http://www.harshadoak.com वर हर्षद ओक यांनी लिहिला असून http://bit.ly/bBLidn येथे प्रकाशित झाला आहे; येथे तो पुन:प्रकाशित केला आहे.

टेकमराठी दिवाळी अंक

संकलित
Chapters
संपादकीय टेक मराठी विषयी... अ अ अॅन्ड्रॉईड चा! दीपिन लिनक्सची ओळख GIT: म्हणजे नेमके काय? लिनक्स (Linux) विषयी थोडेसे मराठी विकिपीडिया संपादन – अवघड की सोपे? तुम्ही विकिपीडियाबद्दल खरंच जाणता! डॉट नेट फ्रेमवर्क तुमच्या घरचे वायरलेस नेटवर्क(Wi-Fi) कसे सुरक्षित ठेवाल? एपिक browser ची ओळख मराठीत टाईप / ब्लॉग / इमेल कसं करायचं? हे SEO काय आहे? १२ वी नंतर कोणते इंजिनियरिंग कॉलेज व कोणती शाखा निवडायची? गूगल फ़्रेंडली संकेतस्थळं कशी करायची? HTML भाग १: ओळख Technical Writing: Engineering च्या विद्यार्थ्यांसाठी alternate career Java पेक्षा Python का चांगली? फिबोनाकी सिरीज- Fibonacci Series Software Specifications घेताय? तुमच्यासाठी काही Tips ५ गोष्टी ज्यावर Computer Science च्या विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रित करायला हवं?