Get it on Google Play
Download on the App Store

महिला आणि अंधश्रद्दा?

महिलांना त्यांच्या शरीरावरील कान नाक गळा पाय हातातील आभूषणे हे अंद्धश्रद्धे च्या गुलामगिरीच्या बेड़या वाटत नाही यामागे नक्कीच हजारो वर्षापुर्वी चा मानसिक पगडा असावा त्याच प्रमाणे पूर्वी स्वातंत्र्य लढाईत तरुण लोक आनंदाने फासावर जात कारण त्याना तो फास हा फास न वाटता स्वातंत्र्य देवी ने आपल्या साठी जनु फुलाचा हार विनला आहे असे वाटे आणि तो फास ते गळ्यात आनंदाने घालत. याचप्रमाणे महिला ना अंधश्रद्देबेडया या बेड्या न वाटता ते अभुषणच आहे आणि त्या अंगावर मिरवतात त्या वेळी महिलांच्या अंधश्रद्धेच्या क्षेत्रातील लढाई बिकट बनते गुलामाला गुलामगिरी ची जाणीव करुण दिल्या शिवाय तो पेटुन् उठनार नाय. पण आपण गुलाम नाही अशीच त्यांची धारणा असते तेव्हा तर ती लढ़ाई अवघड होते पण या लढाई विरुध्द सातत्याने लढावे लागणार च नविन पद्धतीने अनेक वर्ष. शेवटी सत्याचा विजय होतो सत्य हे आपल्या बाजुला आहे म्हणून आपलाच विजय होणार. By.. विवेकभाई पूनावाला