Get it on Google Play
Download on the App Store

तो भयानक अनुभव - भुताच्या सत्य घटना

नमस्कार मित्रहो मी अविनाश गुरव , घेऊन आलोय एक सत्य कथा , हि घटना हल्लीच जून २०१३ मधील घडलेली आहे... आणि ज्याच्या सोबत हि जीवघेणी घटना घडलेली आहे..' राजू ' त्यानेच हि घटना मला सांगितली आहे,त्याचा तो भयानक अनुभव त्यांने मला सांगितला व तोच आज मी इथे सादर करू इच्छित आहे तर घटना पुढीलप्रमाणे ...

आमच्या इथे "शिगवण" नावाचे गृहस्थ राहत आहेत तर... त्यांच्या मुलीचे लग्न खेड दापोळी (गावाचे नाव बदलेले आहे ) येथे शिगवण यांच्याच गावी होते. तर तेव्हा शिगवण यांच्या मदतीस मुंबईवरून राजू आणि खांडेकर हे दोघे आले होते. तर झाले असे कि शिगवण यांच्या मुलीचे लग्न ११:०० वाजता पार पडले. आणि सर्व कार्यक्रम उरकता उरकता सायंकाळचे ५ वाजले तेव्हा त्या तिघांनी म्हणजे खांडेकर , राजू आणि शिगवण या तिघांनी मदिरा प्राशन करण्याचा बेत आखला होता. आणि गावापासून ४५ मिनिटाच्या अंतरावर असलेल्या बाजार पेठेमध्ये चालतच निघाली कारण त्यांचे गावच खूप आडमार्गी होते वाहनांना नेण्य इतका चांगला मार्ग नव्हता. आणि तेव्हा संध्याकाळी ६ च्या सुमरास हे बाजार पेठेत पोहोचले.... तिथे यांनी मदिरा प्राशीत केली आणि थोडी सोबत घेतली.... आणि आता घरी जाऊन मस्त मच्छी वगेरे करावे म्हणून बाजारातून त्यांनी मासे घेतले .. पण एव्हाना ९ वाजले होते.. मच्छीवाली शिगवण यांना ओळखत होती.. तेव्हा त्यांना सावध करण्याच्या दृष्टीने लवकर घरी जाण्यासाठी सांगितले... ती अस का म्हणत होती याचे कारण राजू आणि खांडेकर शिगवण यांना विचारू लागले.. पण शिगवण काही सांगण्यासाठी तयार होईना झाले.... मासे बनवण्यासाठी लागणारी सामग्री शिगवण यांनी घेऊन ती पिशवी खांडेकरच्या हातात दिली... आणि ते बाजार पेठेतून निघाले... आणि शेताशेतातून गावी जाण्याच्या मार्गी निघाले.. तिघे हि तर्रर असल्याने रस्त्याचे मोजमाप करीतच चालले होते. खूप वेळ झाला .... हे तिघे चालतच जात होते पण गाव काही येण्याचे नावच घेइना, म्हणून राजू शिगवण ला शिव्या घालू लागला आणि जागीच बसला खांडेकर त्यांची समजूत घालू लागला.. आणि ते काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतेच राजूचा शिव्या देण्याचा राग चालूच होता... कि तितक्यात खाडकन .. राजूच्या कानाखाली पडली आणि तसा राजू शिगवणला शिव्या देत उठला... "तू मला का मारलेस ?" पण शिगवण "अरे राजू मी कधी मारले रे तुला तूझ्या *** *** " असे म्हणत राजूला शिगवण शिव्या देण्यास सुरु करू लागला .. कि तितक्यात एक दुसरी कानाखाली पडली आणि ती शिगवणच्या .. शिगवण आता मात्र खूप घाबरले त्यांना सर्व प्रकार समजला... आता ते राजूला विनवणी करू लागले कि त्याने ताबडतोब उठून घरी चलावे इकडे राजू शिव्या देन काही थांबवत नव्हता... आणि तशीच त्याला दुसरी ,, पुन्हा तिसरी पुन्हा दुसऱ्या गालात खाड खाड कानाखाली पडू लागल्या.. सलग कोणी तरी त्याला मारत होते... शिगवण राजूकडे धावू लागले तेव्हा अचानक शिगवण यांचा कोणीतरी पाय ओढून त्यांना फरफटत बाजूला नेऊन टाकले आता राजू थोडा शुद्धीस आलाआणि तो शिगवणच्या मदतीस धावणार इतक्यात त्याचा हि पाय कोणीतरी ओढला आणि त्याला दूर फरफटत नेऊ लागले... या वेळी खांडेकरांनी दोघांचे हात पकडून त्यांना उठवले.. तेव्हा त्या दोघांना मार बसने बंद झाले होते.. तोवर शिगवण आणि राजूचे अंग सोलून निघाले होते.. त्यांचे नाक तोंड फुटले होते... आता ते खांडेकरांच्या आधाराने चालू लागले होते. थोडे पुढे जाताच एक माणूस त्यांना कंदील घेऊन त्यांच्या दिशेने येताना त्या तिघांना दिसला आणि तो त्यांच्या जवळ आला तो माणूस जवळ येताच त्याने त्या तिघांचे हाल पाहून त्यांना विचारले "कोण तुम्ही ? आणि कुठे चालला आहात ?" तेव्हा शिगवण यांनी गावाचे नाव सांगितले तेव्हा त्या माणसाने त्यांना सांगितले कि ते रस्ता चुकले आहेत "तुमचे गाव त्या बाजूला आहे, चला मी सोडतो तुम्हाला " आणि तेवढ्यात त्यांच्या मागून एक आवाज आला .... " तू जा रे इथून त्यांना हिथेच सोड " आता कुठे यांना कोणाचा तरी आवाज आला नाहीतर आता पर्यंत नुसता मारच बसत होता . या तिघांना काय करावे काहीच सुचेना हे तिघे हि थर थर कापू लागले... त्यावर तो कंदील वाला माणूस त्यांना म्हणाला "गप्प पुढे बघत चला कुणीबी माग बघू नका " आणि तेव्हढ्यात अजून एकदा आवाज आला "आज सोडणार नाही तुम्हाला हहःहहह " या तिघांची तर गाळणच उडाली.. आधीच नीट चालता येत नव्हते त्यात वरून हे, आता तर मागून खूप चित्र विचित्र आवाज येऊ लागले... कधी जोरात हसण्याचा तर कधी रडण्याचा पण तो कंदीलवाला यांना मागे बघू नका असे वारंवार सांगत होता. आता हे गावाच्या वेशीजवळ आले होते. तेवढ्यात गावाच्या वेशीजवळ चार पाच लोक बैटरी घेऊन उभा असलेले दिसले... तेव्हा तो कंदीलवाला माणूस त्यांना म्हणाला "तुमचे गावकरी दिसतायत ते .. जावा आता आणि कायपन झाल तरी माग बघू नका " आणि तो तिथेच थांबला हे तिघे तेथे पोहोचल्यास कळाले कि हे लोक या तिघांचा च शोध घेत होते... कारण हे तिघे ५ वाजता घरातून निघालेले आता १२ वाजले होते त्यांना यायला म्हणजे यांची धुलाई चांगलीच तास भर चालू होती.,,,, आणि वरून त्यात रस्ता चुकले होते.... घरी आल्यावर त्यांनी सगळी हकीकत सांगितली ... आणि तेव्हाच कळाले कि खांडेकर कसा वाचला कारण त्याकडे मच्छी,दारु, लिंबू व इतर गोष्टी होत्या ... अजून हि राजू आणि शिगवण या दोघांच्या अंगावर नाकी तोंडी जखमांचे व्रण दिसतात... समाप्त ..