Get it on Google Play
Download on the App Store

कुत्रा आणि हंसी

एका तलावाकाठी एक हंसी आपल्या पिलांसह राहात असे. त्या तलावाची मालकी माझ्याकडे आहे अशा समजुतीने ती इतर प्राण्यांना तिकडे फिरकू देत नसे. 'हा तलाव माझा आहे अन् जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत ह्या तलावाचं पाणी दुसर्‍या कोणत्याही प्राण्याला मी पिऊ देणार नाही.' असे ती म्हणे. बदक, कोंबड्या, डुकरे व मांजरे त्या तलावाकडे गेली तर ती त्यांना हाकलून देत असे.

एकदा एक मोठा शिकारी कुत्रा रानात फिरून दमला असता, तेथे पाणी पिण्यास आला. त्याला पाहताच हंसी मोठ्या रागाने त्याच्यावर तुटून पडली व आपल्या चोचीने त्याला टोचू लागली. ह्या वागणूकीचा कुत्र्याला फार राग आला व तिला चांगले शासन करावे असे त्याला वटले, पण क्षणभर विचार करून त्याने आपला राग आवरला व तो तिला म्हणाला, 'तुझ्यासारख्या मूर्खाचा धिक्कार असो. ज्याच्याजवळ लढाई करण्याचं सामर्थ्य नाही किंवा शस्त्रेही नाहीत, त्याच्या अंगी निदान थोडीशी सभ्यता तरी असावी.' इतके बोलून त्या हंसीकडे लक्ष न देता तो भरपूर पाणी प्याला व आल्या वाटेने चालता झाला.

तात्पर्य

- प्रत्येकाच्या अधिकाराला मर्यादा असते, हे लक्षात ठेवून ज्याने त्याने आपला अधिकार गाजवावा.

इसापनीती कथा २०१ ते २५०

इसाप
Chapters
पारधी व साळुंकी मूर्ती वाहणारा गाढव मोठे झाड व लहान झाड नदीतला मासा व समुद्रातला मासा विहीरीत पडलेला कोल्हा एक डोळा असलेले हरिण गाढव, कोल्हा आणि सिंह दोन वाटसरू कबुतरे, घार आणि ससाणा कबुतर व मुंगळा घोडा व गाढव धान्य दळणारा माणूस बोकड आणि कुत्रा बेडूक आणि उंदीर बढाईखोर माणूस गाढव आणि त्याची सावली गरुड आणि मांजर गुराखी आणि मेंढी करडू व लांडगा बोकड आणि खाटीक कोल्हा व सिंह गव्हाणीतील कुत्रा हत्ती व प्राण्यांची सभा लांडगा आणि धनगर मधमाशी व साधी माशी मांजर व उंदीर मुंगी व कोशातला किडा स्वप्न पडलेले प्रवासी गाढव आणि लांडगा अतृप्त गाढव गाढव व कुत्रा गरुड पक्षी व कावळा कुत्रा आणि हंसी बकरीने पाळलेले मेंढरू बेडूक व दोन बैल चिलट व मधमाशी दोन कुत्र्या दोरीवरचा नाच गाढव व माळी कोंबडा व घोडा कुत्रा व त्याचे प्रतिबिंब असंतुष्ट मोर मुलगा व बोरे पारधी व त्याचा शिकारी कुत्रा गोठ्यातील सांबर शेतकरी व त्याचा नोकर शेतकरी व त्याचा कुत्रा शेतकरी व साप सिंह व दुसरे पशु बैल व बेडूक