Get it on Google Play
Download on the App Store

गहिरा अंधार ---- भयकथा

“मूव्ह बाजूला सरका…..क़्विक …. क़्विक … टेक हिम टू दि ICU…. लवकर … वार्डबॉय…. बापरे किती रक्त वाहतय यांच……..” डॉक्टर…. डॉक्टर वाचेल न हो तो…बोलाना डॉक्टर” दिक्षा.. डॉक्टर ची कॉलर पकडून जोरजोरात रडत ओरडत होती. “बोलाना डॉक्टर…. हंअ…हं अहं अहं हं… प्लीज डॉक्टर…प्लीज…” हे पहा मी माझ्या परीने सर्व प्रयत्न करीन तुम्ही थोडा धीर धरा.. “दिक्षा रडू नकोस ग.. अश्विनी ने दिक्षास डॉक्टर पासून दूर केले.. आणि बाकडावरती बसवत तीला समजावू लागली… डॉक्टर ताड ताड चलत आत मध्ये गेले… दिक्षा अश्विनी च्या खांद्यावरती आपले डोके ठेऊन ढसा ढसा रडत होती..”येईल ना ग माझा आदी परत ”अश्विनी रडत रडत तीला समजवत होती…. इकडे अमित पाणावलेल्या डोळ्यांनी दूर बाकडा वरती डोक्याला हात लावून बसला होता..कारण भावापेक्षा हि जवळचा त्याचा मित्र आज मृत्यूशी झुंज देत होता… अमितला पर्श्चाताप होत होता.. आपल्यामुळे आपला मित्र या अवस्थेत आहे….. आय सी यु मध्ये आदी मरणाच्या दाराशी येऊन ठेपला होता… एक एक क्षण त्यास जणू डोळ्यासमोर फिरताना दिसत होता.. डॉक्टर, नर्स धडपडीने.. त्याच्या छातीतून… तो धारदार लोखंडी गजाचा तुकडा बाहेर काढू पाहत होते.. पायात घुसलेल्या काचा..डॉक्टरांनी.. कचकच उपसून काढल्या.. उपसताच ते तेथे स्पिरीट लाऊन ते दाबून धरत होते…आणि आदी निपचित पडून होता.. डोक्यावर झुलणारा तो ऑपरेशन बेड वरील बल्बाकडे तो एकटक पाहत होता.. वेळ जणू त्याच्या साठी..मंद झाला होता…आदिने आपले डोळे हळुवार झाकले कि….

2 दिवसांपूर्वी ……… “भाऊ भाऊ अहो!! जरा सावकाश..!! आह आ सावकाश सावकाश हा आना आतमध्ये ठेवा तेथे.. हे घ्या तुमचे पैसे धन्यवाद !!” अमित ने टेम्पोतील सर्व सामान आपल्या नव्या घरात उतरवून घेतले आणि उतरवताच सर्व लाऊन देखील टाकले.. आतून कंबरेत खवलेला पदर काढत अश्विनी डोक्यावरील घाम पुसत अमित जवळ आली.. “झाले का रे सगळे सामान लाऊन..”ती म्हणाली अमित अश्विनी कडे पाहत म्हणाला “ हो अग! तेवढ्या क्रोकर्या किचन मध्ये ठेवल्या म्हणजे झाले…” खूप थकलीयस जरा बस ना .. “ अरे नको… अजून खूप काम आहे खाली त्या पायऱ्या जवळची ती खोली उघडत नाहीये ..ती साफ करायची राहिलीय..” अग असुदेत बस इथेच.. अमित ने अश्विनीस एका हाताने हलकेस तिला ओढून आपल्या जवळ सोफ्यावर बसवले…अश्विनी देखील त्याला न नकरता त्याच्या जवळ बसली. त्याच्या खांद्यावरती डोके ठेऊन .. घरास पाहू लागली…अमित तिच्या केसात कुरवाळत तिला म्हणाला “काय झाल आशु? काय पाहतेयस..” “आपल्या स्वप्नातील घर.. आज आपल्याला मिळाल ” अश्विनी अमित च्या हातावर हात ठेऊन म्हणाली… अमित ने तिला घट्ट आवळले.. आणि एक सुस्कारा टाकला.. “होय खरय आपल्या स्वप्नातलं घर ”… अमित तिला दुजोरा देत म्हणाला.. ..”ओह मिस्टर आज ऑफिस नाहीये का ?” अमित पुन्हा गडबडीत उठला आणि म्हणला “ओह नो खरच कि.. बॉस ओरडेल खरच निघतो मी.. मला उरकावे लागणार… घाई गडबडीत अमित ने आपले सर्व उरकून घेतल.. आणि निघाला .. अश्विनी पुन्हा आपल्या कामास लागली… कि अचानक दारात कोणीतरी ठोठवले ..ती अश्विनी ची लहान बहिण गोड गोबरे गाल ..सरळ नाक चेहरा जणू देवाने स्वतः कोरलेला ..सुंदर पाणीदार टपोरे काळेभोर डोळे…करवंदासारखे असलेले अशी होती “दीक्षा”… तिला.. त्यांचे नवीन घर दाखवण्यास आणि तिला सोबत म्हणून अश्विनी नेच तिला बोलवून घेतले होते… दिक्षास पाहून अश्विनी ला खूप आनंद झाला.. अश्विनी ने दिक्षास पाहताच तिला जाऊन कडकडून मिठी मारली… तिच्या हातातील पर्स व sag घेऊन तिला आत आणले … “आत येताच दिक्षा ने अमित बद्दल विचारले ताई अग अमित कुठे गेलेत.. “ अग तू बस आधी मी तुला पाणी आणते अमित ऑफिस ला गेला आहे…येईल सायंकाळी .अश्विनी ने दिक्षा साठी पाणी आणले ..आणि तिला पाणी पाजत पाजत विचारू लागली. मग सांग कशी आहेस तू? आई कशी आहे..?.?… हो हो सांगते थांब जरा मला पाणी तर घेऊ देत..

अश्विनी ने दिक्षास पाणी दिले दीक्षा पाणी पिऊन तृप्त झाली आणि ती अश्विनी कडे वळली आणि म्हणाली “हम्म आता विचार काय विचारायचं ते …” अश्विनी बोलणार तेवढ्यात दीक्षा अश्विणीस थांबवत म्हणाली ..”हो हो अग ताई घरी सर्व जन ठीक आहेत आई बाबा मी आम्ही सगळे मजेत आहोत आणि तुझ आणि अमित जीजू च स्वतः: च घर म्हणल्यास तर बाबा जाम खुश झाले आहेत पहा ” अश्विनीच्या डोळ्यात पाणी आले ते पुसत पुसतच अश्विनीने अजून एकदा विचारले अग आपला आदित्य कसा आहे ? अश्विनीच्या त्या प्रश्नाने दिक्षाचा तो गोड चेहरा कोमेजला गेला अश्विनीने ते हेरले आणि म्हणाली..”काय ग काय झाल ? असा चेहरा का पाडलास ? आदित्यला काही ” .त्याला नाही मला ..मला एकटीला सोडून गेला तो …न सांगताच कोठेतरी दूर ?”. “म्हणजे!” अश्विनी म्हणाली दिक्षाने तिला मधेयचं अडवत म्हणाली ..जाउदे अश्या लोकांची आठवण देखील नसावी जाऊ दे गेला तर गेला मला माझी life आहे न जगायला मी आहे स्वतंत्र त्याच्या शिवाय …अश्विनी तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली ..बर असुदेत मी नाही काही विचारत आता तू हि थकली असशील खूप चल तू फ्रेश होऊन ये मी तुझ्यासाठी मस्त गरमा गरम कांदे पोहे बनवते तुझ्या आवडीचे ते पण जा होऊन ये फ्रेश असे म्हणत अश्विनी .. किचनच्या दिशेने निघाली…दिक्षाने आपली पर्स बाजूला ठेवली आणि फ्रेश होण्यास निघाली निघाली खरी पण तिला वाशरूम माहित नव्हते ..म्हणून ती किचन च्या दिशेने गेली .आत मध्ये अश्विनी काहीतरी चाकूने कापत होती . पण एका वेगळ्याच अंदाजाने ..आपली मान डाव्या बाजूस झुकवून कोथिंबीर कापण्यास लागणारा हलकासा वार देखील ती रागारागात करत होती..ख्प्ख्पख्प्ख्प….” तेवढ्यात दिक्षाने अश्विनीस हाक मारली आणि म्हणाली अग ताइ बाथरूम कोठे आहे? तसी अश्विनी थांबली ..आणि ती तसेच आपला चेहरा पुढे ठेवून म्हणाली ..”इथून थेट पुढ जा …समोर उजव्या बाजूस एक खोली आहे त्या खोलीच्या समोरच आहे ” दीक्षा थोड थांबून तीच बोलन ऐकत होती .. दीक्षाला जरासे वेगळे वाटले. पण ती तसीच निघाली तिच्याकड दुर्लक्ष करून… दीक्षा त्या खोलीच्या दिशेने जाऊ लागली… कि समोरून तिच्या पुढ्यात अश्विनी आली तिच्या हातात पोह्याचा डब्बा होता आणि ती तो खोलण्याचा प्रयत्न करीत होती.. दीक्षा अश्विनीस पाहून एका जागी थक्क झाली.. कारण तिने आताच अश्विनीस किचन मध्ये पाहिलं होत ..ती अश्विनी जवळ गेली आणि म्हणाली .. “ताई मी तुला आताच किचन मध्ये पाहिले तू कोथिंबीर कापत होतीस ” अश्विनी डब्बा खोल्ण्याच्याच प्रयत्नात होती तिचे बोलणे ऐकून ती तशीच थांबली आणि म्हणाली दीक्षा बाळा मी आत्ताच तुझ्या समोरून आले न बाहेर .मी किचन मध्ये कशी असेल ” काय तू इकडे होतीस अग नाही तू मला आताच बाथरूम चा रस्ता पण सांगितलास कि समोरील खोली जवळच बाथरूम आहे अश्विनी तिच्या त्या वाक्याने चकित झाली कारण ..आताच आलेल्या दिक्षास ५ मिनिट देखील झाली नसतील तिला बाथरूमचा मार्ग कसा कळाला .. दीक्षा पण अग मी तर इकडे “ अश्विनीस काही कळेना ती म्हणाली “चल आपण पाहूयात कोण आहे किचन मध्ये मी तर इकडे आणि किचन मध्ये चल कोणी चोर वगेरे तर नसेल न ” दोघी घाबरत घाबरत जाऊ लागल्या .. अश्विनीने हातात झाडू घेतला आणि दीक्षाच्या मागोमाग जाऊ लागली … आणि त्यांनी किचन चे दार ढकलले ……………………..

आत कोणीच नव्हते .. अश्विनी जरासी हसली अग कोणीच तर नाहीये तुला न बाळ थकवा आला आहे इतका लांबचा प्रवास केला आहेस तू जा आणि फ्रेश हो .. दीक्षा ठीक आहे म्हणत बाथरूम कडे गेली आणि अश्विनी पोह्याच्या तैयारीस लागली .. दीक्षा एक paranormal गोष्टीची शोधकर्ता होती..तिने बरेच अश्या गोष्टींवर आपले लेख लिहले होते .. तीला एखाद्या ठिकाणी असणाऱ्या नकारात्मक गोष्टी भाकीत होत होत्या .. दीक्षा बाथरूम कडे निघाली.. कि जात जात तिला बाजूच्या खोलीत पलंगावर कोणीतरी विचित्र रीतीन् बसून तीला पाहत होत.. ते दिक्षास तेव्हा दिसले नाही ..पण जेव्हा तिने बाथरूमचा दरवाजा उघडला तेव्हा …….

.. . बाथरूमच्या आरश्यात तिला ते दिसले … चेहरा पूर्ण जणू पांढराशुभ …केस एकदम विंचरून आंबाडा बांधलेला ..ओठावर लालभडक लाली ..मोठे काळे भोर डोळे आणि त्यात ठासून भरलेलं काजळ .. अंगात काळी साडी ..जे दिक्षास पाहत होत ते तिला दिसले दीक्षा च्या पायाखालील जमीन सरकली तिच्या हृदयात धस्स झाले .. कारण तिने आता पर्यंत ज्या गोष्टींवर लेख लिहले इतकी रिसर्च केली .ते अक्षरश: तिच्या डोळ्या समोर होत.. दीक्षा ते पाहतच राहिली तिला काही कळेना कि अचानक बाथरूमचा दरवाजा आतून लॉक झाला ..दीक्षा समजून चुकली ..आपण याचा प्रतिकार केला तर ते अजून आपणास हानी पोहचवण्याचा प्रयत्न करेल …म्हणून दीक्षा शांतपणे विचार करू लागली .. तिला माहित होते अश्या क्षणी काय करायचे तीझ मन आधीपासून जीवनातील मोठमोठ्या दुख:ना सहन करून भक्कम दगड सारखे झाले होते .. कि अचानक बाथरूम मध्ये तिला दुसर कोणीतरी असल्याचा भास झाला ..पण तो भास नव्हता ते सत्य होत.. तिच्या बाजूने एक काळसर भुरकट प्रतिकृती ..फिरताना तिला दिसू लागली .. पण त्या गोष्टीस ..दीक्षा चे प्राण नाही तर दीक्षाच्या शरीरात प्रवेश हवा होता .. दीक्षाने आपले मन सकारत्मक ठेवले ते प्रेत आणखीनच प्रयत्न करू लागले .. तेव्हा मात्र दीक्षाच्या समोर ती प्रतिकृती हरली आणि दहाड करत आरश्यामध्ये सामावली ..दिक्षाने बाथरूमचा दरवाजा उघडला आणि तात्काळ खाली आली.. खाली येतच ती किचन मध्ये गेली… आत घुसताच तिच्या नाकात घमघमीत पोह्याचा गरम वास घुमला… अश्विनीने पोहे तैयार केले होते..त्यावरती नेबारीक चिरलेली कोथिंबीर ,,,…कुरकुरीत शेव … त्याव्र्र बारीक चिरलेला कांदा ..आणि बाजूला एक गोल अशी लिंबाची चकती… दीक्षा ते पाहून जे बोलण्यास आली होती ते विसरूनच गेली.. अश्विनीने तिच्या तोंडात चमचा भरून गरम पोहे घातले ,… कि दिक्षाने आपले डोळे झाकले …ती सगळ विसरून गेली ”आई ग!!! ताई …तुझे पोहे ..म्हणजे ना …वाह खूपच छान दे न ती प्लेट मला ” हो हो घे अग तुझ्या साठीच आहेत हे ..धर !! चल हॉल मध्ये बसून खावूयात..त्या दोघी हॉल मध्ये गेल्या ..दीक्षा तिच्या ताई च्या बनवलेल्या पोह्यावर ताव मारू लागली .. पण लगेच ते दृष्य देखील तिच्या लक्षात आल .. तिने न राहवून विचारले …”ताई या आधी या घराचा मालक कोण होता ” अश्विनी तिच्या त्या प्रश्नाने जरा गंभीर भावात म्हणाली काय दीक्षा पुन्हा तेच अग या घरात तसे काही नसणार बाळा …आम्ही घेण्यापूर्वी अमित च्या कंपनीकडून पूर्ण याची हिस्ट्री जोग्राफी जाणून घेतली काही काळजी नकोस ग करू..तुझा प्रोफेशन न जिथ एखाद मोकळ घर असेल तिथच भूत असणारच अस थोडी असते..” हम्म तू म्हणतेयस तर ठीक आहे ..पण मगा .. नाही काही नाही जाउदे ..मी tv पाहते तो पर्यंत हा हो पहा अश्विनी दोघींच्या पोह्यांच्या प्लेट्स उचलत होकार देत जाऊ लागली ..आणि किचन मध्ये गेली दीक्षाने tv सुरु केला पण tv ला सर्व मुंग्या आल्या होत्या … दीक्षा channnel पलटून पलटून पाहत होती काही लागेना.. तिने अश्विणीस हाक मारणार तेवढ्यात एक channel चालू झाला त्यावर काही नाव नव्हते पण एक बातमी दाखवत होते..कि एका घरातील कुटुंबांचा त्यांच्याच घरातील वडिलाने आपल्या मुलीस आणि स्वताच्या पत्नीस कुऱ्हाडीने घाव घालून जीव मारले आणि स्वतः घरातील हॉल मध्ये लटकून आत्महत्या करून घेतली .. दीक्षा ने chaannel चेंज केला ..पुन्हा तीच बातमी पुन्हा चेंज केला पुन्हा तीच बातमी ..पुन्हा चेंज पुन्हा तीच बातमी दीक्षाने अश्विनी हाक मारली अग ताई ऐक ना असे म्हणत ती उठली आनि अश्विनी कडे गेली….ती ऐक न अग tv ला एकच chaannel आहे दुसर काही दाखवतच नाहीये तेव्हा अश्विनी दीक्षा कडे वळली आणि म्हणाली अग tv ला अजून कनेक्शन पण नाही जोडलं तर tv कसा चालू होईल आज केबल वाला येणार होता तो हि नाही आला मग तू tv कुठून पाह्तेयस.. दीक्षा ला कळून चुकले कि कोणीतरी नक्की आहे इथ जे हे सगळ घडवून आणतय याला काय कराव तिला सूचेना म्हणून न काही बोलताच ती रूम मध्ये गेली आणि आराम करू लागली इकडे अश्विनीकिचन मध्ये होती ति कामात गुंग झाली होती..कि अचानक टिळा वाटले तिच्या बाजूला किचनच्या कोपरयात कोणीतरी उभ आहे त्या भागात काळोख वाटत होता ..कि अचानक तिला कोणाच्या तरी गुर्गुण्याचा आवाज येऊ लागला .. “ह्र्हर्ह्हग्ग्गग्र्र्र ” … अश्विनीस वाटले असेल काही तरी …पण ते काहीतरी नव्हते … पुन्हा तोच आवाज “ह्र्हर्ह्हग्ग्गग्र्र्र या वेळी मोठा आणि स्पष्ट अश्विनी मागे वळली कि एका क्षणातच मागे त्या अंधारातून एक काळी साउली बाहेर आली जिचे तीक्ष्ण दाते आणि लाल डोळे ते थेट अश्विनी च्या अंगावर धावले कि अश्विनी जोरदार किंचाळली आणि तेव्हाच तिथ दीक्षा आली कारण तिला भाकीत झाले होते कि असे काही होणार दीक्षा येताच ती गोष्ट नाहीसी झाली दीक्षा नी अश्विनीस देवघरात पाठवले … आणि किचन मध्ये मेणबत्ती हुडकण्यास सुरुवात केली ,,,,… कसी बसी धडपड करून दीक्षा ला मेणबत्ती सापडली आणि तिने ती पेटवली… सर्व दारे खिडक्या तिने तत्पूर्वी बंदच करून घेतल्या होत्या… दीक्षा हातातील पेटलेल्या मेंबात्तीकडे एकट्क पाहून काही तरी पुटपुटू लागली…..ती हळू हळू किचनच्या प्रत्येक एका कोपऱ्यात जाऊ लागली आणि जशी ती किचन च्या दारा मागील अंधारात पोहोचली कि पोहचता क्षणी .. मेणबत्ती मधून काळभोर असा धूर निघायला सुरुवात झाली मेणबत्ती वेगा वेगा ने जाळू लागली… मेन हळू हळू ओघळत दीक्षाच्या हातावर येऊ लागले दीक्षाला चटके बसत होते ,,तरी हि तिने मेणबत्ती सोडली नाही समोरील त्या अंधारात कोणीतरी त्या मेंबात्तीमुळे तडफडतय अस वाटत होत .. आणि ते अचानक रागाच्या भरात निघून त्या अंधारातून थेट दीक्षाच्या अंगावर धावले ….ते जसे दीक्षाच्या अंगावर धावले कि दीक्षा आपली सर्व ताकत एकटवून ..त्या प्रेताकडे बोट करत ओरडली ….”थांब ….तेथेच ..एक पाउल हि पुढ टाकलस तर जाळून खाक करीन तुला ..” त्या समोरील काळ्या प्रतिकृतीस पाहून दीक्षाचे डोळे मोठे झाले होते… ती भयंकर गोष्ट जणू दिक्षाच्या जीवावर उठली होती…

त्याच्या तोंडून रागाने गरम फुत्कार बाहेर पडत होते …”हःस्स्स्सस्स्स्सह्ह्हह्ह्हह्ह्हह्ह्हह्ह्ह स्स्स्सह्ह्हह्ह्हह्ह्हस्स्सह्ह्हह्ह्ह ”

दीक्षा बोलू लागली ,,…. “कोण आहेस तू ? काय हवय तुला ” … ती समोरील गोष्ट आपल्या रागाच्या भरात दीक्षाच्या आणखीन जवळ आली.. दीक्षा भक्कम हृदयाची होती.. तिने जीवनात बरेच दु:ख पाहिलं होत.. म्हणून तीच हृद्य हि जणू दगडाचे बनले होते… इ गोष्ट तिच्या चेहऱ्या जवळ आली आणि एका अनोळखी भाषेत बडबडू लागली “हे मंझ घराय…हे मंझ घराय … तुन्जा नाय तुन्जा नाय …तुम्जे मार्जी मे निग्जा निग्जा ” दिक्षास ती भाषा जणू नवी होती… पण त्या प्रेतात्म्याचे भाव ती ओळखू शकत होती … ते प्रेत मोडी भाषेत बडबडत तेथून गायब झाले… दीक्षा नाही समजू शकली त्याला.. तिला फक्त एवढेच समजले कि त्याला आम्हा सगळ्याच इथ येन आवडल नाही.. आणि त्याचा दुसरा काहीतरी हेतू होता … दीक्षाच्या हातावर ते सगळे मेन पाघळून तिचा हात लाल झाला होता … ती बेसिन मध्ये गेली आंनी तिने तेथे आपला हात धुतला…आणि त्यावर मलम लावला … ती दाराकडे वळाली तर दारात अश्विनी उभी होती…. ती थरथरत उभी होती. तिला कळेना झाले काय म्हणावे …

तिने हळू हळू आपला हात वर उचलला …तिचे ओठ बोलताना थरथरत होते… दीक्षा तिच्या जवळ गेली… आणि तिचा हात पकडत तिला हॉल मध्ये घेऊन आली… आणि तिला सोफ्यावर बसवले आणि बाजूचा पाण्याने भरलेला ग्लास दिक्षाने अश्विनीस दिला अश्विनी घट घट पाणी प्यायली.. आणि ती एकटक नजरेने दीक्षाला पाहू लागली … तेव्हा दीक्षा म्हणाली ..”ताई तू काही काळजी करू नकोस अग मी आहे न इथ तुला अथवा जीजू ला काही काहीच होणार नाही ते जे काही आहे मी बरोबर त्याची विल्हेवाट लावीन …आणि हो एक अजून एक काम ” दीक्षा पुढचे बोलणार तेवढ्यात दारात कोणीतरी आले …”माईई……..मायी ,,….गरिबाला भाकर दे माई ..देव तुझ भल करेल माई ” बाहेर एक अधेड वयाची वयस्क एक म्हातारी गळ्यात कवड्याची माळ घालून हातात परडी घेऊन माथी कुंकवाचा टिळा लेऊन उभी होती आणि परडी साठी दान मागण्यास आली होती. अश्विनी त्या आवाजाने थोड सावरली तिला किचन मध्ये त्या म्हातारी ला देण्यास काही आणण्यासाठी जाऊ वाटत नव्हते कारण तिने जे पहिले होते ते पाहून कोणीसुद्धा तिथ जाणार नाही.. अश्विनी बाहेर त्या म्हातारीस नाही म्हणण्यास निघाली … तरी हि दीक्षा किचन मधून काहीतरी घेऊन आली… अश्विनी त्या म्हातारीस नाही म्हणण्यास बाहेर पोहचली ..तसेच मागून दीक्षा आली…. दीक्षा म्हातारीच्या परडीत भाकरी ठेवणार तेव्हड्यात ती म्हातारी चार पावले मागे सरकली… “ती डोळे मोठे करून करून दीक्षा आणि अश्विनी च्या मागे वर दुसर्या मजल्यावर जाणाऱ्या पायऱ्याकड पाहत थरथर करत होती “दीक्षा म्हणाली “काय झाले आजी घ्याना हे ” ती म्हातारी काही बोलेना झाली ती फक्त त्या दोघींच्या मागे पायऱ्या कडे पाहत होती अश्विनीने मागे पाहिले पण मागे कोणी नव्हते

अश्विनी काही बोलणार तेवढ्यात त्या म्हातारीने अश्विणीस आणि दीक्षाला हाताला धरून बाहेर खेचले .. आणि आपल्या तोंडावर बोट ठेवत म्हणाली ..”शुssssssssss……….!!! काही बोलू नका ऐकेल तो ” अश्विनी अजून जणू घाबरली आणि थरथरतच तिने विचारले …..”क्क्क्ककोण ….?” त्या म्हातारीने आत मध्ये बोट करत दाखवण्याचा प्रयत्न करू लागली पण आत पाहत नव्हती ती न पाहताच म्हणाली बघा त्या पायऱ्यावर उभा आहे तो… आपल्या कड बघून हसतोय तो… दीक्षा उतरली …”होय माहितेय मला पाहिल आहे मी त्यांना तो एकटाच नाही आत मध्ये आजून काही जन आहेत “…. दीक्षाच्या त्या उत्तराने ती अचंबली .. आणि ती दीक्षा कडे वळली …आणि तिने दीक्षाच्या माथ्यावर हात ठेवला आणि आपले डोळे झाकले आणि झटक्यान हात काढत बोलली ” हा पोरे …..समजली मी सगळ .. त्यान शिकवलं न हे सगळ करायचं तुला .. जो आता तुझ्या जवळ नाहीये तुला सोडून गेलाय.. पण लेकरा तू एकटी नाय अडवू शकणार या नराधामाना ते चांगले नाहीत त्यांना फक्त तुम्हा सगळ्यांचा जीव घ्यायचाय …असले प्रेतात्मे फक्त दुसऱ्याचा जीव घेण्यासाठी असतात… तरी लेकरा तू दगडाची हायस नशीब लय बलवत्तर हाय तूझ आन … ” अस म्हणत ती म्हातारी थांबली आणि दीक्षा म्हणाली “आणि काय ?” आणि तो पण येतोय परत तुझ्या साठी …होय तो माघारी येतोय .. यां नराधमाची ऐसी कि तैसी कराय आणि तुझ्या जीवनात पुना रंग भराय ..तुझ प्रेम ” दीक्षा तीच बोलन कळून चुकली दीक्षा आणि अश्विनी च्या तोंडून एक साथ एक नाव बाहेर पडल …..”आदित्य ” अश्विनीस बरी वाटले पण दीक्षा चा गोड चेहरा पुन्हा पडला.. त्या म्हातारीने आपल्या बगलेतल्या पोट्लीतून अंगाराची पुडी बाहेर काढली आणि ती अश्विनीच्या हातात ठेवली… आणि ती म्हणाली बाळा हि तुला आणि तुझ्या पोटातल्या बाळाला सुरक्षित ठेवल… हे वाक्य ऐकता क्षणी दोघींना धक्का बसला .. कारण त्यांना आताच कळाल होत कि अश्विनी आई होणार होती…. अश्विनी च्या आनंदाला पारावर राहिला नव्हता… आणि दीक्षा देखील आनंदाने तिला बिलगत होती…. कि गेट जवळ ….. गाडीचा आवाज आला …. “व्रूम्म्म्मम ….क्र्र्हछ्च्च्च…क्र्च्च.. ” आवाज करत गाडीचे ब्रेक लागले.. आणि दरवाजा उघडला तर त्यातून ..कोणीतरी ..”भ्वाऔ …..” अश्विनी आणि दीक्षा दचकल्या कारण आवाज ओळखीचा होता .. पुन्हा एकदा आवाज आला आणि ..आतून कोणीतरी बाहेर उडी मारली… कि दीक्षा आणि अश्विनी च्या तोंडून एक शब्द बाहेर आला ..”रॉकी..” अग ताई हा तर रॉकी आहे .. पण हा इथे कसा गाडीतून अमित उतरला आणि म्हणाला मी आणले अग याला इथ “.. दीक्षा धावत रॉकी कडे गेली रॉकी हि तिच्या आजुबाजुसी घोळू लागला “ओह्ह्ह माझ शोनू कस आहे पिल्लू ”… रॉकी भुकत होता …तिला चाटत होता ..”भूऊ भूउ ..उन्नंग” thank u thank u जीजू … अग मी म्हणले अश्विनी ला सोबत होईल मी नसल्यास म्हणून आणले आणि तू आली ते बाबांनी सांगितल मला .. कशी आहेस आणि तो भूत कुठाय आद्या?.. दीक्षा काहीच बोलली नाही ती म्हणाली तो गेला दूर न सांगता …..आणि पुन्हा रॉकीशी खेळू लागली…रॉकी अश्विनी जवळ धावला .. पण अश्विनी जवळ जाताच तो थांबला आणि तिच्या मागे पाहून भूकू लागला .. तो खुप चवताळू लागला .. अश्विनीने मागे पाहिले पण कोणीच दिसेना ..आणि ती म्हातारी पन जणू गायब झाली होती.. अश्विनी आणि दिक्षाने इकडे तिकडे पाहिलं पण नाही ती गेली होती केव्हाची या दोघींना चेतावणी देऊन.. अमित उतरला ..आणि अश्विनी व दीक्षास आत चलण्यास बोलला ..त्या दोघी .. जराश्या बावरल्या आणि एकमेका कडे पाहू लागल्या तरी हि ते आत गेले आणि रॉकी बाहेरच थांबला व बाहेरून आत पाहत जोरजोरात भुंकू लागला ..त्याच्या भुंकण्याचा समज दिक्षास आला होता..पण नाईलाज होता रॉकी जेव्हा पिल्लू होता तेव्हा आदित्य ने तो तिला गिफ्ट केला होता ..खरच तिला आदित्यची गरज भासू लागली होती ती मनातल्या मनात त्याचा धावा करीत होती..”कुठेयस तू? ये ना रे आदी” ..पण आत जाऊन पुढे खरी सुरुवात होणार होती ते त्यां पासून अनभिद्न्य होते….

दीक्षा आणि अश्विनी ..त्या दोघींच्या मनात चलबिचल चालू होती..पण आत जाण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता.. आणि रॉकीच्या अश्या वागण्याने अश्विनी अजून घाबरली होती.. तिला काही कळेनासे झाले होते.. आपल्यां पोटातील बाळा बद्दल अमित ला सांगाव कि त्या घरातील पिशाचाबाद्द्ल सावधान कराव.. किलगेच अश्विनीच्या लक्षात आले ..त्या म्हाताऱ्या आजीने तिला अंगारा दिला होता.. तो अंगारा तिने मुठीत घट्ट आवळला होता.. दीक्षा समजून चुकली होती.. कि अश्विणीस तिच्या बाळाची चिंता होत आहे आणि आतील असणाऱ्या धोक्यापासून वंचित राहिलेला अमित…ते तिघे आत मध्ये आले आत शिरताच दिक्षास ..एक हलकेसे हसण्याचा आवाज आला ..”ह्ह्म्हह ह्ह्ह ..ह्ह्स्सस” दीक्षा तात्काळ अमित कडे गेली आणि म्हणाली जीजू.. तुम्हाला काहीतरी म्हत्वाच बोलायचं आहे..

..”बोल ना दीक्षा ! काय म्हणतेयस थांब ह मला जरा बूट काढूदेत ..हा झाले .आता बोल ” जीजू इथ या घरात .. दीक्षा त्या घडलेल्या घटना बद्दल अमित ला सांगणार होती ..पण तिने अचानक विषय बदलला .. का नाही माहित तिला अस जाणवल कि हे सांगणे आता बरोबर नाही राहणार..म्हणून ती थांबली आणि आनंदाने ओरडत म्हणाली … “जीजू ताई आई होणार आहे…” दीक्षा च्या तोंडून ते वाक्य ऐकून अमित च्या हातातील बूट खाली पडला त्याचे डोळे आश्चर्याने ..मोठे झाले होते.. अमित ला आनंदाचा धक्का बसला होता.. तो तसाच बूट खाली टाकून उठत अश्विनी जवळ जाऊ लागला त्याच्या चेहऱ्यावर हलके हलके हास्याचे प्रहर उमटू लागले होते…. तो बोलण्याचा प्रयत्न करीत होता …”म ममी मी ..मी बाबा मी वडील म्हणजे तू आई ..मी बाबा ..खरच !! अश्विनीने होकारार्थी लाजत मान हलवली ..कि अमित “ .oh myy god woooo hhhoo आशु आशु ..जानु आज आज तू मला जगातलं सगळ्यात सुंदर आणि गोड गिफ्ट दिलयस ” असे म्हणत तो तिला उचलणार होता .. कि थांबला नाही नाही ..अश्या अवस्थेत ..उचलन बरोबर नाही .. ओह god ..आशु I love you आशु .लव यु ..डीअर ..thanks देवा ..आणि आशु तुझ हि .. तुम्ही तुम्ही डॉक्टर कडे गेलात का ” अश्विनी म्हणाली नाही ..मला इथेच कळाले ..अमित समजला .. “ओह ठीक ठीक आहे आपण डॉक्टर कडे जाउयात आताच चल लवकर.. ” अश्विनी त्यास अडवत म्हणाली अरे पण ..इतक्या रात्री “अग सात तर वाजले आहेत.. तू चल आधी “अमित म्हणाला अश्विनीस नाईलाज होता तिला जावच लागणार होत.. दीक्षाच्या हि आणि अमितच्या हि डोळ्यात आनंदाश्रू आले होते.. अमित अश्विणीस मिठीत घेऊन ..पाणवला होता.. अश्विनी त्यास सरकवत म्हणाली “अरे दीक्षा पाहतेय” दीक्षा थोड दुसरीकडे चेहरा करून स्मित हस्य करू लागली… तिला पाहून अमित अश्विनी पासून दूर झाला आणि म्हणाला “चल मग जाऊन येउत..” अश्विनी तैयार होण्यास जाऊ लागली ..दीक्षा पुन्हा सतर्क झाली..आणि ती अश्विनीच्या मागोमाग गेली .. पण अमित ने तिला थांबवले ..”दीक्षा ..!” दीक्षा थांबली आणि अश्विनीला पाहत पाहतच म्हणाली “काय जीजू ?” मी अश्विनी साठी रॉकी आणला खरा आणि तुझ्या साठी पण काहीतरी आहे … येईल लवकरच .” दीक्षा समजू शकली नाही ती म्हणाली ”काय येतय? काय आणलय जीजू तुम्ही ?” अमित स्मित हस्य देत म्हणाला “येईल आल्यावर कळेलच तुला ” दीक्षा ठीक आहे म्हणत अश्विनी कडे जाऊ लागली ..पण समोरून अश्विनी तैयार होऊन आली..दीक्षा ने तिला थांबवल आणि म्हणली “आत बेडरूम मध्ये काही ?” अश्विनी गंभीर भावात म्हणाली “नाही काही नव्हत आत सध्या “… बर ठीक आहे जा तू .. अमित अश्विनीचा हात हातात घेऊन जाऊ लागला जाता जाता त्याचं बोलन सुरु होत..बोलता बोलता अश्विनी सहज म्हणून गेली अमित अरे ती खोली मागच्या बाजूची काही उघडत नाहीये… त्या कोपर्यातील तेव्हा अमित म्हणाला अग काय आशु तू पण हि वेळ काय कामाचे बोलण्याची आहे का ? काय आशु तू पण न ? चल जाऊ ..? तेवढ्यात इकडे दीक्षा ते ऐकून ताड्कन मागे वळली आणि तिने अश्विणीस हाक मारली ..”ताई थांब ! ” तिच्या त्या हाकेने अश्विनी दचकून थांबली .. आणि मागे वळली .आणि तिने हलकीशी मान हलवून विचारले.. “काय झाले ?” अमित पुन्हा म्हणाला काय झालय दीक्षा .. अहो काही नाही जीजू ..ताईला म्हणत होते कि त्या खोलीच्या चाव्या मला देता का मी साफ करते ती उघडून “ अमित म्हणाला “अग पण“ अश्विनीस कळून चुकले कि .. दीक्षाला काहीतरी तिथे सुगावा हवाय ..तिने पुढचे काही न बोलता आपल्या पर्स मधील चाव्या बाहेर काढल्या आणि दीक्षा कडे सोपवल्या आणि ते दोघे गेले .. ते जसे गेले तसा एक अनर्थ झाला … घरातील … लाईट गेली …

लाईट जाताच ..दीक्षाच्या तोंडून ..एक दचकून भीतीपोटी आवाज निघाला “नाहीईईइ..!!!” आणि या वेळी तो क्रूर रीतीने हसण्याचा आवाज …”ह्ह्हम्म्ह्ह्ह ह्ह्ह..” दिक्षाने तरी आपले मन आपल्या ताब्यात ठेऊन भानावर राहण्याचा प्रयत्न करीत होती… तीला अंधारात काहीच दिसत नव्हते .. दिक्षाने आपले एक पाउल उचलले .. तिच्या लक्षात होते ती जिथ उभा होती तेथून काही ६-८ पावलांवरती किचन होत आणि किचन मध्ये टेबलावरतीच मेणबत्ती आणि काडेपेटी होती .. दीक्षा हळू हळू चाचपडत चाचपडत जाऊ लागली… ती भिंतीवर एक हात ठेऊन जात होती… हा अंधार तिच्या जीवावर बेतणार कि काय असे तिला वाटत होत कारण अश्याच अंधारात पिशाचाच दुगन राज्य असत… तीच मन नकारात्मकतेने भरू लागल होत.. तिच्या मनात भीती निर्माण झाली होती आणि तेच तिच्यावर होणाऱ्या पुढच्या वाराच कारण होत… दीक्षा चाचपडत किचन मध्ये गेली..जाताच ती कशाला तरी जाऊन धडकली तो तिच्या नशिबाने टेबल होता आणि त्यावरच मेणबत्ती व काडे पेटी होती दीक्षा ने काडेपेटी उचलली तिचा हात भीतीने थर थर कापत होता प्रत्येक क्षण तिला जीवघेणा वाटत होता …आता काय होईल ? कधी कुठून कसे काय? पुढे येईल अंगावर धावेल कसला वार कोण करेल हे सगळे प्रश्न तिच्या मनात घूमत होते कि अचानक तिने काडेपेटीची काडी पेटवली ..कि समोर तिला एक विचित्र स्त्री उभा असेलेली जाणवली..तीचा पांढराशुभ्र चेहरा ..ती भयानक स्त्री वाटत होती,.. डोळ्यात काळेभोर काजळ ओठ लालभडक अंगात काळी साडी पांढरे केस आणि सूळे दात जिचा उजवा हात रक्तानी माखलेला होता ती.. दीक्षाला आणि दीक्षा तिला पाहतच उभे होते कि अचानक काडी विझली… दीक्षाच्या माथ्यावरती घामाचे थर जमा होत होते ..पुढची काडी पेटवताना ती सारखी सारखी तिच्या हातून सटकत होती. तरी हि कशीबशी करून ती पेटली ..”ख्ख्स्सस्स्स….” कि समोर कोणीच नव्हते यावेळी..दीक्षा ने मेणबत्ती पेटवली कि मागून तिच्या कोणीतरी पळत गेले दीक्षा चरकन मागे वळली कि मागे कोणीच नव्हते कि अचानक हॉल मधून कोणाच्या तरी बोलण्याचा आवाज दिक्षास आला दीक्षा हातात मेणबत्ती घेऊन हॉल कडे जाऊ लागली आणि हॉल मध्ये एक लहान मुलगी पांढऱ्या शुभ्र फ्रॉक मध्ये कोणाकडे तरी हाक मारत होती ..पण त्या हॉल मध्ये तिथ समोर कोणीच नव्हत पण ती मुलगी हॉल च्या मधोमध उभा राहून म्हणत होती कि ..”आन्ट्टी . मला उचलून घेना .. आन्ट्टी हिह्हिही…” तिने दिक्षास पाहिले आणि तीझ हसणे बंद झाले आणि ती रडू लागली …”मला ..मारू नका मी काही नाही केल प्लीज नका मारू मला “ असे म्हणत ती पळू लागली ..तिला पळताना पाहून दीक्षाही तिच्या माग धाऊ लागली.. ती मुलगी धावत धावत एका कोपऱ्यातील खोली जवळ जाऊन थांबली .. आणि आत पाहत रडू लागली… ती दीक्षा कडे मदत मागत होती… वाचव वाचव माझ्या आईला ताई “ बाबा मारतायत तिला .. ती तीच खोली होती जी अश्विनी उघडण्याचा प्रयत्न करीत होती .ती खोली उघडली होती आपोआप… आणि आतून एक प्रकाश बाहेर आला होता ..आतून दोघ जनाच्या साउल्या बाहेर पडत होत्या एक पुरुष जो चलताना हातात कुऱ्हाड घेऊन लंगडत आहे अस वाटत होत आणि एक स्त्री जी हात जोडू लागली होती गडगडून खाली लोळत होती . दीक्षा हळू हळू त्या मुलीकड जाऊं लागली ती मुली दीक्षा जवळ येताच त्या खोलीत धावली.. दीक्षा हि खोली जवळ पोहचली तिच्या हातात मेणबत्ती तशीच जळत होती.. ती जशी त्या खोली जवळ पोहचली त्या खोलीतील त्या साउल्या आणि ती मुलगी नाहीसी झाली आणि ती खोली उघडी राहिली..दीक्षा त्या खोलीजवळ पोहचली कि त्याच क्षणी.. आत तिला फक्त एक पियानो दिसला ..धूळ खात असेलला…पण स्थिती जणू नव्या सारखीच होती .. दीक्षा आत मध्ये गेली.. आत ती थेट पियानो जवळ जाऊन बसली.. तिथ अचानक तीच मुलगी आली . ती दिसण्यास जरा गोड होती .. दीक्षाला तिला पाहून जरास बर वाटले ..ती मुलगी तिला म्हणू लागली .. ताई वाजव न आई पण वाजवायची वाजव न ताई “ दीक्षा तिच्या कड पाहतच राहिली होती तिच्या मनात जरा भीती कमी झाली होती.. तिने पाहिलं बीप वाजवता क्षणी दीक्षा समोर एक लक्ख प्रकाश आला .. त्या प्रकाशात वेगवेगळे दृष्य दिसत होते… आणि त्याच प्रकाशात अचानक तिला एक एक करून सगळे दिसू लागले त्या घराचा इतिहास … आणि शेवटी दिसले कि त्या घरातील मुख्य सदस्याने .. आपल्या पत्नीस आणि मुलीस वेडाच्या भरात येऊन राक्षसा सारख्या निर्घृण वूत्ती ने त्या इवल्याश्या जीवाच्या आणि आपल्या प्रेमळ पत्नीच्या छातीत वार करून करून ठार केले होते… आणि स्वतः त्याने आत्महत्या केली होती…. दीक्षाच्या समोर काही तरी ठेवल होत तो एक कागद होता त्यावरती एक धून लिहिली होती .. दीक्षा पियानो वाजू शकत होती तिने ती धून वाजवण्यास सुरुवात केली ..ती बाजूची मुलगी .. उड्या मारू लागली.. पण आजूबाजूचे ठेवलेलं सामान धाड…!!धाड!!! हलु लागले.. दीक्षा ने वाजवणे बंद केले आणि ती बाहेर पळाली ती मुलगी मागून तिला ओरडू लागली “बाहेर नकोस जाऊ…. हॉल मध्ये बाबा आहेत त्या त्यांना झुंबलावर दोरीला झोका खेळतायत त्यांना आवडत नाही कोण तिथ आलेलं…” असे बोलत बोलत त्या मुलीच्या छातीतून रक्ताचे ओघोळ बाहेर पडू लागले बघता बघता तिचा पांढरा फ्रॉक रक्ताने माखला गेला… दीक्षा ते पाहूनच बाहेर धावली ..कि हॉल मध्ये अचानक येताच झुंबरावर कोणीतरी फाशी घेऊन लटकलेल तिला दिसल.. दीक्षा ते पाहून स्वतः ला सावरू शकत नव्हती.. त्या लटकनाऱ्या माणसाचे उघडे असणारे अन तिला पाहणारे ते भयंकर डोळे.. आणि विचित्र रित्या बाहेर आलेली त्याची जीभ आणि थेट खाली रक्ताच्या थारोळ्यात पडलेली.. ती कुऱ्हाड दीक्षा सर्व विसरून दाराच्या दिशेने धावली..कि दार आपोआप धाडदिसिने बंद झाले दीक्षा दीक्षा सैरवैर पळू लागली रडू लागली.. पण काहीच उपाय नव्हता… अंधारात आता मेणबत्ती देखील खाली पडली होती आणि विझण्याच्या कगारीवर येऊन ठेपली होती .. कि कशाला तरी अडखळून ती खाली पडली.. खाली पडताच तिच्या समोर तोच फाशी घेतलेला माणूस उभा होता.. जो या वेळी हातात कुऱ्हाड घेऊन दिक्षास मारण्याकरिता आला होता.. दीक्षा अडखळून खाली पडली होती… आणि ते प्रेत तिच्यावर घाव घालणार तेवढ्यातच दाराच्या पलीकडून एक आवाज आला खूप मोठा आवाज त्या घरात घुमला .. “भ्वाऔ….व्ब्भह्ह…. भ्वाऔ ” दीक्षा दरवाज्याकड पाहू लागली दरवाज्याच्या पलीकडून रॉकी उभा होता आणि त्या सोबतच आणखीन कोणीतरी होत ज्याने रॉकीस धरल होते दीक्षा त्या व्यक्तीस अंधारात ओळखू शकेना … कि अचानक दरवाज्यावर जणू कोणीतरी मोठ्याने लाथ घातली आणि दरवाजा उघडला… दरवाजा उघडता क्षणी रॉकी अजून एकदा जोरात भुंकला..कि अचानक दीक्षा पासून ते प्रेत दूर जाऊ लागले ते रॉकीच्या भुंकण्यास घाबरून निघून जात होते कि अचानक ते नाहीशे झाले.. ज्याने रॉकीला धरले होते त्याने आता रॉकीला सोडले रॉकी धावतच जाऊन दिक्षास बिलगून तिला चाटू लागला… दीक्षा त्या दारात उभा असलेल्या ओळखीच्या साउलीस… पाहण्याचा प्रयत्न करीत होती… कि अचानक लाईट आली …. आणि……….. दारात……… उभा होता..

आदित्य ..आदित्याला पाहून दिक्षाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता तिला रडू का हसू काहीच कळेनासे झाले होते .. पण तिला त्याचा आलेला राग अजून तिच्या मनात होता.. आदित्य .उंच असा लांब सरळ नाक….सुटसुटीत मउ केस.. अंगात..पांढरा शर्ट पायात जीन्स ची pant… हातात एक bag.. आणि हसमुख तेजस्वी गोरा चेहरा…आणि गळ्यात श्री हरी पांडुरंग विठ्ठलाचे लॉकेट .. आणि डोक्याने थोडासा .. सनकी… जगापेक्षा वेगळा विचार ठेवणारा .. असा होता आदित्य… त्याला पाहून दिक्षास मनातल्या मनात खूप आनंद झाला होता… पण ती दाखवत नव्हती.. ती वरून त्यावरती रागवलीच होती… कारण न सांगता तिला सोडून तो काही कामा साठी विदेशी गेला होता…ते पण एकूण ७ वर्षासाठी आदित्य, अमित आणि अश्विनी हे एकाच कॉलेजात असायचे दीक्षा अश्विनीची लहान बहिण होती,,…पण आदित्याच्याच वयाची… सहज आदित्य आणि दिक्षाची भेट झाली मैत्री झाली आणि मग प्रेम..

ती आदित्यच्या जवळ गेली.. तिच्या डोळ्यात घळघळून पाणी आले होते ते तसेच घेऊन ती त्याच्या जवळ गेली… ती जवळ यत आहे पाहून आदित्य स्मित हस्य करत होता…ती जवळ गेली आणि

आणि तिने खणकन आदित्यचा कानाखाली दिली … .आदित्य तिच्या चापटीने इव्ह्ळला …”स्स्स आई ग …!! दिशू अग किती जोरात मारतेस ..लागले न मला ” दीक्षा चा तो प्रेमळ राग आदित्यला खूप आवडला .. .दीक्षा त्याला रागवू लागली …”तू … तू मूर्ख बेअक्कल, बेह्या बेशरम आदित्य गुप्ता,,नालायक…..कशाला आलास माघारी तिकडेच मेला असतास तर बर झाले असते .. आणि ”..ती पुढच काही बोलणार तेवढ्यात आदित्यने आपला उजवा हात तिच्या कंबरेत घातला आणि तिची कंबर गच्च आवळून तिला आपल्यावरती खेचले… आणि तीझ्या ..शिव्या चालू असणाऱ्या सुंदर ओठांमध्ये त्याने आपले ओठ सामावले आणि तिचे चुंबन घेतले ..त्या प्रेमळ ह्र्द्यभेदी स्पर्शाने दीक्षाचे डोळे आपोआप झाकले जाऊ लागले.. … तिच्या झाकलेल्या डोळ्यातून ..घळाघळा पाण्याचे थेंब बाहेर ओघळत तिच्या गालावर येऊ लागले.. आदित्यने आपले ओठ तिच्या ओठातून बाहेर काढले.. तशी दीक्षा त्याला कडकडून बिलगत मिठी मारत रडू लागली,….. तिच्या रडण्याने आदित्य हसला आणि म्हणाला …”ए वेडूबाई …काय झाल ग अस रडायला? ” ..ती रडत रडत म्हणू लागली ..”का रे ? का अस सोडून गेला होतास न सांगता ? तुला काहीच कस वाटल नाही रे माझ्या बद्दल..किती वाट पाहिली मी तुझी ..साधा एक फोन तरी करायचा जिवंत आहे म्हणून ” असे म्हणत म्हणत ती त्याच्या छातीवर हलके हलके मारत रडू लागली .. कि आदित्यने तिला अजून बिलगून घेतले .. कि खाली रॉकी भूकू लागला लाईट हि आली होती .. बाहेर गाडीचा आवाज आला गाडीतून अमित आणि अश्विनी बाहेर पडले… आदित्यस पाहून दोघे हि खुश झाले .अमित दिक्षास म्हणाला पाहिलस मी म्हणालो होतो न तुझ्या साठी पण एक गिफ्ट आहे हे होत ते गीफ्ट .. अश्विणीस आदित्य ने शुभेच्छा दिल्या .. आणि अमित कडे वळला तेव्हा अमित म्हणाला ..”काय रे भूत माझ्या या गोड मेहुणी ला तुला सोडून जावस कसे वाटले रे ” आदित्य म्हणाला अरे माझ खूप म्हत्वाच काम होत तिकडे एका पिशा ,,,…. अश्विनी मला खूप भूक लागली आहे बघ तू आणि दीक्षा आमच्या करिता काही तरी जेवण बनवान तो पर्यंत मी आणि अमित येथे बोलत बसतो ..आदित्य बोलता बोलता थांबला आणि त्याने दीक्षा व अश्विनीस जेवणाची तैयार्री करण्यास सांगतिले.. आदित्य आणि अमित ..बाहेरच सोफ्यावर बसले …आदित्य जरा गंभीर मुद्रेत होता आणि अमित ने ते हेरले अमित म्हणाला काय रे काय झाले असा चेहरा का पाडलास .. तेव्हा आदित्य त्या कडे वळला आणि म्हणाला .. तुला आठवतय का .. एक वेळ मी तुला तिकडून मला मिळालेल्या केस बद्दल सांगितले होते कोणती ती तीच ना एक प्रेत एका कुटुंबाच्या मुली मागे लागलेले आणि त्याने म्हणे त्या घराच्या मुख्य सदस्यात त्या मुलीच्या वडिलाच्या आत घुसून सर्व घरादारास मृत्यू तोंडी ढकलले.. आदित्य म्हणाला” हो हो तीच तीच केस “ “मी त्या घरातील मुलीच्या विनंतीने ते घर पिशाचमुक्त केले.. मी आज पर्यंत असले जुनुनी पिशाच नव्हते पाहिले.. त्या पिशाचा मुळे मला इथून जावे लागले.. म्हणून मला इथ येण्यास वेळ लागला ..” “हो अस पण तू हे मला पुन्हा का सांगतोयस ” तेव्हा आदी उत्तरला… इथ आपल्या इथ पण याच शहरात अशीच एक केस घडली होती…पण त्यात पिशाच नव्हते ..एका माणसाने वेडाच्या भरात येऊन आपल्या मुलीस आणि पत्नीस कुर्हाडीने जीव मारले.. आणि जिथ असे घडले होते ,,,.. ते घर हेच होते… ..” तेव्हा ते ऐकून अमित म्हणाला ”तुला काय म्हणायचं आहे नेमके ?” आदित्य म्हणाला मला संशय आहे कि या घरात पिशाच्च आहे…. त्याने आता पर्यंत दोन वेळा आपले वास्तव्य साध्य केल आहे ..तू चिंता करशील म्हणून… अश्विनीने तुला सांगितले नाही.. “तेव्हा अमित हसला “ह्हा हाहाह … काय तू पन अरे .. ज्या घरात खून झालेला असतो तिथ भूत असेलच अस काही नसते .. तू उगाचच कलजी करतोयस .. मला तर तस काही जाणवले नाही .. आणि अश्विनीस या घराबद्दल नाहीये तस काही तू खर्च काळजी करू नकोस .. अरे वा मस्त वास येतोय जेवण तैयार आहे वाटते..चल जेवण करूयात ” आदी त्याला थांबवत म्हणाला तुला जर वाटत असेल मी चेष्टा करतोय.. तर तस नाहीये . तरी पण … तू सावध राहा माझ काम तुला इथ असलेल्या धोक्या पासून सावध करन आहे मीत्राच्या नात्यान.. “ अमित उतरला “ठीक आहे चल आता नाहीतर जेवण थंड होईल ..” सर्वांनी जेवण उरकून घेतले.. सर्व उरकून झाले अमित आणि अश्विनी झोपण्यास जाऊ लागले अश्विनीस दीक्षा नि थांबवले आणि तिला एका कोपरयात नेऊन तिने तो अंगारा अश्विनीच्या माथी लावला .. आणि तिला म्हणाली “ताई काही चिंता करू नकोस आता आदी पण आला आहे आणि अमित जीजू तुझ्या सोबत आहेत त्यांना घडलेला प्रकार नकोस सांगू ” अश्विनी भीत भीत होकारार्थी मान हलवत झोपण्यास गेली आदित्यचा गंभीर चेहरा दिक्षाला गोंधळात टाकत होता कारण आदि आणि दीक्षा आदी कडे आली त्याचा चेहरा तेव्हाच गंभीर व्हायचा जेव्हा एखादी परेशानी असेल ती पण साधी नव्हे एखाद्या प्रेताची . असेल तर अमित इकडे झोपण्यास गेला होता.. पण जात जात त्या पूर्वी तो बाथरूम मध्ये जाण्यास निघाला.. तो आत मध्ये गेला… आणि रॉकी हि त्याच्या जवळ आला होता रॉकी दारात बसला होता आणि बसूनच त्याला पाहत होता ..अमित आत मध्ये गेला…त्याने आपले तोंड धुतले आणि आरशात पाहिले पाहताच क्षणी आरशात त्याला एक काळी प्रतिकृती दिसली त्या आरशात त्याला दिसली त्याच्या हातात एक कुऱ्हाड होती आणि तो दिसण्यास अतिशय विचित्र वाटत होता तो माणूस त्या आरश्यातून बाहेर येऊ लागला अमितला आपल्या जागेवरून हलता येईनासे झाले होते… तरी हि तो प्रयत्न करीत होता रॉकी बाहेरून भुंकत होता.. आदित्यने रॉकीचा आवाज ओळखला त्याला समजले काहीतरी नक्कीच गडबड आहे .आदित्य धावला आणि बाथरूम कडे जाऊ लागला ..आणि ते प्रेत अमित मध्ये त्याच्या श्वासाद्वारे प्रवेश करण्यात समर्थ झाले… होते ..आदित्य बाथरूम कडे धावला आणि त्याने रॉकीस बाजूस घेऊन शांत केले… आदित्यास अमित ला पाहून खूप वेगळ वेगळ वाटत होत.. त्याच्या हावभावात बोलण्यात फरक जाणवत होता… पण आदित्य त्याला काही बोलला नाही.. अमित आपल्या रूम मध्ये जाऊ लागला.. जात जात त्याने रॉकी कडे एका रागीट नजरेने कटाक्ष टाकला.. आणि बेडरूम मध्ये गेला.. पण तो अश्विनीचा जीव घेण्यास आत जात होता ते आदित्यच्या लक्षात आले नाही.. आदित्यनेत्याकडे थोड दुर्लक्ष केल आणि तो परत दीक्षा कडे आला.. आणि म्हणाला दिशू आता पर्यंत झालेल्या सर्व घटना मला सांग लगेच ताबडतोब दीक्षा ने सर घटना क्रमाक्रमाने सांगितल्या त्या ऐकल्या नंतर आदित्य शेवटी एका निष्कर्षावर येऊन ठेपला… आज पर्यंत त्याने exorcism च्या प्रयत्नाने बऱ्याच लोकांना मुक्त केल होत… आदित्यने दिक्षास त्या खोली कडे चलण्यास म्हणला जिथे तो पियानो होता दीक्षा आणि आदित्य त्या पियानो कडे जाऊ लागले आदित्यने त्या खोलीचा दरवाजा उघडला… कि आतून एक थंडगार वाऱ्याचा झुळूक त्या दोघांना भेदत त्यांच्या आरपार झाला.. तो झुळूकाचा भेद असहनीय थंड होता. त्या ठिकाणी अंधार होता . आदित्यने खिशातील लाईटर बाहेर काढून पेटवले..दीक्षा त्याच्या कडे रागाने पाहू लागली ती म्हणाली “हे केव्हा पासून मिस्टर “ आदित्य भांबरला अग नाही हे माझ नाहीये हे तर अमितच आहे “ “बर!! जीजुच आहे होय हे ठीक आहे” तेवढ्यात आदी विषय बदलत म्हणाला ..”अग हाच का तो पियानो..” आदी समोरील हूल खात असलेल्या पियानो जवळ गेला आणि बोलला ,,, आदी त्या वरती बसला आणि त्याने एक बीप वाजवल ..काहीच होईना … दीक्षा पुढे सरसावली.. कि अचानक तो पियानो आपोआप वाजण्यास सुरुवात झाली… त्या पियानो भोवती काही साउल्या फिरू लागल्या .. आदी ते समजण्याचा प्रयत्न करू लागल्या त्याने आपल्या खिशातून एक क्रिस्टल बाहेर काढला तो एका साखळीस लटकत होता आदिने तो आपल्या मुठीत बंद करून त्यावर त्याने काही तरी मंत्र म्हणाला … आणि त्याने त्या क्रिस्टल वर फुंकर मारत तो तळहातावर धरला तळहातावर धरता क्षणी समोरील साउल्या एका जागी थांबल्या त्या थांबताच आदिने क्रिस्टल दीक्षाच्या हातात ठेवला.. पण इकडे अमित आपल्यात असलेल्या पिशाच शक्तीस अडवू शकत नव्हता .. त्या पिशाचाने ज्या प्रमाणे वेडाच्या भरात आपल्या पत्नी आणि मुलीस कुऱ्हाडीने ठार केले होत तसेच अमितला त्याने पछाडले होते.. आणि अमित आज अश्विनीचा जीव घेणार होता… इकडे आदी त्या साउल्या जवळ जाताच त्यांना रंग रूप आकार आले चेहरा आला,,,… त्यात एक आई आणि तिची मुलगी खेळताना दिसत होते आणि त्यांच्या मागे,… त्या स्त्रीचा पती कुऱ्हाड घेऊन मारण्यासाठी येत होता… त्याच्या मानेवर कसली तरी खुण होती ..ते पाहून आदित्य ला काहीतरी आठवू लागले त्याला वाटू लागले कि त्याने कोठेतरी आधीपण पाहिली आहे ती खुण कि आदित्यच्या लक्षात आले त्याने ती खुण अमित च्या मानेवर बाथरूम मध्ये असताना पाहिली होती ” आदित्यला सर्व काही कळून चुकले कि अमित आता अमित नाही राहिला त्यात त्या पिशाचाने आपला समावेश केला आहे .त्या पिशाचाने आपल्या पत्नीस आणि इवल्याश्या जीवास मारले होते… म्हणजे अमित अश्विनीस आणि तिच्या पोटातील इवल्याश्या जीवास मारणार “ओह्ह नो” आदीच्या च्या तोंडून उद्गार बाहेर पडले ….. कि तो दिक्षास घेऊन अश्विनी कडे धावणार तेवढयातच त्याला मागून त्या साउल्या मधून कोणीतरी हाक मारले त्या लहान मुलीचा आवाज होता तो ती म्हणाली … ताई अजून एकदा वाजव न हे पियानो आई वाजवायची .. दीक्षा त्या मुलीस पाहून घाबरली आणि ती आदी जवळ आली.. आदिने तिला म्हणले .. वाजव तो पियानो … दीक्षा म्हणाली का ? आदी उत्तरला ”कारण याच्या आवाजाने तिला तृप्ती मिळते. आणि ती आपल्या खऱ्या पिशाची योनीत येऊन मुक्त होईल … तू वाजव मी आहे तुझ्या सोबत .. गो ! दिशू यु कॅन डू इट” दीक्षा तीच धून वाजवू लागली ती मुलगी चिरकू लागली तिचा आवाज जीवघेणा येत होता…त्या आवाजाने इकडे अश्विनी जागी झाली आणि समोर तिच्या अमित उभा होता तो देखील कुऱ्हाड घेऊन ..अमितने कुऱ्हाडीने तिच्यावर वार केला ….”य्याआआआह्ह्ह… खच्च” पण .. अमित ने केलेला तो वार निष्फळ होता .. ती कुऱ्हाड त्याने अश्विनीच्या पोटाकडे वळवली तो तिच्या पोटावर वार करणार होता कि त्याच क्षणी अमित दूर जाऊन पडला गेला.. त्याला जोरदार झटका बसला होता … अश्विणीस काही कळेना .. ती अमितला घाबरू लागली… अमित तसाच उठला अश्विनीचे लक्ष तिच्या जवळील आरश्यात गेल तीला आढळून आल कि आई जगदंबेचा आशीर्वाद त्या म्हातारी आजीचा अंगारा तिच्या माथी होता .. पण अचानक त्या कडे अमित चे हि लक्ष गेले आणि त्याने बाजूचा पाण्याने भरलेला जग घेतला आणि अश्विनीच्या तोंडावरती … भिरकावला तो जाऊन थेट तिच्या माथ्याशी धडकला आणि तसेच तिला इजा झाली आणि ती खाली पडली ती थेट तिच्या पोटावरच .. अश्विणीस भयंकर पोटात त्रास जाणवू लागला ती रडू लागली इव्ह्ळू लागली …. तिच्या त्या रडण्याचा आवाजाने अमित ला (त्याच्यातील पिशाचाला० ) अत्यानंद होऊ लागला… तिचा आवाज ऐकून आदी तिच्या कडे येऊ लागला दार आतून बंद होत… आदी दारा जवळ पोहोचला तेव्हा रॉकी चा मृतदेह दाराबाहेर पडला होता .. आदी संतापला आदी जोरजोरात बाहेरून धक्के देऊ लागला .. दार उघडेना झाले होते.. इकडे दिक्षाने ती धून चालू ठेवली होती… ती धून संपत येत होती आणि ती समोरील मुलगी देखील हळू हळू आपल्या पिशाच योनीतून मुक्त होत चालली होती….अश्विनी बेशुद्ध झाली होती पाण्याने तिच्या माथ्यावरील तो टिळा पुसला होता आणि अमित तिला मारण्यास पुढे सरसावत होता… अमित ने कुऱ्हाड हातात घेतली .. त्याने एका क्रूर नजरेने अश्विनीकडे आणि एकदा कुऱ्हाडी कडे हस्य करत पाहिले आणि तो घाव घालणार इतक्यात .. दरवाजा तुटला गेला ..आणि आदित्य आतमध्ये आला त्याने अश्विनी वरील वार आपल्या वर घेतला आणि त्याच क्षणी ती कुऱ्हाड आदित्यच्या छातीवर बसली आणि एक रक्ताची त्या सोबत च त्याच्या छातीतून काही मांसाचे चिथडे बाहेर पडले…. तरी हि त्याने न विचार करता घृण रित्या आदीच्या छातीतून,…. ती कुऱ्हाड त्याच्या छातीवर पाय ठेऊन ती उपसली आदीच्या तोंडून एक मोठा चित्कार बाहेर पडला …आदीस अमित च्या मागे काहीतरी विचित्र उभा असलेले दिसत होते एक प्रेत अमित ला नियंत्रित करीत होते ..ते त्याच माणसाचे होते ज्यानी आपल्या पत्नी व मुलीस मारले होते इकडे ती मुलगी मुक्त झाली होती….. आणि पण त्या सोबत त्या मुलीची आईही त्या साउल्यामधून बाहेर पडली आणि ती देखील मुक्त झाली..तिने दीक्षाचे आभार मानले आंनी जात जात तिला सांगू लागली … “तया नराधमाचा जीव त्यांज कुर्हडीत हाय जर तुम्जा त्यास नष्ट करायचं तर त्याच्या कुराडीन त्याच मुंडक उडवा ..” एवढच बोलून ती नाहीशी झाली तिच्या बोलण्याहून दिक्षास कळाले कि हीच किचन मध्ये होती ते ..पन या वेळी ती काय म्हणाली होती हे तिला समजले… म्हणून दीक्षा धडपडत पळत आदित्यकडे जाऊ लागली… पण आदित्य इकडे जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला होता…..अश्विनी अमित कडे दयेची भिक मागत होती,… पण तो अमित नव्हता… अमित पुन्हा अश्विणीस मारण्यास सज्ज झाला होता या वेळी त्याने कुऱ्हाड उचलताच दीक्षा तेथे आली…. आणि रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडलेल्या … आदिकडे पाहून तिचे डोळे रागाने लालबुंद झाले होते… तिचा राग अनावर झाला होता तिने आपली सर्व ताकत एकटवून अमितला जोरदार धक्का दिला…..त्या धक्क्याने अमित अक्षरशः दूर जाऊन पडला … तिने अश्विनीस उठवले आणि आदिलाही कसे बसे बाहेर आणून तिने बाहेरून कडी लाऊन घेतली व आदीस आणि अश्विनीस हॉल मध्ये घेऊन आली तिथे ते दृष्य दिसत होत जे दिक्षाने आधी अंधारात पाहिले होते तोच झुंबरास लटकलेला माणूस त्याच ते देह लटकत होते… कि त्या आत्म्याने अमितचा देह सोडला आणि तो आपल्या मुळ शरीरात आला आणि त्या झुंबरास लटकणारे ते प्रेत जिवंत झाले.. डोळे पांढरे शुभ्र जणू त्यात बुभळे नव्हतीच .,,, रक्ताने माखलेली जीभ .. जेव्हा त्याने आपल्या मुलीस मारले होते तेव्हा त्याने कुऱ्हाडीच रक्त चाटून ती कुऱ्हाड साफ केली होती…वाढलेली केस … दिसण्यास राक्ष्सापेक्षा हि भंयकर .. आणि त्याने आपल्या गळ्यातील दोर तोडून तो जमिनीवर सावकाश सावकाश येऊ लागला.. सर्वत्र एक भयान वातावरण निर्माण झाले ह होते आला … त्याच क्षणी आदी थोडा फार शुद्धीवर आला होता…. आणि समोर त्यास दिसले कि ते प्रेत दीक्षा वर वार करण्यात येत आहे त्याच क्षणी आपल्या जखमांचा विचार न करता एका हाताने त्या पिशाचाची कुऱ्हाड पकडली… आदित्य उरले सुरले आवसान घेऊन उठला त्याने आपल्या गळ्यातील लॉकेट तोडून आपल्या मुट्टीत दाबून धरले तो पर्यंत त्या पिशाचाने आदीवर दुसरा वार केला आदिने तो हुकवला हुक्वता क्षणी ते पिशाच नाहीशे झाले आदी समजून चुकला.. कि ते नक्कीच दुसरी कडून परत अंगावर येईल इकडून अमित बाहेर आला ..अमित येताच आदी ओळखून राहिला कि अमित ठीक आहे आदिने सर्वांना घराबाहेर पाठवले…दीक्षा जाण्यास तैयार होईना ती म्हणू लागली” मी तुला एकवेळ हरवल आहे मला तुला पुन्हा नाही हरवायचंय ..मला थांबू दे रे आदी .. त्या नराधमाचा जीव तेव्हाच जाऊ शकतो जेव्हा तू त्याला त्याच्या कुऱ्हाडीने मारशील ऐक माझे “ आदी म्हणाला “काय ?” दीक्षा म्हणाली होय ए तसेच आहे आणि त्याच्या कडून ती कुऱ्हाड घेण अशक्य आहे … आदी विचारात पडला आणि त्याने किचन मध्ये असलेल्या gas सिलिंडर कडे नजर टाकली आणि म्हणाला “ठीक आहे मी पाहतो त्याच काय करायचं ते ” असे तो म्हणाला पण त्याने तीच एक न ऐकता तिला घराबाहेर काढले आणि तो किचन कडे गेला त्याने ठरवले होते कि आज स्वत:चा जीव गेला तरी चालेल पण यांना वाचवायचच!.. म्हणून आदिने किचनचे दार खिडक्या बंद केल्या कि त्याच क्षणी मागून त्याला एक गुरगुरण्याचा आवाज आला ..”hhrhrhggggggg” आणि क्षणातच त्यावर कुर्हाडीचा वार झाला आणि यावेळी तो वार थेट आदी कडून हुकवताच gas सिलिंडर वर बसला आणि gas लिक होऊ लागला … आदीच्या चेहऱ्यावर हास्य उमटले…. “चल ये आपण दोघ आता सोबतच यमलोकात जाउयात “ असे म्हणत आदिने आपल्या खिशातील लाईटर बाहेर काढले… आदिने जोरदार विठ्ठलाच नामस्मरण केले आणि क्षनार्धात आदिने हसत हसत एक वेळ डोळे झाकून दिक्षाचा चेहरा आठवला ..आणि लाईटर चा खटका खाली ओढला …. .कि“” … ध…..डाsssssम!!!!!! .. … पूर्ण किचन मध्ये सिलिंडरचा स्फोट झाला … आणि त्या सोबत आदित्य देखील .. किचनच्या खिडकीतून बाहेर पडला …. त्याच्या छातीत एक गजाचा तुकडा घुसला होता आणि छातीतून ..घळघळ रक्त बाहेर पडत होत…. आणि पायात असंख्य काचा घुसल्या होत्या ,,,… आणि आदी तडफडत …. बाहेर येऊन दीक्षाच्या समोर पडला होता… त्याला पाहून दीक्षाने आपले अंग टाकून दिले तिच्यात काहीही अवसान नव्हते राहिले अमित ने आणि अश्विनीने त्या दोघास गाडीत टाकले .. आणि दवाखान्यात आणले .. इकडे येत येत अश्विनी ने दिक्षास शुद्धीवर आणले होते…. दीक्षा आदित्य ला आपल्या मांडीवर घेऊन रडत होती….. ते दवाखान्यात पोहचले कि आदित्यास थेट आय सी यु मध्ये नेण्यात आले त्याचे ऑपरेशन झाले ऑपरेशन गृहाची बत्ती बंद झाली… डॉक्टर आतून बाहेर आले .. . .. . मी आज पर्यंत माझ्या मेडिकल करिअर मध्ये अशी केस कधीच पाहिली नव्हती… हा एक चमत्कारच आहे यांच ह्र्दय जणू घोड्या सारख दौड करतय… he is steel … ठीक आहेत ते आता तुम्ही भेटू शकता त्यांना जाऊन ,, पण कोणीतरी एकच जा …. अश्विनी आणि अमित ने दीक्षाच्या खांद्यावर हात ठेवत तिला जाण्याचा इशारा केला . आणि दीक्षा त्याच्या जवळ गेली … आदी आणि दीक्षा एकमेकास पाहून रडत होते… .. आदिला बर होण्यास जास्त काळ लागला नाही एक आठवड्यातच तो ठीक झाला… अश्विनीच्या देखील पोटातील बाळ ठीक आहे असे सांगण्यात आले अमितने या वेळी स्वतः चे घर बांधले आणि दीक्षा ने देखील आदी सोबत लग्न करून आपले नवीन घर घेतले… आणि ते सर्व सुखाने नांदू लागले … . आदिने ..सर्व गहिरा अंधार आता प्रकाशात ने नाहीसा केला होता ,,,.. पण .. एक गोखले नावाचे कुटुंब तेथे त्या घरात राहण्यास आले होते … आणि दुसऱ्या दिवशी पेपरात आदिस एक विचित्र बातमी…. एक विचित्र बातमी आढळून आली.. ती बातमी पाहून आदीस जोरदार धक्का बसला … .कि गोखले नावाचा एक कुटुंब एका रात्रीत एका घरात विना मुंडक्याचे मृत आढळून आले आणि घराच्या मुख्य सदस्याने आत्महत्या केली होती … आणि त्या घराचा फोटो पण त्या सोबत होता ते तेच घर होते ,,,,,………समाप्त ” धन्यवाद !!!!