Get it on Google Play
Download on the App Store

*धर्म 14

हे कात्यायना, सर्व आहे (आत्मा नित्य आहे) हा एक अंत. सर्व नाहीं (आत्मा मुळींच नाही) हा दुसरा अंत. या दोन अंताला न जातां तथागत मधल्या मार्गानेंच धर्मोपदेश करितो. (तो असा:-) अविद्येपासून संस्कार इत्यादि प्रतीत्यसमुत्पाद (संयुत्तनिकाय)

अविद्येपासून संस्कारांची उत्पत्ति, अविद्येचा नाश झाला म्हणजे संस्कारांचा नाश होतो इत्यादि नियम न बदलणारे आहेत; व त्यांस धर्मनियामता, धर्मस्थिति इत्यादी शब्दांनीं संबोधिलें आहे. बुद्ध म्हणतो:-

उत्पादा वा तथागतानं अनुप्पादा वा तथागतानं ठिताव सा धातु धम्मट्ठितता धम्मनियामना इदप्पच्चयता। तं तथागतो अभिसंबुज्झति अभिसंमेति। अभिसं बुज्झित्वा अभिसमेत्वा आचिक्खति, देसेति.. पस्सथाति चाह।

तथागत जन्मला काय किंवा न जन्मला काय, ही जी शक्ति, धर्मस्थिती, धर्मनियामता, कार्यकारणपरंपरा, ती आहेच आहे. तथागत तिला जाणतो, तिचा साक्षात्कार करून घेतो, तिला जाणून आणि तिचा साक्षात्कार करून घेऊन लोकांला सांगतो, लोकांला तिचा उपदेश करितो आणि हिला तुम्ही आपल्या बुद्धीनें जाणा, असें म्हणतो.(संयुत्तनिकाय)

हें जग शाश्वत आहे कीं, अशाश्वत आहे, या जगाचा अंत होणार आहे कीं नाही, शरीर आणि जीव एकच आहेच कीं भिन्न आहेत, प्रश्नणी मेल्यावर उत्पन्न होतो कीं नाही. इत्यादि प्रश्न सोडवीत बसल्याने  प्रज्ञाप्रश्नप्तीला मोठा अडथळा येण्याचा संभव आहे. कारण हे प्रश्न योग्य रीतीनें केलेलं नाहींत (न कल्लो पञ्हो), म्हणून हे प्रश्न बाजूस ठेवून योग्यानें प्रतीत्यसमुत्पादाचें यथार्थ ज्ञान करून घ्यावें आणि प्रज्ञा पूर्णत्वास न्यावी. कारण प्रज्ञेनेंच निर्वाणप्रश्नप्ति होणार आहे.

सभ्य गृहस्थ हो, याप्रमाणें अधिशीलशिक्षा अधिचित्तशिक्षा आणि अधिप्रज्ञाशिक्षा यांच्याद्वारें बौद्ध धर्माचा सारंभ आपणापुढें ठेंविला आहे. विषय मुळचा फार कठीण आहे. त्याला सौम्य स्वरूप देण्याचा होतां येईल तो प्रयत्न केला आहे. तो कितपत साधला आहे, हें काही माझ्यानें सांगवत नाहीं.