Get it on Google Play
Download on the App Store

बुद्धचरित्र (भाग दुसरा) 5

(२)
महाभिनिष्कमण


काही दिवसांनी शुद्धोदनराजाने सिद्धार्थाचे यशोधरा नावाच्या रूपवती कन्येबरोबर लग्न केले. सिद्धार्थाचें यशोधरादेवीवर अत्यंत प्रेम होते. तिच्यासहवर्तमान आपल्यासाठी बांधिलेल्या राजवाड्यांमध्ये सिद्धार्थानें मोठ्या आनंदाने तारुण्याचे दिवस घालविले. पण त्याच्या २९ साव्या वर्षी त्याला आपल्या पित्याची राजधानी पहावी व राजोद्यांनांत फिरून यावें, अशी इच्छा उत्पन्न झाली.

सिद्धार्थ उद्यानांत फिरावयाला जाणार, हे वर्तमन शुद्धोदनराजाला समजल्याबरोबर त्याने रस्ते, वगैरे सफसूफ करून अंध, पंगु, वृद्ध, वगैरे दुर्बळ लोकांनी त्या दिवशी रस्त्यावर फिरता कामा नये, असा हुकूम केला; परंतु सिद्धार्थ रथांत बसून उद्यानाकडे चालला असताना वाटेत त्याच्या पहाण्यात म्हातारपणाने खंगलेला एक माणूस आला. त्याला पाहून सिद्धार्थ आपल्या छन्न नावाच्या सारथ्याला म्हणाला “छन्न, हा जो समोरून प्राणी जात आहे, तो मनुष्य आहे की कोण आहे? तो जरी मनुष्यासारखा दिसत आहे, तरी मी पाहिलेल्या मनुष्यांहून त्याची स्थिती फारच निराळी आहे! त्याचें केंस पांढरे दिसत आहेत; दात तर मुळीच नाहीत; डोळे खोल गेले आहेत; तो हातामध्ये काठी घेऊन कांपतकांपत चालला आहे, आणि त्याची पाठ तर अगदी वांकून गेली आहे!”

छन्न म्हणाला “हे आर्यपुत्र! वृद्धपण म्हणतात ते हें! हा कोणी निराळा प्राणी नसून तुमच्याआमच्याप्रमाणें मनुष्यप्राणीच आहे. तुमच्यासारखा हा जेव्हा तरुण होता, तेव्हा त्याचे केस तुमच्यासारखेच काळेभोर होते! तेव्हा तुमच्यासारखाच तारुण्यमद त्याच्या अंगामध्ये भरला होता. यानें कदाचित पुष्कळ मल्लयुद्धें करून जय मिळविला असेल; कदाचित संग्रामामध्ये शिरून मोठमोठ्या योद्ध्यांचा पराभव केला असेल; आपल्या तारुण्यश्रीच्यायोगे पुष्कळ तरुण स्त्रियांचे चित्त आकर्षून घेतलें असेल, पण आता त्यातील काहीएक राहिले नाही! तो जर आपल्या पराक्रमाच्या गोष्टी सांगेल, तर लहान मुलेंदेखील त्याची थट्टा करतील! या अवस्थेमध्ये तरुणींचे चित्त आकर्षून घेणे राहूं द्या, उलट त्यांच्या अत्यंत तिरस्कराला मात्र तो पात्र होईल. हे राजपुत्र आमचें तारुण्यदेखील असेच चंचल आहे. जर आम्ही आणखी काही वर्षे जगलो, तर आम्हालाहि ही स्थिति प्राप्त झाल्यावाचून राहणार नाही!”

सिद्धार्थ म्हणाला “छन्न, येथूनच माझा रथ मागे फिरीव. मी पुन: माझ्या वाड्यात जाऊं इच्छितो. आतां उद्यानांत क्रीडा करण्याची मला इच्छा राहिली नाही.

सिद्धार्थ उद्यानक्रीडेला न जातां माघार फिरला, हे वर्तमान शुद्धोदनराजाला समजलें, तेव्हा छन्न सारथ्याला आणवून तो मागे का फिरला, याची त्यानें विचारपूस केली. जराजर्जरित मनुष्याला पाहून आपला पुत्र मागें फिरला, हे वर्तमान ऐकून राजाला फारच काळजी पडली. आपला मुलगा उदासीन होऊन गृहत्याग करील या विवंचनेनें त्याचे मन घेरले. तेव्हा त्याने जिकडेतिकडे मुलाच्या रक्षणासाठी पहारा ठेविला व सिद्धार्थाच्या वाड्यामध्ये ज्या नृत्यांगना ठेवण्यात आल्या होत्या, त्यात आणखी भर घातली. पण राजाच्या प्रयत्नांचा सिद्धार्थाच्या मनावर काहीएक परिणाम झाला नाही. त्याच्या डोळ्यांसमोर त्या म्हातार्‍या मनुष्याच्या रूपानें मूर्तिमंत जरा उभी राहू लागली.

पुन: एके दिवशी तो उद्यानामध्ये फिरावयाला निघाला असता वाटेंत त्याला एक रोगी माणूस भेटला. त्याला पाहून सिद्धार्थ छन्न सारथ्याला म्हणाला “हा माणूस कोण आहे? याला वृद्ध म्हणावे, तर याचे केस पांढरे झाले नाहींत किंवा याचे दातहि पडले नाहीत. तथापि हा त्या वृद्ध मनुष्यापेक्षाहि अधिक अशक्त झालेला आहे!”

छन्न म्हणाला “आर्यपुत्र व्याधि म्हणतात ती ही! आम्हांला आज आम्ही बलवान आहों, असें वाटते, परंतु वस्तुत: व्याधीच्यायोगे आमचे बल कधी नष्ट होईल, याचा नेम नाही! दोन दिवसांमागे हा मनुष्य सशक्त होता, पण आज त्याची रोगानें काय स्थिती केली पहा! मनुष्यप्राण्याचें बळ किती चंचल आहे बरे!’

बोधिसत्व म्हणाला ‘छन्न माझा रथ येथूनच माघारा घे. आजपर्यंत आरोग्याच्या मदानें मी धुंद झालों होतो, पण आतां तो मद राहिला नाही. आता उद्यानक्रीडेची मला हौस रहिली नाही.”

बुद्धलीला सारसंगह

धर्मानंद कोसंबी
Chapters
प्रस्तावना (धर्मानंद कोसंबी) प्रस्तावना (लक्ष्मणशास्त्री जोशी) 1 प्रस्तावना (लक्ष्मणशास्त्री जोशी) 2 प्रस्तावना (लक्ष्मणशास्त्री जोशी) 3 प्रस्तावना (लक्ष्मणशास्त्री जोशी) 4 प्रस्तावना (लक्ष्मणशास्त्री जोशी) 5 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 1 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 2 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 3 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 4 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 5 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 6 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 7 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 8 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 9 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 10 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 11 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 12 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 13 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 14 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 15 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 16 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 17 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 18 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 19 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 20 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 21 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 22 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 23 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 24 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 25 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 26 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 27 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 28 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 29 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 30 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 31 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 32 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 33 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 34 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 35 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 36 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 37 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 38 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 39 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 40 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 41 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 42 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 43 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 44 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 1 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 2 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 3 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 4 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 5 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 6 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 7 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 8 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 9 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 10 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 11 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 12 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 13 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 14 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 15 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 16 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 17 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 18 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 19 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 20 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 21 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 22 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 23 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 24 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 25 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 26 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 27 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 28 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 29 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 30 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 31 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 32 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 33 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 34 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 35 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 36 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 37 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 38 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 39 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 40 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 41 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 42 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 43 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 44 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 45 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 1 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 2 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 3 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 4 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 5 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 6 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 7 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 8 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 9 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 10 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 11 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 12 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 13 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 14 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 15 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 16 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 17 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 18 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 19 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 20 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 21 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 22 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 23 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 24 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 25 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 26 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 27 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 28 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 29 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 30 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 31 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 32 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 33 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 34 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 35 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 36 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 37 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 38 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 39 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 40 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 41 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 42 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 43 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 44 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 45 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 46 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 47 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 48 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 49 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 50 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 51 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 52 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 53