Get it on Google Play
Download on the App Store

सुत्तनिपात 133

मराठी अनुवादः-

३६
[१०. कोकालिक१सुत्त] (१ मुळांत कोकालिय असा पाठ आहे, पण अट्ठकथेंत कोकालिक असा आढळतो, व तोच येथें (भाषान्तरांत) स्वीकारला आहे.)


असें मी ऐकलें आहे. एके समयीं भगवान् श्रावस्ती येथें जेतवनांत अनाथपिंडिकाच्या आरामांत राहत होता. त्या वेळी कोकालिक भिक्षु भगवन्तापाशी आला. येऊन भगवन्ताला वंदन करून एका बाजूला बसला. एका बाजूस बसून कोकालिय भिक्षु भगवन्ताला म्हणाला- भदन्त शारिपुत्र आणि मौद्गल्यायन हे पापेच्छ असून पापी वासनांना वश झाले आहेत. असें म्हटल्यावर भगवान् कोकालिक भिक्षूला म्हणाला-हे कोकालिका, असें म्हणूं नकोस; कोकालिका, शारिपुत्र-मौद्गल्यायनांवर विश्वास ठेव. शारिपुत्र-मौद्गल्यायन सद्गुणी (पेशल) आहेत. दुसर्‍यांदाही कोकालिक भिक्षू भगवन्ताला म्हणाला- भदन्त, जरी भगवन्तावर माझी श्रद्धा आणि विश्वास आहे, तरी शारिपुत्र व मौद्गल्यायन हे पापेच्छच असून पापी वासनांना वश झाले आहेत. दुसर्‍यांदाही भगवान् कोकालिक भिक्षूला म्हणाला-हे कोकालिका, असें म्हणूं नकोस, असें म्हणूं नकोस, शारिपुत्र-मौद्गल्यायनांवर विश्वास ठेव. शारिपुत्र-मौद्गल्यायन सद्गुणी आहेत. तिसर्‍यांदाही कोकालिक भिक्षू भगवन्ताला म्हणाला- भदन्त, जरी भगवन्तावर माझी श्रद्धा आणि विश्वास आहे, तरी शारिपुत्र व मौद्गल्यायन हे पापेच्छच असून पापी वासनांना वश झाले आहेत. तिसर्‍यांदाही भगवान् कोकालिक भिक्षूला म्हणाला-हे कोकालिका, असें म्हणूं नकोस, असें म्हणूं नकोस; कोकालिका, शारिपुत्र-मौद्गल्यायनांवर विश्वास ठेव, शारिपुत्र-मौद्गल्यायन सद्गुणी आहेत.

तेव्हा कोकालिक भिक्षु आसनावरून उठला, व भगवन्ताला नमस्कार करून व प्रदक्षिणा करून तेथून निघाला. तेथून निघाल्याबरोबर कोकालिक भिक्षूच्या सर्व शरिरावर मोहरीएवढे फोड उठले. ते मोहरीएवढे होऊन मुगाएवढे झाले, मुगाएवढे होऊन वाटाण्याएवढे झाले; वाटाण्याएवढे होऊन बोराच्या बी-एवढे झाले; बोराच्या बीएवढे होऊन बोराएवढे झाले; बोराएवढे होऊन आंवळ्याएवढे झाले; आंवळ्याएवढे होऊन कोंवळ्या बेलफळाएवढे झाले;

कोंवळ्या बेलफळाएवढे होऊन (पिकलेल्या) बेलफळाएवढे झाले, आणि पिकलेल्या बेलफळाएवढे होऊन फुटले. त्यांतून पू, रक्त वाहूं लागलें, आणि त्याच रोगानें कोकालिक भिक्षु मरण पावला. मरण पावल्यावर कोकालिक भिक्षु मनांतील शारिपुत्रमौद्गल्यायनांच्या द्वेषामुळे पद्मनरकांत जन्मला.

तेव्हां रात्र संपत आली असतां, अत्यंत सुन्दर, सहंपति ब्रह्मा सर्व जेतवन प्रकाशित करून, भगवन्तापाशी आला; येऊन भगवन्ताला वंदन करून एका बाजूला उभा राहिला. एका बाजूस उभा राहून सहंपति ब्रह्मा भगवन्ताला म्हणाला-भदन्त, कोकालिक भिक्षु मरण पावला; मरण पावून कोकालिक भिक्षु मनांतील शारिपुत्र-मौद्गल्यायनांच्या द्वेषामुळें पद्मनरकांत जन्मला. असें सहंपति ब्रह्म म्हणाला. असें म्हणून भगवंताला वंदन करून व प्रदक्षिणा करून तेथेंच अन्तर्धान पावला.

तदनंतर रात्र संपल्यावर भगवान् भिक्षूंना म्हणाला-भिक्षूंनो, गेल्या रात्रीं, रात्र संपत आली असतां...इत्यादी...असें सहपति ब्रह्मा म्हणाला. असें म्हणून मला वंदन करून व प्रदक्षिणा करून तेथेंच अन्तर्धान पावला.

असें म्हटल्यावर एक भिक्षु भगवंताला म्हणाला—“भदन्त, किती दीर्घ काळ पद्म नरकांत आयुष्याचें मान असतें?” “हे भिक्षु, पद्म नरकांत आयुष्याचें मान फार मोठें आहे; तें इतकी वर्षे, इतकीं शतकें, इतकीं हजार वर्षे किंवा इतकीं लक्ष वर्षे असें गणना करून सांगणें सोपे नाहीं,” “भदन्त, पण त्या बाबतींत उपमा देणें शक्य आहे काय?’ भगवान् म्हणाला- “हे भिक्षु, तें शक्य आहे. हे भिक्षु, कोसल देशांतील वीस खारी१ (१ चार आढकांचा द्रोण व १६ द्रोणांची एक खार.) तिळांचा गाडा (वाह) असतो व त्यांतून एकादा मनुष्य दर शंभराव्या वर्षाला एक तीळ काढीत राहील तर, या क्रमानें तो कोशल देशांतील वीस खारींचा तिळाचा गाडा लवकर खलास होईल, पण अर्बुद नरकांतील आयुष्य खलास होणार नाहीं. हे भिक्षु अर्बुदाच्या वीसपट निरर्बुद नरकांत आयुष्य, निरर्बुदाच्या वीसपट अबब नरकांत आयुष्य, अबबच्या वीसपट अहह नरकांत आयुष्य. हे भिक्षु, अहहच्या वीसपट अटट नरकांत आयुष्य. हे भिक्षु, अटटच्या वीसपट कुमुद नरकांत आयुष्य. हे भिक्षु, कुमुदाच्या वीसपट सौगन्धिक नरकांत आयुष्य. हे भिक्षु, सौगन्धिकाच्या वीसपट उत्पलक नरकांत आयुष्य. हे भिक्षु, उत्पलकाच्या वीसपट पुण्डरीक नरकांत आयुष्य. हे भिक्षु, पुण्डरीकाच्या वीसपट पद्म नरकांत आयुष्य. हे भिक्षु, मनांतील शारिपुत्र- मौद्गल्यायनांच्या द्वेषामुळें कोकालिक भिक्षु त्या पद्म नरकांत जन्मला आहे. असें भगवान् म्हणाला. असें म्हणून तदनंतर तो सुगत शास्ता म्हणाला—

सुत्तनिपात

धर्मानंद कोसंबी
Chapters
प्रास्ताविक चार शब्द 1 प्रास्ताविक चार शब्द 2 भाषातरकारांची प्रस्तावना 1 भाषातरकारांची प्रस्तावना 2 भाषातरकारांची प्रस्तावना 3 ग्रंथपरिचय 1 ग्रंथपरिचय 2 ग्रंथपरिचय 3 ग्रंथपरिचय 4 ग्रंथपरिचय 5 ग्रंथपरिचय 6 ग्रंथपरिचय 7 ग्रंथपरिचय 8 ग्रंथपरिचय 9 ग्रंथपरिचय 10 ग्रंथपरिचय 11 ग्रंथपरिचय 12 सुत्तनिपात 1 सुत्तनिपात 2 सुत्तनिपात 3 सुत्तनिपात 4 सुत्तनिपात 5 सुत्तनिपात 6 सुत्तनिपात 7 सुत्तनिपात 8 सुत्तनिपात 9 सुत्तनिपात 10 सुत्तनिपात 11 सुत्तनिपात 12 सुत्तनिपात 13 सुत्तनिपात 14 सुत्तनिपात 15 सुत्तनिपात 16 सुत्तनिपात 17 सुत्तनिपात 18 सुत्तनिपात 19 सुत्तनिपात 20 सुत्तनिपात 21 सुत्तनिपात 22 सुत्तनिपात 23 सुत्तनिपात 24 सुत्तनिपात 25 सुत्तनिपात 26 सुत्तनिपात 27 सुत्तनिपात 28 सुत्तनिपात 29 सुत्तनिपात 30 सुत्तनिपात 31 सुत्तनिपात 32 सुत्तनिपात 33 सुत्तनिपात 34 सुत्तनिपात 35 सुत्तनिपात 36 सुत्तनिपात 37 सुत्तनिपात 38 सुत्तनिपात 39 सुत्तनिपात 40 सुत्तनिपात 41 सुत्तनिपात 42 सुत्तनिपात 43 सुत्तनिपात 44 सुत्तनिपात 45 सुत्तनिपात 46 सुत्तनिपात 47 सुत्तनिपात 48 सुत्तनिपात 49 सुत्तनिपात 50 सुत्तनिपात 51 सुत्तनिपात 52 सुत्तनिपात 53 सुत्तनिपात 54 सुत्तनिपात 55 सुत्तनिपात 56 सुत्तनिपात 57 सुत्तनिपात 58 सुत्तनिपात 59 सुत्तनिपात 60 सुत्तनिपात 61 सुत्तनिपात 62 सुत्तनिपात 63 सुत्तनिपात 64 सुत्तनिपात 65 सुत्तनिपात 66 सुत्तनिपात 67 सुत्तनिपात 68 सुत्तनिपात 69 सुत्तनिपात 70 सुत्तनिपात 71 सुत्तनिपात 72 सुत्तनिपात 73 सुत्तनिपात 74 सुत्तनिपात 75 सुत्तनिपात 76 सुत्तनिपात 77 सुत्तनिपात 78 सुत्तनिपात 79 सुत्तनिपात 80 सुत्तनिपात 81 सुत्तनिपात 82 सुत्तनिपात 83 सुत्तनिपात 84 सुत्तनिपात 85 सुत्तनिपात 86 सुत्तनिपात 87 सुत्तनिपात 88 सुत्तनिपात 89 सुत्तनिपात 90 सुत्तनिपात 91 सुत्तनिपात 92 सुत्तनिपात 93 सुत्तनिपात 94 सुत्तनिपात 95 सुत्तनिपात 96 सुत्तनिपात 97 सुत्तनिपात 98 सुत्तनिपात 99 सुत्तनिपात 100 सुत्तनिपात 101 सुत्तनिपात 102 सुत्तनिपात 103 सुत्तनिपात 104 सुत्तनिपात 105 सुत्तनिपात 106 सुत्तनिपात 107 सुत्तनिपात 108 सुत्तनिपात 109 सुत्तनिपात 110 सुत्तनिपात 111 सुत्तनिपात 112 सुत्तनिपात 113 सुत्तनिपात 114 सुत्तनिपात 115 सुत्तनिपात 116 सुत्तनिपात 117 सुत्तनिपात 118 सुत्तनिपात 119 सुत्तनिपात 120 सुत्तनिपात 121 सुत्तनिपात 122 सुत्तनिपात 123 सुत्तनिपात 124 सुत्तनिपात 125 सुत्तनिपात 126 सुत्तनिपात 127 सुत्तनिपात 128 सुत्तनिपात 129 सुत्तनिपात 130 सुत्तनिपात 131 सुत्तनिपात 132 सुत्तनिपात 133 सुत्तनिपात 134 सुत्तनिपात 135 सुत्तनिपात 136 सुत्तनिपात 137 सुत्तनिपात 138 सुत्तनिपात 139 सुत्तनिपात 140 सुत्तनिपात 141 सुत्तनिपात 142 सुत्तनिपात 143 सुत्तनिपात 144 सुत्तनिपात 145 सुत्तनिपात 146 सुत्तनिपात 147 सुत्तनिपात 148 सुत्तनिपात 149 सुत्तनिपात 150 सुत्तनिपात 151 सुत्तनिपात 152 सुत्तनिपात 153 सुत्तनिपात 154 सुत्तनिपात 155 सुत्तनिपात 156 सुत्तनिपात 157 सुत्तनिपात 158 सुत्तनिपात 159 सुत्तनिपात 160 सुत्तनिपात 161 सुत्तनिपात 162 सुत्तनिपात 163 सुत्तनिपात 164 सुत्तनिपात 165 सुत्तनिपात 166 सुत्तनिपात 167 सुत्तनिपात 168 सुत्तनिपात 169 सुत्तनिपात 170 सुत्तनिपात 171 सुत्तनिपात 172 सुत्तनिपात 173 सुत्तनिपात 174 सुत्तनिपात 175 सुत्तनिपात 176 सुत्तनिपात 177 सुत्तनिपात 178 सुत्तनिपात 179 सुत्तनिपात 180 सुत्तनिपात 181 सुत्तनिपात 182 सुत्तनिपात 183 सुत्तनिपात 184 सुत्तनिपात 185 सुत्तनिपात 186 सुत्तनिपात 187 सुत्तनिपात 188 सुत्तनिपात 189 सुत्तनिपात 190 सुत्तनिपात 191 सुत्तनिपात 192 सुत्तनिपात 193 सुत्तनिपात 194 सुत्तनिपात 195 सुत्तनिपात 196 सुत्तनिपात 197 सुत्तनिपात 198 सुत्तनिपात 199 सुत्तनिपात 200 सुत्तनिपात 201 सुत्तनिपात 202 सुत्तनिपात 203 सुत्तनिपात 204 सुत्तनिपात 205 सुत्तनिपात 206 सुत्तनिपात 207 सुत्तनिपात 208 सुत्तनिपात 209 सुत्तनिपात 210 सुत्तनिपात 211 सुत्तनिपात 212 सुत्तनिपात 213 सुत्तनिपात 214 सुत्तनिपात 215 सुत्तनिपात 216 सुत्तनिपात 217 सुत्तनिपात 218 सुत्तनिपात 219 सुत्तनिपात 220 सुत्तनिपात 221 सुत्तनिपात 222 सुत्तनिपात 223 सुत्तनिपात 224 सुत्तनिपात 225 सुत्तनिपात 226 सुत्तनिपात 227 सुत्तनिपात 228 सुत्तनिपात 229