Get it on Google Play
Download on the App Store

*परिशिष्ट 18

हातांत भिक्षापात्र घेऊन फिरणार्‍याने त्याने मुका नसतां त्याने मुक्यासारखें वागावें आणि मिळालेल्या अल्प भिक्षेचा तिरस्कार व दात्याचा अनादर करू नये. १५

श्रमणाने (बुध्दाने) हीन मार्ग कोणता व उत्तम मार्ग कोणता याचें स्पष्टीकरण केलें आहे. संसाराच्या पार दोनदा जात नसतात तरी पण ज्ञान एकाच प्रकारचें असतें असें नाही. १६

ज्या भिक्षूला आसक्ति नाही, ज्याने संसारखोत तोडलें व जी कृत्याकृत्यापासून मुक्त झाला, त्याला परिदाह राहत नाही. १७

तुला मी मौनेय सांगतों- असें भगवान म्हणाला - क्षुरधारेवरील मध चाटणार्‍या माणसाप्रमाणे सावध व्हावें; जीभ ताळूला लावून देखील जेवणांत संयम बाळगावा. १८

सावधचित्त व्हावें, पण फार चिंतनही करूं नये; हीन विचारांपासून मुक्त, अनाश्रित आणि ब्रह्मचर्यपरायण व्हावे. १९

एकांतवासाची आणि श्रमणोपासनेची (ध्यानचिंतनाची) आवड धरावी. एकाकीपणाला मौन म्हणतात. जर एकाकी राहण्यांत तुला आनंद वाटूं लागेल, २०

तर ध्यानरत कामत्यागी धीरांचे वचन ऐकून तूं दशदिशा प्रकाशित करशील. तरी (त्या पदाला पोचलेल्या) माझ्या श्रावकाने र्‍ही (पापलज्जा) आणि श्रध्दा वाढवावी. २१

तें नद्यांच्या उपमेने जाणावें. ओढे धबधब्यावरून खिंडींतून मोठा आवाज करीत वाहतात; पण मोठया नद्या संथपणें जातात. २२
जें उथळ तें खळखळतें, पण जें गंभीर तें संथच असतें. मूढ अर्ध्या घडयाप्रमाणे खळखळतो; पण सुज्ञ गंभीर जलर्‍हदाप्रमाणे शांत असतो. २३

श्रमण (बुध्द) जें पुष्कळ बोलतो तें योग्य आणि उपयुक्त असें जाणून बोलतो. जाणून तो धर्मोपदेश करतो व जाणून पुष्कळ बोलतो.(२४)

पण तो संयतात्मा जाणत असूनही पुष्कळ बोलत नाही, तो मुनि मौनाला योग्य आहे, त्या मुनीने मौन जाणलें. (२५)

उपतिसपसिने

हें 'सारिपुत्तसुत्त' या नावाने सुत्तनिपातांत सापडते. अट्टकथेंत याला थेरपञ्ह असेंही म्हटलें आहे. त्यावरून असें दिसते की, याला सारिपुत्तपञ्ह किंवा उपतिस्सपञ्ह असेंही म्हणत असावें. त्याचें भाषांतर येणेंप्रमाणे-
आयुष्यमान् सारिपुत्त म्हणाला, - असा गोड बोलणारा, संतुष्ट*व संघाचा पुढारी शास्ता, मी यापूर्वी पाहिला नाही किंवा ऐकला नाही. १

भगवान बुद्ध (उत्तरार्ध)

धर्मानंद कोसंबी
Chapters
आत्मवाद 1 आत्मवाद 2 आत्मवाद 3 आत्मवाद 4 आत्मवाद 5 आत्मवाद 6 आत्मवाद 7 आत्मवाद 8 आत्मवाद 9 आत्मवाद 10 आत्मवाद 11 आत्मवाद 12 कर्मयोग 1 कर्मयोग 2 कर्मयोग 3 कर्मयोग 4 कर्मयोग 5 कर्मयोग 6 कर्मयोग 7 कर्मयोग 8 कर्मयोग 9 कर्मयोग 10 कर्मयोग 11 यज्ञयाग 1 यज्ञयाग 2 यज्ञयाग 3 यज्ञयाग 4 यज्ञयाग 5 यज्ञयाग 6 यज्ञयाग 7 यज्ञयाग 8 यज्ञयाग 9 यज्ञयाग 10 यज्ञयाग 11 यज्ञयाग 12 यज्ञयाग 13 जातिभेद 1 जातिभेद 2 जातिभेद 3 जातिभेद 4 जातिभेद 5 जातिभेद 6 जातिभेद 7 जातिभेद 8 जातिभेद 9 जातिभेद 10 जातिभेद 11 जातिभेद 12 जातिभेद 13 जातिभेद 14 जातिभेद 15 मांसाहार 1 मांसाहार 2 मांसाहार 3 मांसाहार 4 मांसाहार 5 मांसाहार 6 मांसाहार 7 मांसाहार 8 मांसाहार 9 मांसाहार 10 दिनचर्या 1 दिनचर्या 2 दिनचर्या 3 दिनचर्या 4 दिनचर्या 5 दिनचर्या 6 दिनचर्या 7 दिनचर्या 8 दिनचर्या 9 दिनचर्या 10 दिनचर्या 11 दिनचर्या 12 *परिशिष्ट 1 *परिशिष्ट 2 *परिशिष्ट 3 *परिशिष्ट 4 *परिशिष्ट 5 *परिशिष्ट 6 *परिशिष्ट 7 *परिशिष्ट 8 *परिशिष्ट 9 *परिशिष्ट 10 *परिशिष्ट 11 *परिशिष्ट 12 *परिशिष्ट 13 *परिशिष्ट 14 *परिशिष्ट 15 *परिशिष्ट 16 *परिशिष्ट 17 *परिशिष्ट 18 *परिशिष्ट 19 *परिशिष्ट 20 *परिशिष्ट 21 *परिशिष्ट 22 *परिशिष्ट 23