Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

दिनचर्या 6

यानंतर अजातशत्रूचा आणि भगवंताचा बराच मोठा संवाद आहे. तो येथे देण्याचें कारण नाही. संघाबरोबर भगवान राहत असे, तेव्हा भिक्षुसमुदायांत कोणतीही गडबड होत नसे, एवढें दाखविण्यासाठीच हा प्रसंग येथे दिला आहे.

भिक्षुसंघाच्या शिस्तीचा प्रभाव

सकाळच्या प्रहरी भगवान भिक्षेला जात असतां कधी कधी निरनिराळया परिव्राजकांच्या आश्रमांना भेट देई. भगवंताला पाहून परिव्राजकांचे पुढारी आपल्या शिष्यांना म्हणत,'' हा श्रमण गोतम येत आहे. त्याला गडबड आवडत नाही. यास्तव तुम्ही मोठमोठयाने गोष्टी न करता जरा शांत बसा.'' अशाच एका प्रसंगाचें वर्णन मज्झिननिकायांतील महासकुलुदायिसुत्तांत (नं. ७७) आहे. त्यांत बुध्दाच्या दिनचर्येतील दुसर्‍याही कांही गोष्टींचा खुलासा आला असल्यामुळे त्याचा संक्षिप्त गोषवारा येथे देतो.

भगवान राजगृह येथे वेणुवनांतील कलंदकनिवापांत राहत होता. त्या वेळीं कांही प्रसिध्द परिव्राजक मोरनिवापांतील परिव्राजकांच्या आरामांत राहत असत. एके दिवशीं सकाळीं भगवान राजगृंहात भिक्षाटन करण्याला निघाला. भिक्षाटनाला जाण्याचा समय झाला नसल्यामुळे भगवान वाटेंत त्या परिव्राजकांच्या आश्रमाकडे गेला. तेथे सकुलुदायि* आपल्या मोठया परिव्राजकसभेंत बसला होता; आणि ते परिव्राजक राजकथा, चोरकथा, महामात्यकथा, सेनाकथा, भयकथा, युध्दकथा इत्यादि भलत्यासलत्या † गोष्टी मोठयामोठयाने बोलत होते. सकुलुदायीने आश्रमाच्या कांही अंतरावर भगवंताला पाहिले; आणि तो आपल्या शिष्यांना म्हणाला,'' बाबांनो, मोठयाने बोलूं नका, गडबड बंद करा. हा श्रमण गोतम येत आहे. त्याला हळू बोलणें आवडते, व हळू बोलण्याची तो स्तुति करतो. आम्ही गडबड केली नाही, तरच या सभेत येणें त्याला योग्य वाटेल.''

ते परिव्राजक शांत झाले. आणि भगवान सकुलुदायि परिव्राजक होता तेथे आला. तेव्हा सुकुलुदायि भगवंताला म्हणाला, ''भगवन्, या! भगवंताचे स्वागत असो! भगवान चिरकालाने आमच्या सभेंत आले. आपणासाठी हें आसनं तयार केलें आहे, त्यावर बसा .''

त्या आसनावर भगवान बसला आणि आपल्याजवळ बसलेल्या सकुलुदायि परिव्राजक म्हणाला, ''उदायि, येथे तुमच्या काय गोष्टी चालल्या होत्या.''

उदायि - भगवान, आमच्या गोष्टी राहूं द्या. त्या दुर्लभ नाहीत. पण मला एक गोष्ट आठवते. कांही कालामागे निरनिराळया संप्रदायांचे श्रमणब्राह्मण एका कौतूहलशालेत जमले होते, त्यांच्यांत प्रश्न उपस्थित झाला की, पूरण कस्सप, मक्खलि गोसाल, अजित केसकंबल, पकुध कच्चायन, संजय बेलट्टपुत्त, निगण्ठ नाथपुत्त आणि श्रमण गोतम, असे हे मोठमोठाल्या संघाचे पुढारी आजला राजगृहाजवळ वर्षावासाठी राहत आहेत, हें अंगमगधांतील लोकांचे मोठें भाग्य समजलें पाहिजे! पण या पुढार्‍यांत श्रावक ज्याचा योग्य मानमरातब राखतात, असा पुढारी कोण? आणि श्रावक त्याच्या आश्रयाखाली कसे वागतात?
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
* सकुल उदायि म्हणजे कुलीन उदायि.
† तिरच्छानकथा। अनिय्यानिकत्ता सग्ग-मोक्ख-मग्गानं तिरच्छा-बभूता कथा ति तिरच्छानकथा। (अट्ठकथा).
‡ वादविवादाची जागा.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

भगवान बुद्ध (उत्तरार्ध)

धर्मानंद कोसंबी
Chapters
आत्मवाद 1
आत्मवाद 2
आत्मवाद 3
आत्मवाद 4
आत्मवाद 5
आत्मवाद 6
आत्मवाद 7
आत्मवाद 8
आत्मवाद 9
आत्मवाद 10
आत्मवाद 11
आत्मवाद 12
कर्मयोग 1
कर्मयोग 2
कर्मयोग 3
कर्मयोग 4
कर्मयोग 5
कर्मयोग 6
कर्मयोग 7
कर्मयोग 8
कर्मयोग 9
कर्मयोग 10
कर्मयोग 11
यज्ञयाग 1
यज्ञयाग 2
यज्ञयाग 3
यज्ञयाग 4
यज्ञयाग 5
यज्ञयाग 6
यज्ञयाग 7
यज्ञयाग 8
यज्ञयाग 9
यज्ञयाग 10
यज्ञयाग 11
यज्ञयाग 12
यज्ञयाग 13
जातिभेद 1
जातिभेद 2
जातिभेद 3
जातिभेद 4
जातिभेद 5
जातिभेद 6
जातिभेद 7
जातिभेद 8
जातिभेद 9
जातिभेद 10
जातिभेद 11
जातिभेद 12
जातिभेद 13
जातिभेद 14
जातिभेद 15
मांसाहार 1
मांसाहार 2
मांसाहार 3
मांसाहार 4
मांसाहार 5
मांसाहार 6
मांसाहार 7
मांसाहार 8
मांसाहार 9
मांसाहार 10
दिनचर्या 1
दिनचर्या 2
दिनचर्या 3
दिनचर्या 4
दिनचर्या 5
दिनचर्या 6
दिनचर्या 7
दिनचर्या 8
दिनचर्या 9
दिनचर्या 10
दिनचर्या 11
दिनचर्या 12
*परिशिष्ट 1
*परिशिष्ट 2
*परिशिष्ट 3
*परिशिष्ट 4
*परिशिष्ट 5
*परिशिष्ट 6
*परिशिष्ट 7
*परिशिष्ट 8
*परिशिष्ट 9
*परिशिष्ट 10
*परिशिष्ट 11
*परिशिष्ट 12
*परिशिष्ट 13
*परिशिष्ट 14
*परिशिष्ट 15
*परिशिष्ट 16
*परिशिष्ट 17
*परिशिष्ट 18
*परिशिष्ट 19
*परिशिष्ट 20
*परिशिष्ट 21
*परिशिष्ट 22
*परिशिष्ट 23