Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

मांसाहार 3

याचाच अनुवाद दशवैशालिक सूत्रांतील खालील गाथांत संक्षेपाने केला आहे-

बहु अट्टियं पुग्गलं अमिसं वा बहुकंटयं।
अच्छियं तिंदुयं बिल्लं, उच्छखण्डं व सिंबलिं॥
अप्पे सिआ भोअणज्जाए, बहुउज्झिय धम्मियं।
दितिअं पडिआइक्खे न मे कप्पई तारिसं॥

'पुष्कळ हाडें असलेलें मांस, पुष्कळ काटे असलेला मासा, अस्थिवृक्षाचें फळ, बेलफळ, ऊस, शाल्मलि अशा प्रकारचे पदार्थ ज्यांत खाण्याचा भाग कमी व टाकण्याचा जास्त - देणारीला, ते मला योग्य नाहीत, असें म्हणून प्रतिबंध करावा.

मांसाहाराविषयीं प्रसिध्द जैनसाधूंचें मत

गुजरात विद्यापीठाची पुरातत्वमंदिर नांवाची शाखा होती, तिच्या तर्फे 'पुरातत्व' त्रैमासिक निघत असे. या त्रैमासकाच्या १९२५ सालच्या एका अंकात मी प्रस्तुत प्रकरणाच्या धर्तीवर एक लेख लिहिला आणि त्यांत हे दोन उतारे देण्यांत आले. मी त्याचा स्वत: शोध लावला होता असें नव्हे. मांसाहाराविषयीं चर्चा चालली असतां प्रसिध्द जैन पण्डितांनीच ते माझ्या निदर्शनास आणले आणि त्यांचा मी माझ्या लेखांत उपयोग केला.

हा लेख प्रसिध्द झाल्यावर अमदाबादच्या जैन लोकांत फारच खळबळ उडाली. त्यांच्या धर्माचा मी उच्छेद करूं पाहतों, अशा अर्थाच्या त्यांच्या तक्रारी पुरातत्वमंदिराच्या संचालकांकडे येऊन थडकल्या. संचालकांनी परस्पर त्या तक्रारींचा परिहार केला. मला त्यांची बाधा झाली नाही.

त्या वेळी वयोवृध्द स्थानकवासी साधु गुलाबचंद व त्यांचे प्रसिध्द शतावधानी शिष्य रतनचंद अहमदाबादेला राहत असत. एका जैन पंडिताबरोबर मी त्यांच्या दर्शनाला गेलों. संध्यासमय होता व जैन साधु आपणाजवळ दिवा ठेवीत नसल्यामुळे ह्या दोन साधूंचे चेहरे स्पष्ट दिसत नव्हते. माझ्याबरोबरीच्या जैन पंडिताने रतनचंद स्वामींना माझीं ओळख करून दिली, तेव्हा ते म्हणाले,'' तुमची कीर्ति मी ऐकत आहें. परंतु तुम्ही आमचे प्राचीन साधु मांसाहार करीत होते, असें लिहून आमच्या धर्मावर आघात केलात, हें ठीक नव्हे.''

मी म्हणालों,'' बौध्द आणि जैन हे दोनच श्रमण संप्रदाय आजला अस्तित्वात राहिलें आहेत. आणि त्यांजविषयीं माझें प्रेम किती आहे, हें या ( माझ्याबरोबर असलेल्या) पंडितांनाच विचारा. परंतु संशोधनाच्या बाबतीत श्रध्दा, भक्ति किंवा प्रेम आड येऊं देता कामा नये. सत्यकथनाने कोणत्याही संप्रदायाचें नुकसान होईल, असें मला वाटत नाही. आणि सत्यार्थ प्रकाशित करणें संशोधकाचें कर्तव्य आहे, असें मी समजतो.''

भगवान बुद्ध (उत्तरार्ध)

धर्मानंद कोसंबी
Chapters
आत्मवाद 1
आत्मवाद 2
आत्मवाद 3
आत्मवाद 4
आत्मवाद 5
आत्मवाद 6
आत्मवाद 7
आत्मवाद 8
आत्मवाद 9
आत्मवाद 10
आत्मवाद 11
आत्मवाद 12
कर्मयोग 1
कर्मयोग 2
कर्मयोग 3
कर्मयोग 4
कर्मयोग 5
कर्मयोग 6
कर्मयोग 7
कर्मयोग 8
कर्मयोग 9
कर्मयोग 10
कर्मयोग 11
यज्ञयाग 1
यज्ञयाग 2
यज्ञयाग 3
यज्ञयाग 4
यज्ञयाग 5
यज्ञयाग 6
यज्ञयाग 7
यज्ञयाग 8
यज्ञयाग 9
यज्ञयाग 10
यज्ञयाग 11
यज्ञयाग 12
यज्ञयाग 13
जातिभेद 1
जातिभेद 2
जातिभेद 3
जातिभेद 4
जातिभेद 5
जातिभेद 6
जातिभेद 7
जातिभेद 8
जातिभेद 9
जातिभेद 10
जातिभेद 11
जातिभेद 12
जातिभेद 13
जातिभेद 14
जातिभेद 15
मांसाहार 1
मांसाहार 2
मांसाहार 3
मांसाहार 4
मांसाहार 5
मांसाहार 6
मांसाहार 7
मांसाहार 8
मांसाहार 9
मांसाहार 10
दिनचर्या 1
दिनचर्या 2
दिनचर्या 3
दिनचर्या 4
दिनचर्या 5
दिनचर्या 6
दिनचर्या 7
दिनचर्या 8
दिनचर्या 9
दिनचर्या 10
दिनचर्या 11
दिनचर्या 12
*परिशिष्ट 1
*परिशिष्ट 2
*परिशिष्ट 3
*परिशिष्ट 4
*परिशिष्ट 5
*परिशिष्ट 6
*परिशिष्ट 7
*परिशिष्ट 8
*परिशिष्ट 9
*परिशिष्ट 10
*परिशिष्ट 11
*परिशिष्ट 12
*परिशिष्ट 13
*परिशिष्ट 14
*परिशिष्ट 15
*परिशिष्ट 16
*परिशिष्ट 17
*परिशिष्ट 18
*परिशिष्ट 19
*परिशिष्ट 20
*परिशिष्ट 21
*परिशिष्ट 22
*परिशिष्ट 23