Get it on Google Play
Download on the App Store

मंगलसुत्तं 2

बाहुसच्चं त सिप्पं च विनयो च सुसिक्खितो |
सुभासिता च या वाचा एतं मंगलमुत्तमं ||४||

पुष्कळ विद्या शिकणें, कला शिकणें, सद्वर्तनाची संवय लावणें आणि समयोचित भाषण करणें, हें उत्तम मंगल होय ||४||

मातापितु उपट्टानं पुत्तदारस्य संगहो |
अनाकुला च कम्मन्ता एतं मंगलमुत्तम ||५||

आईबापांची सेवा करणें, बायकोचा व मुलांचा (दान, प्रियवचन, अर्थचर्या व समानभाव ह्या चार प्रकारांनी) संग्रह करणें आणि व्यवस्थितपणे कामें करणें, हे उत्तम मंगल होय ||५||

दानं च धम्मचरिया च ञातकानं च संगहो |
अनवज्जानि कम्मानि एतं मंगलमुत्तमं ||६||

दानधर्म, धार्मिक आचरण, नातलगांचा (दान, प्रियवचन, अर्थचर्या व समानभाव ह्या चार प्रकारांनी) संग्रह व प्रशस्त कर्मे, हें उत्तम मंगल होय ||६||

आरति विरति पापा मज्जपाना च संयमो |
अप्पमादो च धम्मेसु एतं मंगलमुत्तमं ||७||

पापापासून पूर्ण निवृत्ति, मद्यपानापासून संयम आणि धर्मकृत्यांत दक्षता, हें उत्तम मंगल होय ||७||

गारवो च निवातो च संतुट्ठि च कतञ्ञुता |
कालेन धम्मसवणं एतं मंगलमुत्तमं ||८||


आदर, नम्रता, संतुष्टी, कृतज्ञता आणि योग्य काळीं धर्मश्रवण, हें उत्तम मंगल होय ||८||