Get it on Google Play
Download on the App Store

धर्म 13

३ मरणस्मृति.

मोहचरिताला मरणस्मृति कर्मस्थान योगारंभीं पथ्यकारक होतें त्याचें विधान:-

पवातदीपतुल्याय सायुसंततिया स्वयं।
परूपमाय संपस्सं भावये मरणस्सतिं।।


वार्‍याच्या झोतावर ठेवलेल्या दिव्याप्रमाणें आपल्या आयुष्याचा नाश होत चाललां आहे, हें इतरांच्या उदाहरणानें जाणून मरणस्मृति वाढवावी. (मरणायें चिंतन करावें).

महासंपत्तिसंपत्ता यथा सत्ता मता इध।
तथा अहं मरिस्सामि मरणं मम हेस्सति।।


ज्यांला मोठी संपत्ति प्राप्त झाली होती, ते पुरूषहि ह्या जगांतून जसे नाहींसे झाले, तसा मीहि (कधींना कधीं) मरणार आहें. मरण हें मला येणारच।

ईसकं अनिवत्तन्तं सततं गमनुस्सुकं।
जीनितं उदया अत्थं सुरियो विय धावति।।

सूर्य जसा उदयापासून अस्तापर्यंत सारखा धावत असतो, तसें गगनाला अत्यंत उत्सुक जीवित थोडेंसेंहि मागें न सरतां धावत आहे।

अशा रीतीनें मरणाचें निर्भयपणें चिंतन केलें असतां आळस नष्टप्राय होऊन जातो. ह्या मरणस्मृतिकर्मस्थानानें उपचार समाधिच साधते; अर्पणासमाधि आध्य होत नाहीं, तथापि आळस नष्ट होऊन अंत:करणांत जागृति उत्पन्न झाल्यामुळें मनुष्य कर्तव्यदक्ष होतो व इतर कर्मस्थानांच्या योगें अर्पणासमाधि साधण्यास समर्थ होतो.

बुद्ध व बुद्धधर्म

धर्मानंद कोसंबी
Chapters
बुद्ध व बुद्धधर्म 1 बुद्ध व बुद्धधर्म 2 बुद्ध 1 बुद्ध 2 बुद्ध 3 बुद्ध 4 बुद्ध 5 बुद्ध 6 बुद्ध 7 बुद्ध 8 बुद्ध 9 बुद्ध 10 बुद्ध 11 बुद्ध 12 बुद्ध 13 धर्म 1 धर्म 2 धर्म 3 धर्म 4 धर्म 5 धर्म 6 धर्म 7 धर्म 8 धर्म 9 धर्म 10 धर्म 11 धर्म 12 धर्म 13 धर्म 14 धर्म 15 धर्म 16 संघ भाग १ला 1 संघ भाग १ला 2 संघ भाग १ला 3 संघ भाग १ला 4 संघ भाग १ला 5 संघ भाग १ला 6 संघ भाग १ला 7 संघ भाग १ला 8 संघ भाग १ला 9 संघ भाग १ला 10 संघ भाग १ला 11 संघ भाग १ला 12 संघ भाग १ला 13 संघ भाग २ रा 1 संघ भाग २ रा 2 संघ भाग २ रा 3 संघ भाग २ रा 4 संघ भाग २ रा 5 संघ भाग २ रा 6 परिशिष्ट १ 1 परिशिष्ट १ 2 परिशिष्ट १ 3 परिशिष्ट १ 4 परिशिष्ट २ 1 परिशिष्ट २ 2 परिशिष्ट ३ 1 परिशिष्ट ३ 2 परिशिष्ट ३ 3 परिशिष्ट ४ 1 परिशिष्ट ४ 2