Get it on Google Play
Download on the App Store

बालाजी माहात्म्य - भाग ९

यात्रेकरु वीरशर्म्याची कथा.

सार्‍या गोपालांना आपल्या कपिला गायी-वासरांसह वेंकटाचलावर घेऊन येण्याविषयी त्याने आज्ञा केली उद्यां सर्व होईल असे सांगून राजा आपल्या अंतःपुरात गेला. त्याने हा सारा वृत्तांत राणीला सांगितला व तो झोपी गेला. झोपेत असतांना राजाला स्वप्नात प्रत्यक्ष भगवंताचे दर्शन व घेतले त्यांनी राजास राजधानी पासून एका बिळापर्यतचा सारा सुशोभित मार्ग दाखविला. दूसरे दिवशी जाग आल्यानंतर राजाने आपले मंत्रिगण ब्रह्मवृंद व इतर प्रजाजन यांना बोलावून हा सारा स्वप्नवृत्तांत सांगितला. राजाने स्वप्नामध्ये जे पल्लव पाहिले होते तेच जागेपणी पण त्यांच्या नजरेस पडले. मग एका शुभमुहूर्तावर अश्वारुढ होऊन राजाची स्वारी निघाली तसतसे ते पल्लव पण त्याचे पाठोंपाठ त्या बिळापर्यंत येऊन पोहोचले.
तेव्हां राजा तोंडमानास खूप आश्चर्य वाटले. व त्याने तसेच एक नगर वसविण्याचे ठरविले. देवाच्या सांगण्याप्रमाणे ते वारुळ दुधाने स्वच्छ धुतले व तेथे प्राकार उभारण्याचे कार्यास सुरवात झाली. “ तेथील चिंचेचा वृक्ष हा माझे वसतिस्थान आहे व चंपकवृक्ष हा लक्ष्मीचे स्थान आहे. या दोन वृक्षांना न तोडता बाकीचे वृक्ष तोडून टाका ” असा खुद्द भगवंतानीच राजास आदेश “ दिला तू आता फक्त द्वार व गोपुरयुक्त प्राकार तयार कर. माझे साठी तेथे मंदिर बनवायाचे ते तुझ्या वंशात जन्मास येणारा माझा भक्त नारायण नावाचा राजा बनवील व तोच त्यास सुवर्णाने मढवील ” असे पण भगवंतानी राजास सांगितले. राजाने त्याच प्रमाणे करुन भगवंताची प्राणप्रतिष्ठा केली व मग नित्य पूजा करु लागला
याच वेळी वीरशर्मा नांवाचा कोणी एक दक्षिणी ब्राह्मण आपली पत्नी लक्ष्मी हिच्या समवेत गंगास्नान करण्यासाठी म्हणून यात्रेला निघाला मागून ती ब्राह्मण स्त्री गर्भवती झाली व तिच्याच्याने पुढे मार्गक्रमण करवेना तिला कोठेतरी सुरक्षित स्थळी ठेवावे असा विचार करुन वीरशर्मा तोंडमानाच्या द्वारी आला. राजाला द्वारपालाकडून वीरशर्माच्या आगमनाची बातमी समजली तेव्हां राजाने त्यास दरबारी बोलवून घेतले व त्याच्या येण्याचे कारण विचारले. तेव्हां तो ब्राह्मण म्हणाला:
“ हे राजन मी एक सामवेदी ब्राह्मण असून माझे नाव वीरशर्मा असे आहे. गंगास्नानानिमित्त मी यात्रेस बाहेर पडलो पण मार्गातच माझी पत्नी गर्भवती झाली आहे. माझा आता असा विचार आहे की मी यात्रा करुन परत येईपर्यंत तिला आपल्याच येथे ठेवावे. आपण तिचा संभाळ करावा, अशी विनंती आहे. ”
ब्राह्मणाचे हे बोलणे ऐकून राजाने त्या ब्राह्मण सतीच्या योगक्षेमाची सर्व व्यवस्था केली व तिला आपल्या अंतःपुरात रहाण्यासाठी जागा पण दिली. आपल्या पत्नीची योग्य ती व्यवस्था लागल्याचे पाहून वीरशर्मास खूप समाधान वाटले, व मग तो गंगास्नानार्थ यात्रेसाठी पुढे मार्गस्थ झाला. श्रीक्षेत्र प्रयाग येथे त्रिवेणी संगमात स्नान केल्यानंतर तो ब्राह्मण काशीक्षेत्री गेला. तेथे पितृश्राद्धादि कर्मे उरकली. त्यानंतर अयोध्या, बद्रिकेदार आदि यात्रा केल्यानंतर दोन वर्षानी चैत्र शूद्ध एकादशीचे दिवशी तो ब्राह्मण राजाचे दरबारात परत आला. पवित्र गंगाजल राजाला अर्पण करुन त्याने आपल्या पत्नीचे कुशलवृत्त विचारले. दरम्यानच्या काळात राजास एकदम आठवण झाली की, त्याची पत्नी आपल्या अंतःपुरात आहे. तो अंतःपुरात गेला. तेथे गेल्यावर बघतो तो काय, ब्राह्मण सती मरुन पडलेली दिसली. ब्राह्मणास त्याने ती काहीच हकीकत सांगितली नाही. तो गुपचुप वारुळात गेला, श्री वराहमूर्तीस प्रणाम केला, व मग भगवान श्रीनिवासाच्याकडे जाऊन त्या ब्राह्मण सतीचा सारा वृत्तांत भीत भीत कथन केला. तेव्हां श्रीनिवास म्हणाले “ हे राजा घाबरुन जाऊ नकोस, त्या ब्राह्मण सतीचे प्रेत एका पालखीत घाल. ते अंतःपुरातील इतर स्त्रियांसह माझ्या देवालयाच्या पूर्वेस असलेल्या अस्ति नावाच्या सरोवरात द्वादशीचे दिवशी त्यास स्नान घाल, ब्राह्मण स्त्री पुन्हां जिवंत होईल. श्रीनिवासाच्या सांगण्याप्रमाणे राजाने तसे केले.
ती मृत ब्राह्मणसती पुन्हां सजीव झाली. भगवतांचा हा प्रभाव पाहून ब्राह्मण देखील चकित झाला. मग राजाने त्या ब्राह्मण दंपतीचा यथायोग्य सत्कार करुन त्यांना निरोप दिला. त्यानंतर श्रीनिवास राजाला पुन्हां म्हणाले, “ दररोज मध्यान्हानंतर माझी सोन्याच्या कमळाने पूजा करीत जा. राजधर्म पालन करीत जा. तुझी जी काही इच्छा असेल ती पुरी होत जाईल. एरव्हीच्या वेळी मात्र माझ्याकडे येण्याचे कारण नाही ” भगवंताच्या आज्ञेनुसार राजा तसे करु लागला.
या वेंकटाद्रिवर वसु नावाच एक रखवालदार श्रीनिवासांची उपासना करीत वास्तव्य करीत होता. तांदूळ शिजवून तो भात. मघात भिजाआयचा व मग त्याचा नैवेद्य भगवंत श्री लक्ष्मीदेवी यांना दाखवावयाचा, असा त्याचा क्रम असे. देवाच्या कृपेने त्याच्या चित्रवती नावाच्या सदर पत्नीला पुत्र झाला आणि त्यांनी त्याचे नाव वीर असे ठेविले. एके दिवशी भाताच्या शेताचे रक्षण करण्याची कामगिरी आपल्या मुलावर सोपवून ती दोघे पति-पत्नी मध गोळा करण्यासाठी म्हणुन रानात गेली. इकडे कुमार वीराने भात शिजविला. त्याचा नैवेद्य भगवंताना दाखविला व मग तो ग्रहण करुन स्वस्थपणे बसून राहिला. वसु व चित्रवती ही उभयता पति-पत्नि मध गोळा करुन आपले कुटीरापाशी आंत आली. तो त्यांना आपल्या मुलाने अगोदरच देवास नैवेद्य दाखवून भात खाल्याचे दिसून आले. हे पाहून त्याचा क्रोध अनावर झाला.
त्याने त्यास मारण्यासाठी खड्ग घेतले व तो त्याचेवर वार करणार इतक्यात एकाएकी त्याचा हात पाठीमागून कोणीतरी वरचेवर मागे खेचला वसूने मागे वळून पाहिले तो त्यास शंखचक्रगदाधारी विष्णु भगवानांचे दर्शन झाले. त्या बरोबर वसूने आपल्या हातातील आयुध खाली टाकले.
स्वामी पुष्करिणी:- पूर्वीच्या काळी सरस्वती देवीनी एका नदीची उत्पत्ती करुन ती देवाची तपश्चर्या करु लागली. तिची इच्छा होती की, ती नदी सर्वात श्रेष्ठ मानली सर्व, जावी भूलोकात वहाणार्‍या नद्यांमध्ये स्नान केल्यास पापाचा नाश होतो. असे मानतात. तरी पूर्वी केलेल्या पापाचा नाश ह्या नदीमध्ये स्नान केल्याने व्हावा असे तिला वाटे.
एकदा सरस्वतीदेवी तपश्चर्या करीत असताना तेथे पुलस्त्य व ब्रह्म आले. आपलाच मुलगा मानून सरस्वतीने त्यांची पूजा केली नाही. तेव्हां पुलस्त्य ब्रह्म नाराज झाले व त्यांनी तिला शाप दिला. की, तुला सर्व नदीची राणी होण्याचा गर्व झाला आहे. तरी तुझी ही पुण्य प्राप्त होणारी शक्ती नाहीशी होईल.
सरस्वती नाराज होऊन बोलली:- “ आईला शाप देणार्‍या तुझी सर्व मुले राक्षस बनतील. ” पुलस्त्य ऋषीनी अत्यंत दुःखी होऊन शाप विमोचनाकरिता प्रार्थना केली.
सरस्वती देवी व्याकुल होऊन बोलली, “ मुला, राक्षस कुलात तू शेवटचा मुलगा म्हणून जन्म पावशील. तुझे नाव विभीषण होईल. रामावतारात तू त्याचा भक्त होऊन चिरंजीवि होशील सर्व लोक तुझी प्रशंसा करतील. ”
परत सरस्वती देवी भगवानाची तपस्या करु लागली. भगवान शंख चक्र गदा खड्गाच्या बरोबर प्रगट झाले. सरस्वतीदेवी त्यांची प्रार्थना करुन बोलली, “ स्वामी सर्व नद्यामध्ये श्रेष्ठ होण्याचा वर देण्याचा अनुग्रह करा. ”
स्वामी म्हणाले, “ तुला ब्रह्मशाप प्राप्त झाला आहे, त्यामुळे हे श्रेष्ठ पद तुला मिळू शाकणार नाही. तरी तिरुपति पहाडावर तलावाच्या रुपात तुला रहाता येईल. त्याच्या जवळच मी देवस्थान बनून तेथे राहीन. तिन्ही लोकांत हे तीर्थ स्नान पुण्य पावन मानले जाईल. त्यात जो स्नान करेल तो मोक्ष प्राप्ती मिळवेल तुला स्वामी पुष्करिणी नाव प्राप्त होईल माझी आई बकुळादेवी तुला खाली जमीन बनून तुला आधार देईल. त्याप्रमाणे बकुळादेवी धरती बनून व सरस्वतीदेवी स्वामी पुष्करिणी बनून तिरुपति पहाडावर राहू लागल्या, त्याच्या दक्षिणैकडे स्वामी लक्ष्मीच्यासह देवस्थान बनवून त्यात स्थिरनिवास करु लागले.
राणासंगाचे चरित्र:- स्वामी पुष्करणीची महिमा सर्व कथां मध्ये वर्णन केली आहे. लोक वाईटमार्गाने कित्येक चुका करीत असतात. परंतु त्याचे विमोचन कसे करावे ते त्यांना कळत नाही. तरी स्वामी पुष्करिणी मध्ये स्नान केल्याने त्यांना मोक्षप्राप्ती मिळते.
राणासंग चंद्रवंशाचा राजा होता: त्याने कित्येक युध्दे केली. महान यज्ञ केले. राज्याचा विस्तार वाढत वाढत त्याला गर्व चढला व तो सुखलोलूप बनला. नीती अनीती न्याय अन्याय चांगले वाईट हे काहीही तो पाहिनासे झाला. तेव्हां शत्रूना फावले त्यांनी त्याच्या राज्याला वेढा दिला, तेव्हां राजाला आपली हार होणार हे माहित पडले.
प्रबल परिस्थितीला टाळुन राजा आपल्या सर्व परिवारासह गुप्तदारांनी जगंलात पळुन गेला. त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या पापाची फळे सापाच्या रुपाने राहीली.
त्याच्या पापाची फळे भोगण्याकरीता त्याने देशभ्रमण सुरु केले प्रत्येक पुण्यक्षेंत्रात पुण्यतीर्थात स्नान करुन देवाचे दर्शन घेऊन त्यांने हिमालयापर्यंत यात्रा केली. परंतु त्याच्या डोळ्यासमोर अंधेरच अंधेर दिसु लागला.
एक दिवस सुवर्णमुखी मध्ये स्नान करुन डोळ्यातल्या अश्रुकणानी त्यांनी शिवजीची प्रार्थना केली. स्वामी मी जिवनातुन मुक्त होऊ पहात आहे. तरी तुम्ही मला तुमच्या चरणावर लीन होऊन द्या नाहीतर मी प्राणार्पण करीन. तेव्हां राजाला आकाशवाणी ऐकू आली “ हे राजा तू सप्तगिरी चढून सातव्या पहाडावर स्वामी पुष्करणीत स्नान करुन तलावाच्या जवळच असलेल्या वारुळाजवळ मनापासुन देवाचे ध्यान कर. अशा तर्‍हेने सहा महिन्यात तुझ्या सार्‍या पापांचा नाश होईल. तुझे सर्व कष्ट दुर होतील. अशा तर्‍हेने राणासांगानी सर्व केल्यावर तो राज्यात परत गेला. तेथे राणी लक्ष्मीने त्याचे आनंदपुर्वक स्वागत केले.