Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

बालाजी माहात्म्य - भाग ७

नारायणपूर गावात

आता आपण नारायणपूर गावात काय काय घडले ते पाहू? श्रीनिवासांपासून जेव्हां शुक परतला तेव्हां तो आकाशराजापाशी गेला व श्रीनिवास ह्या लग्नाला तयार असल्याचे त्यांनी आकाशराजाला सांगीतले तेव्हां आकाशराजानी विवाह तयारी करण्यास सुरवात केली सर्व प्रजेलापण कळविण्यात आले. सारे शहर सजविण्यात आले. सर्वाना अत्यानंद झाला की. स्वतःहा श्रीनिवास पद्मावतीदेवीशी विवाह करण्यास येत आहेत. सर्व घराना झाडुनपुसुन रंगवण्यात आले. सांगाळ्या सडे वगैरे टाकण्यात आले तोरणे दारांना लावण्यात आली. सर्वनगराला चदनानी वेलबुट्टी काढण्यात आली सारी राजा व प्रजा नगर सजविण्यात दंग झाले. मोत्याच्या मंडपाला सुवर्ण रत्नाची विवाहवेदी तयार करवली सोन्याचा विवाह मंडप तयार करण्यात आला. तसेच बंधुबांधवाना मित्रमैत्रिर्णाना आप्तजनांना उतरण्याकरीता घरे बाधण्यांत आली. रथहात्ती, घोडे वगैरे सेवक सेविका तयारीत ठेवल्या फटाके रोषणाई केली वेगवेगळ्या गावांतून पुरोहित भटजी वगैरे बोलाविले सहाहजार माणसे स्वयंपाकाच्या तयारीला लागले वेगवेगळ्या स्वयंपाक घरात तयारी होऊ लागली फराळाचे तयार करण्यात आले. सर्व सामान सुमान दुधतुप, भाजी, सुंगधीद्रव्ये सर्वकाही आणण्यात आले. पाहुणे लोकांची व्यवस्था तोंडमानवर सोपवली गेली. जमाखर्च व हिशौब पहाण्याचे काम आकाशराजाचा मुलगा त्याच्यावर सोपवले वधुवरांच्या करीता कपडे दागदागीने सर्व बनवण्याचे काम आकाशराजानी स्वतःहावर घेतले.
जेव्हां सर्व काम करुन संपले तेव्हां पद्मावतीदेवीला मंगलस्नान घालण्यात आले. नवीन कपडे घातले. सर्व दागदागीन्यांनी नटवले व तीला गौरीहर पूजायला बसवले शास्त्रानुसार पूजाविधी सर्व केले. कुलदेवाची पूजा केली.
पहिल्या दिवशी वरपूजा होती. तेव्हां श्रीनिवासाला हत्तीवरुन सर्व गावांत फिरवून आणले. आणि मग वर वधूची भेट झाली. दोघे जवळ येऊन भेटले- दोघांनी एकमेकांना माळा घातल्या. व सर्वजण विवाह मंडपात येऊन पोहोचले. वशिष्ठ व ब्रह्मानी वेद म्हणले सर्व सर्व ऋषिमुनी गणांनी स्वस्तिवचव वाचले व श्रीनिवासानी पद्मावतीचे गळ्यात मंगळसुत्र घातले. व मग लाजाहोमाचा विधी झाला. व व श्रीनिवास व पद्मावती जोडपयाने पुरोहीत वर्गचे जेष्ठआप्तस्वकिय याना नमस्कार केला व त्यांचे आशिर्वाद घेतले. अश्या प्रकारे मंगल विवाहाचा धार्मिक कार्यक्रम समारंभ समाप्त झाला. त्यानंतर चार दिवस पर्यंत इभयपक्षा कडील भोजवन्यांचे कार्यक्रम पार पडले.
विवाह समारंभाच्या समाप्ती नंतर आकाशराजाने पद्मावतीची ऐरावतावर श्रीनिवासाच्याकडे पाठवणी केली. गरुडावर आरुढ होऊन उभयताच्या स्वार्‍या शेषाचलावर प्रयाण करण्यापूर्वी आकाशराजाच्या कडे निरोप घेण्याकरिता आल्या असताना त्याने त्यांना आणखी निदान एक महिना तरी. राजधानीत रहाण्याचा आग्रह केला. परंतु त्यानी मानले नाही तेव्हां आकाशराजा व धरणीदेवी यांनी पद्मावती व श्रीनिवासांना मंगल आशिर्वाद देऊन सदगदित कंठाने त्यांना निरोप दिला. आकाशराजाने श्रीनिवासांच्या बरोबर दहा हजार घोडे, एक हजार हत्ती, पाचशे गायी, दोनशे दासी, तीनशे दास, विविध धान्यें मधाचे घडे ई. संसारोपयोगी वस्तु दिल्या.
पुढचा कार्यक्रम
श्रीनिवास पद्मावती सुवर्णमुखी नदीचे किनार्‍यावर येऊन पोहोचल्यावर श्रीनिवास देवतांना म्हणाले, “ आम्ही विवाहित असल्यामुळे अगस्ती ऋषींचेच आश्रमात राहू इच्छितो. म्हणून सर्वांची वस्त्रे इ. देऊन संभावना केली. व त्यांना आपापल्या स्थानी जाण्यास निरोप दिला. श्री महालक्ष्मी पण कोल्हापुरास रवाना झाली.
देवदेवता आपापल्या स्थानी रवाना झाल्या. थोड्या दिवसांनी आकाशराजा व धरणीदेवी दोघेही निधन पावले. थोड्या दिवसानंतर तोंडमान व वसुदान दोघा चुलत्या-पुतण्या मध्ये राज्यासाठी झगडा उत्पन्न झाला तोंडमानचे म्हणणे मोठ्या भावानंतर मलाच राज्य मिळाले पाहिजे परंतु त्याने मी आकाशराजाचा वारस म्हणून मलाच मिळाले पाहिजे असे करत दोघे श्रीनिवासापाशी आले. त्यांनी युद्ध करण्यास सांगितले त्यांत जो जिंकेल त्यास राज्य करण्याचा अधिकार मिळेल. व त्यांनी वसुदानाच्या बाजूने लढणस तयार होऊन. व तोंडमानला सैन्य शंख व चक्र दिले. दोघांच्यात घनघोर युद्ध सुरु झाले. थोड्या वेळाने तोंडमानने चक्र स्वामीच्या अंगावर सोडले त्याच्या आघाताने स्वामी बेहोष झाले ते युद्ध चालू असतांना आपल्या प्रासादाच्या गच्चीवरुन पाहून पद्मावती देवी धावत अगस्ती ऋषींना घेऊन रणांगनावर गेली व तेव्हां मूर्च्छिवस्थेत असलेल्या पतीला पाहून घाबरली. त्यांना पाणी पाजून वारा घातला थोड्या वेळाने शुद्धीवर येताच श्रीनिवासांनी रागाने पद्मावतीला पाहून तेथे येण्याचे कारण विचारले. तिने तसे उत्तर देताच श्रीनिवासानी दोघा चुलत्या-पुतण्यांत मध्यस्थी करुन राज्याची वाटणी करुन दिली तेव्हां श्रीनिवासानी आकाशराजाच्या खजिन्यांचे किल्यांचे दोन समान भाग करुन तोंडमान व वसुदान यांच्या हवाली केले “ आपणाबरोबर युद्ध करुन प्रसंगी मी प्राणार्पण करण्यासही उद्युक्त झालो होतो. म्हणून मला व आपल्या पुतणीला आपल्या राजाच्या सोळावा भाग देणे उचित ठरेल. ” असे जेव्हां श्रीनिवासांनी तोंडमानास सांगितले तेव्हां तोंडमानानी १२ गांवे बक्षिस म्हणून श्रीनिवासांना दिली.

काही दिवसानंतर एके दिवशी तोंडमानराजा श्रीनिवासांच्या दर्शनासाठी आला. श्रीनिवासांनी त्याचा क्षेमसमाचार विचारुन त्याला प्रेमभराने आलिंगन दिले. “ आज कोणत्या कारणास्तव आपले इकडे आगमन झाले? ” अशी पृच्छा करताच तोंडमान म्हणाला, “ मुनिजन व सर्व मानव आपणांस देवतांचेही देव पुरातन, व वेदांताचा ज्ञय मानतात म्हणून मी आपली यथाशक्ति सेवा करण्याकरिता आलो आहे. मला आपण गृहस्थ बनविले खरे, पण आपणांला रहण्यास काही घर नाही. आकाशराजाच्या जामाताने दुसर्‍याच्या घरी रहावे ही गोष्ट अपमानास्पद वाटते. शेवटी दुसर्‍याचे घरी रहाणे ही कमीपणाचीच गोष्ट आहे.
“ म्हणून माझी इच्छा आहे की आपणासाठी एखादे भवन निर्माण करावे. ज्याची तिन्ही लोकांत किर्ती होईल. असे भवन आपल्या खेरीज कोण निर्माण करु शकेल? ” राजा तोंडमानाने भगवंताच्या इच्छेनुसार त्यांचेसाठी एक भवन बांधण्याचा विचार केला. भवनाची जागा निश्चित करण्यासाठी एका सुमुहूर्तावर श्रीनिवास पद्मावती व राजा तोंडमान यांचेसह शेषाचलावर चढले. श्री वराह स्वामीची अनुमती घेऊन ते स्वामी पुष्करिणी तीर्थाचे दक्षिण किनार्‍यावर आले.
एका स्थलाचा निर्देश करुन म्हणाले “ याच शुभस्थानी पूर्वाभिमुख भवन निर्माण करा. भवनास तीन प्राकार, सात मोठमोठी दार, उंच ध्वजस्थंभ व दोन गोपुरे असावीत. ते एवढे विशाल असावे की त्यात यज्ञशाला गोशाला, धान्याची कोठी, वस्त्रालय, भोजनालय, सर्व सामावू शकतील. ते तांब्याच्या पर्‍यांनी मढवले जावे व सुवर्णाच्या अलंकारानी सुशोभित केलेले असावे.
“ यापूर्वी आपणच श्रीतीर्थ व भूतीर्थ निर्माण केलेले आहे. आता भवन निर्माण करावे. ”
वेंकटाद्रीचे पायथ्याशी कपिलतीर्थ आहे. त्याचे पार्श्वभागी कपिललिंग आहे. प्राचीन काळी कपिलमुनीनी याच लिंगाची पूजा केली होती असे सांगण्यात येते. हे परमपवित्र लिंग पाताळाचा भेद करुन वर आल्यावर सर्व देवतांनी त्याची विधिपूर्वक स्थापना केली. याच लिंगाचे समोरुन कपिला नदीचा उगम झाला. हे कपिलतीर्थ सर्व पापाचा नाश करणारे आहे.
त्याचे वरचे बाजूस परम पावन असे चक्रतीर्थ आहे. अहिल्येशी समागम केल्याने इंद्राला जे पाप लागले होते, त्याची या तीर्थात स्नान केल्याने मुक्तता झाली. त्याचेही वर विष्वसेन तीर्थ आहे. तेथेच त्यांनी कठोर अशी तपश्चर्या करुन साक्षात श्रीहरी सेनापतीपद प्राप्त करुन घेतले. त्यानंतर पंचायुधो, अग्नितीर्थ ही दोन तीर्थ आहेत. ब्रह्मत्येचे पाप नाहीसे करणारे व पुण्य वाढविणारे असे ब्रह्मतीर्थ त्यानंतर लागते.
कोणे एके काळी एक ब्राह्मण तीर्थयात्रा करण्यासाठी म्हणून गावाबाहेर पडण्याचा विचार करु लागला. तों कमलापति भगवान त्याचे स्वप्नात आले व म्हणू लागले. तीर्थयात्रा करण्यासाठी वणवण करीत इतके हिंडण्याची गरजच काय मुळी? या वेंकटाचलावर सतरा दिव्य तीर्थेच आहेत. शास्त्रोक्त रीतीने या पुण्य तीर्थात स्नान करा म्हणजे सर्व तीर्थात स्नान केल्याचे पुण्य मिळते. कोणाला पृथ्वी-प्रदक्षिणा करण्याची इच्छा असेल त्याने सर्व तीर्थासमान सर्व पुण्यक्षेत्र पावन अशा या व्यकटाचलास प्रदक्षिणा घालून पृथ्वीप्रदक्षिणेचे पुण्य पदरात पाडून घ्यावे.
श्रीनिवासांचे हे बोलणे ऐकल्यानंतर राजा तोंडमानने आपल्या पूर्वजन्मी खोदलेल्या विहिरीचा जीर्णोद्धार केला. रत्नजडीत चार मूर्तीनी सुशोभित ज्याचेवर गरुडाची स्वारी बसली आहे आणि वर सोन्याचे कळस आहेत असे एक मंदिरपण तयार करविले.
भगवतांच्या दर्शनासाठी येणार्‍या भक्तजनांना चढण्या उतरण्याचे कष्ट पडू नयेत म्हणून एक विस्तीर्ण सोपानपंथ बांधला. याच्या वाटेवर ठिकठिकाणी विश्रामंडप बांधले. तृष्णा निवारणार्थ विहीरी बांधल्या. भगवान निवासांच्यासाठी एक भवन निर्माण झाले.
एके दिवशी राजा तोंडमान श्रीनिवासाच्याकडे आला व त्यांना आपल्या इच्छेनुसार सर्व काही तयार झाले आहे, आता आपणा मंदिरात चलावे अशी विनंती केली. “ तुझ्या भक्तीने मी संतुष्ट झालो आहे. मंदिरात जाण्यासाठी तुझ्या समवेत मी निघतो. असे श्रीनिवासांनी त्याला सांगितले.
मग इंद्रादि देवता, वैखानसादि ऋषीमुनी वेदपठण करणार ब्रह्मवृंद भांच्यासह श्रीनिवासांची स्वारी मंगलवाद्याच्या जयघोषात मंदिराप्रत निघाली. त्याच्या समवेत पद्मावतीदेवी पण होत्या. राजा तोंडमानने जे मंदिर उभारले त्यामुळे सर्वांना आनंद झाला. त्याचे **** आनद-धाम झाले. उत्तम कमलासनावर बसलेल्या पद्मावतीस आपल्या वक्षस्थलावर बसविले आहे. हातात शंखचक्राचा अभाव आहे. देवतांनी ज्याची आराधना करावी व भक्तजनानी ज्यास अनन्यभावे शरण जावे असे चरणकमळ एका हाताने दाखवीत आहे व हा संसारसागर कमरेपर्यंतच आहे, असे निर्देशित करणारा कमरेवरील हात अशा ध्यानाची श्रीनिवासाची मूर्ती पूर्ण वैभवात त्या आनंदधामात विराजमान झाली.