Get it on Google Play
Download on the App Store

बालाजी माहात्म्य - भाग ६

शुकमुनिचे प्रियदर्शन

शुकमहर्षि इतिहासपुराण रचनाकार वेदव्यास महाऋषीचे पुत्र होते. जन्म झाल्या बरोबर त्यानी सर्वसंगत्याग करुन सर्व सुख सोडून जीवनमुक्त झाले. ते महान तपस्वी होते. ते आलेले कळताच खुद्द श्री भगवान विष्णुना खूप आनंद झाला त्यांना त्यांच्या दर्शनानी खुप बरे वाटले.
शुक महर्षी बोंलले:- “ माझे भाग्य खूपमोठे म्हणून माला आज आपले दर्शन मिळते आहे. मी कधी स्वप्नात सुद्धा कल्पना केली नव्हती आपणासारख्या महान, भाग्यशाली श्रेष्ठतर असा आपणाहून कोण मोठा आहे. असे म्हणतानांच शुकाचे डोळे आनंदाश्रुनी भरुन आले. व आपले स्वागत करताना त्यांना खूप आनंद झाला.
श्रीनिवास हसून म्हणाले- हे ऋषीमुनी लोकधर्माची रक्षा करणे माझे परमप्रिय कामच आहे. नितीशास्त्रास बुद्धीमान असणार्‍याचा नाश करणे म्हणजे पापकाम आहे. मी आपल्या दोघांना म्हणजे माझी आई बकुलादेवीला आपल्या बरोबर येतानांच समजले. की. करावयाल गेलेले कार्य उत्तमपणे पार पडले असणार असे म्हणून त्यांनी बकुलदेवीकडे पाहिले.
शुकमुनी म्हणाले:- आकाशराजानी आपल्या मुलीचे लग्न आपणाबरोबर करण्याचा निर्णय घेऊन शुभलग्नपत्रिका माझ्या हाती देऊन ती आपण्यास देण्या करीता पाठवले आहे.
तेव्हां अत्यंत आनंदानी श्रीनिवास म्हणाले:- आज काय छान दिवस आहे? आपण हा शुभ समाचार स्वतः घेऊन आलात तरी आज आमचा पाहुणाचार घेऊनच आपण परतावे. माझी आई सुद्धा तेच म्हणत आहे तेव्हां आपण आजची रात्र इथेच काढुन सकाळी परत जा. म्हणुन शुकमुनीनी त्यांचा पाहूणचार घेऊन ते सकाळी भरत आकाशराजाकडे परतले.
शुकमुनी गेल्यानंतर आपल्या आईला चिंतामध्ये पडलेली पाहून श्रीनिवासनापण चिंता लागुन राहीली.
तेव्हां बकुलादेवीने स्वामीना विचारले हे श्रीनिवास ! लग्न दिवस जवळ येउ लागला आहे. तरी आपणा दोघांशिवाय तिसरे कोणीणी नाही. तरी तुझी आप्तमंडळी कुणी असल्यास बोलावंणे, निमंत्रण करा. कोणी असल्यास मला साग.
तेव्हां श्रीनिवासानी गरुड व आदिशेषाला मनांत स्मरण करुन आमंत्रित केले. व गरुडाला ब्रह्मलोकांत व आदिशेषाला शिवलोकांत पाठवले. व ब्रह्म, ईश्वर, देवतागण, सर्वांना लग्नांचे आमंत्रण दिले.
ब्रह्म सरस्वतीच्या बरोबर आले. त्याच्या पाठोपाठ अष्ठदिक्पांला, सप्तऋषीगण, देवदेवतादी सर्व आपल्यासा परिवारा बरोबर कुटुंबिया बरोबर आले, गणपती, षण्मुख, यक्ष, किन्नर, किंपुरुष सर्व देवतागण आले. सर्व देवलोक तिरुपति पर्वतावर हजर झाला.
विवाहाची तयारी:- श्रीनिवास आपल्या लग्नसंबद्यात ब्रह्म व इतर देवतांबरोबर बोलणी करु लागले. ईश्वरांनी आमंत्रिताची जबाबदारी स्वतःहावर घेतली. षण्मुखानी लग्नपत्रिका वाटण्याचे काम आपल्याव्र घेतले. वायुदेवानी सुगंध व परिमलद्रव्य वाटण्याचे काम स्वतःवर घेतले. अग्निदेवानी स्वयंपाकगृह सांभाळण्याचे काम घेतले. वरुणदेवानी पाण्याची जबाबदारी घेतली. अष्टदिक्पालांनी भांडी धुण्याचे काम केले. यमधर्मराजानी सारी साफसफाईची कामे स्वतःहावर घेतली. सर्वजण एकत्रित झाले. परंतु लक्ष्मी कुठे दिसली नाही तिच्या शिवाय कुलदेवाची पूजा कोण करणार? दिव्याच्या शिवाय पूजा कशी करायची वधु शिवाय लग्न कसे होणार? घरांत बायको असली तरच महालक्ष्मी असल्यासारखे वाटते. तिच्या सहायांनी सर्व घराचा झगमगाट असतो. लक्ष्मी नसली तर सर्व घर सुने वाटत रहाते.
भगवान श्रीनिवास लक्ष्मी नसल्यामुळे व्याकुळ होऊ लागले. ब्रह्म म्हणाले:- आई लक्ष्मीला बोलावण्याचा एकच उपाय आहे. तरी सूर्या वर खूप प्रेम करते तरी सूर्यालाच तिला बोलवायाला पाठवावे. त्यांनी सांगितले. “ मुला तु लक्ष्मीकडे जाऊन मी बरे नसल्याची बातमी कळव म्हणजे ती इथे येईल. परंतु सूर्यानीं भगवानाना सांगितले मी जर खोटे सांगितले तर तिचा क्रोध अनावर होऊन माझे हाल होतील तरी तूम्ही असे काहीतरी करा की. तिला मी सांगितले ते खरे वाटेल. तेव्हां भगवानानी सांगितले मुला तू घाबरु नकोस मी अशी काही जादू करीन की. तिला तू सांगतोस ते खरेच वाटले.
तेव्हां सूर्यानी तेथून जाण्याची अनुमती घेतली व ते लक्ष्मीच्या तेथे पोहोचले निरोप कळताच लक्ष्मी श्रीनिवासांना पहाण्यास निघाली तिरुपति पहाडावर इतर सर्वजण देवदेवतांगणांना पाहून तिची परिस्थिती आणखीनच वाईट झाली. तेव्हां धावत जाऊन तिने श्रीनिवासाना विचारले. “ आपल्या तब्बेतिला काय झाले? आपणांस काय होतय.
तेव्हां भगवान म्हणाले:- “ देवी ! तुझ्यांशिवाय मला आता एक क्षणही रहाता येत नाही. एकवार सभोवती तिने पाहून घेतले. व तिला त्याच्या बद्धल माया निर्माण झाली. तिने एकवार मायेने पाहिले भगवान म्हणाले:- “ हे प्राणप्रिये ! पूर्वजन्मी तु जे वेदवतीला वचन दिले होतेस ते आता तुला पार पाडणे शक्य आहे. त्याकरीता ही सर्व तयारी आहे. तेव्हां लक्ष्मीने त्यांना एक करण्याचे वचन दिले व मी इथे राहून आपले दोघांचे लग्न लावून देते म्हणुन सांगितले.
तेवढा वेळ सरस्वती, पार्वती, शचीदेवी गप्प राहिल्या त्यांना भिती होती परंतु लक्ष्मीनीच मान्यता दिल्यावर कोणीच रुकावट आणली नाही. तेव्हां लक्ष्मीने असे सांगितल्यावर सर्वाना आनंद झाला. आता काय सर्व कार्यभाग उरकायला पाहिजे त्याकरीता नारायणपूरला जायला पाहिजे विष्णुं म्हणाले व ब्रह्म म्हणाले मंगलस्नान करुन जायला तयार हो त्यापूर्वी इथे आलेल्या सर्वांना रात्रीचे जेवण वगैरे द्यायचा कार्यक्रम करावयाचा आहे. श्रीनिवासाने स्वतःहजवळ पैसे नसल्याचे सांगितले व मी काय करु म्हणुन विचारले.
ब्रह्मदेव म्हणाले:- महादेव ! कलीयूगात लोग उधार पैसे घेऊन लग्न करतात. तेव्हां आपण सुद्धा कुबेराकडे धन उधार मागावे. तेव्हां कुबेराने आपणांस किती धन हवे असे त्यांना विचारले. तेव्हां श्रीनिवासानी कर्जरोखे लिहून घेतले. एकूण सोळा लाख सुवर्ण राममुद्रिका घयाला ते तयार झाले. कुबेर तेवढे धन द्यायला तयार झाला. शंभर राममुद्रिकाना एका महिन्याचा एक राममुद्रिका अशा हिशोबानी त्यांनी कर्जरोखे लिहुन घेतले. व दरमहिना ते व्याज फेडण्याची बोली केली. शेवटी सर्व कर्ज चुकते करण्याचे आश्वासन दिले. ब्रह्म, ईश्वर, व इतरांनी सर्वानी त्याच्यावर सह्या केल्या.
कर्ज घेतल्यानंतर अग्निदेवाला चांगले पंचपक्वान्न बनविण्याची आज्ञा दिली. तेव्हां कुठे काय काय बनवायचे त्याचे पत्रक श्रीनिवासानी अग्निदेवाला दिले.
श्रीनिवास म्हणाले:- या पहाडावर जितकी म्हणून तीर्थे आहेत त्यांची भांडी म्हणून उपयोग करा. स्वामी पुष्करणीमध्ये अन्न तयार करा. पापविनाशनमध्ये डाळ शिजवा. आकाशगंगामध्ये चिंचभात ( चित्रान्न ), कुमारधारामध्ये भाज्या करा. अश्या प्रकारे सर्व अन्न तयार करा.
एका बाजूला स्वयंपाकसिद्धि होत होती. दुसर्‍या बाजूला लक्ष्मी व सरस्वती श्रीनिवास स्वामीनां मंगल स्नान घालत होत्या. देवतागण पण सारे स्नान करु लागले. सर्व ऋषीपत्नी आकाशगंगामध्ये सर्व भांड्यातून पाणी आणू लागल्या. लक्ष्मी व पार्वती आणलेल्या पाण्यानी स्वामीना अंघोळ ळीलू लागल्या. तेल, उटणे लावून अंघोधी घातल्या गेल्या. लक्ष्मीदेवीने नेसण्यास पितांबर आणुन दिले नंतर सर्व अलंकार घालण्यास दिले व नवरदेव तयार झाले.
नंतर वशिष्ठ महाऋषिनी शमीवृक्षाशी प्रतिष्ठापना केली व पूजा केली. अग्निदेवानी जेवण तयार असल्याचे सांगीतले. सर्वांना जेवण्यास येण्याकरता निमंत्रण दिली. श्रीनिवास म्हणाले पहिले जेवण देवाला दिले पाहिजे. तेव्हां ब्रह्म म्हणाला आपण स्वतःहा असतांना हे अमृतमय नैवेद्य दुसर्‍या कोणाला देणार.
परंतु भगवान श्रीनिवासाच्या सांगण्यानुसार ब्रह्मदेवानी नरसिंहस्वामीना नैवेद्य दाखविला पूजा केली. अमृततीर्थ सर्वाना वाटण्यात आले. नंतर सर्वानी एकत्र भोजन केले व तृप्तीने सर्वजण विश्वकार्याने तयार केलेल्या मंडपात झोपी गेले.
दूसर्‍या दिवशी सर्वजण नारायणपूर गांवी आले. श्रीनिवास गरुडावर बसून गेले. तसेच ब्रह्म हंसावर-ईश्वर बैलावर, सुब्रह्मण्यम मोरावर, मन्मथ पोपटावर बाकीसर्व देवलोक आपापल्या अश्या वहानावर बसून गेले त्या सर्वाच्या राण्या, ऋषीपत्नी व इतर बायका रथात बसून गेल्या.
शुकमुनीचे भोजनकरीता निमंत्रण
दिवस भरचा प्रवास करुन थकून सर्वजण तेथून जवळच असलेल्या शुकमुनीच्या आश्रमात आले ते आलेले. पहाताच शुकांनी त्यांचे अगत्यानें आश्रमांत बोलावून नेले व सर्वजण दमला असल्यामुळे इथेच भोजन वगैरे करुन रात्र इथेच काढून दुसर्‍या दिवशी सकाळी नारायणपूराला जाण्याविषयी विनविले.
तेव्हां श्रीनिवास म्हणाले:- हे मुनिश्रेष्ठा आमंत्रण नाकरण्यासारखे नाही तरीही तु एकटा व ब्रह्मचारी आहेस तेव्हां एवढ्या सर्व लोकांचे सांभाळणे तुला कठीण जाईल तरी तुझ्या विनंतीस मान देऊन आम्ही सर्वजण इथे रात्रभर रहातो.
ते एकून शुकाला बरे वाटले. व इतर देवगण व इतरांना पण बरे वाटले तेव्हां सर्वानी शुकाकडे भोजनोपचार वगैरे करुन रात्र तिथेच काढली व दुसर्‍या दिवशी नारायणपूराला निघाले.